ADVERTISEMENT
home / मनोरंजन
kon honar karodpati

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार करोडोंचे आवडते हास्यवीर

सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. आपल्या विनोदाने करोनाच्या कठीण काळात सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांना हास्यथेरपी दिली. या विनोदवीरांची ही हास्यजत्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आणि आता हे करोडोंचे आवडते हास्यवीर येणार आहेत ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात हजेरी लावणार आहेत. तेदेखील समाजकार्याला हातभार लावण्यासाठी.  आपले समाजाप्रती कर्तव्य जाणून हास्यजत्रेची टीम कोण होणार करोडपतीच्या मंचावर अवचरली आहे. सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे विनोदवीर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणसाठी खेळणार आहेत. 

अधिक वाचा – ‘अधांतरी’ लवकरच भेटीला, सिद्धार्थ चांदेकर, पर्ण पेठे, विराजस कुलकर्णी, आरोह वेलणकर करणार ‘हंगामा’,

टिळक संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी हातभार

जुलै महिन्यात आलेल्या महाभयंकर पुरानं लोकमान्य टिळक स्मारक मंदिर उद्ध्वस्त  केलं आहे. हे संग्रहालय आणि ग्रंथालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हे विनोदवीर ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहे. या वर्षी लोकमान्य टिळकांचं 101 वं पुण्यसमरण झालं. चिपळूणला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आहे जिथे हजारो पुस्तकं, अश्मयुगीन हत्यारे, शिवकालीन ढाल तलवारी,सातवाहन काळातील नाणी, वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज, मूर्ती, नाणी, भांडी, दिवे, जन्मपत्रिका, मान्यवर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या अशा सर्व गोष्टींचा संग्रह केलेला आहे. संपूर्ण कोंकणात असे पहिलेच ऐश्वर्यसंपन्न संग्रहालय आहे. टिळकांचा ज्ञानाचा वारसा जपण्याचा प्रयत्न इथे पुरेपूर केलेला दिसतो पण  हे संग्रहालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हास्यजत्रेतील विनोदवीरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.  चिपळूणमधील 156 वर्षांचा हा वाचन इतिहास पुन्हा उभा करण्यासाठी अशोक नायगावकर आणि इतर सर्वजण आपल्यापरीने मदत करत आहेत. 

अधिक वाचा – मराठमोळा अभिनेता घेऊन येत आहे ओटीटी प्लॅटफॉर्म

ADVERTISEMENT

कर्मवीर भागात हास्यवीरांची हजेरी 

दर शनिवारी कोण होणार करोडपती  कर्मवीर विशेष भाग होतो. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. या शनिवारी कोण होणार करोडपती विशेष भाग होणार असून त्यात हास्यकलाकार हॉटसीटवर खेळणार आहेत. मंचावर प्रसाद आणि समीर यांनी त्यांच्याबरोबर घडलेले काही विनोदी किस्से सांगितले तर समीर-विशाखा यांनी जाऊया गप्पांच्या गावाचं छोटंसं सादरीकरण देखील करून दाखवलं. यावेळी सचिन खेडेकर यांना देखील हसू अनावर झालं आणि त्यांनी या हास्यथेरपीचा आनंद घेतला. नम्रताने यावेळी एक गाणं सादर केलं. हास्यजत्रेच्या कलाकारांच्या मंचावर येण्याने कोण होणार करोडपतीच्या मंचाला वेगळाच रंग चढला होता. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांना मदतीचा हात म्हणून हास्यकलाकार कोण होणार करोडपतीच्या मंचावर आले. इथे जिंकलेली रक्कम ही लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण याच्या पुनरुभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. आपल्या परफॉर्मन्सने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकणारे हे विनोदवीर आता सामाजिक कार्याला हातभार लाऊनही प्रेक्षकांचे आणि आपल्या चाहत्यांचे मन जिंकून घेत आहेत असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. दरम्यान या भागात या विनोदवीरांनी किती रक्कम जिंकली याची नक्कीच आता चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या भागात याचे उत्तर नक्कीच मिळेल आणि हा भाग नक्कीच धमाल गाजवणारा असेल यात शंका नाही!

अधिक वाचा – हिरोची एन्ट्री झाली’ म्हणत उर्मिला निंबाळकरने शेअर केली खुशखबर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT