भात हे जगभरातील एक मुख्य अन्न आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाचे पीक घेतले जाते. सहाजिकच तांदळाचे विविध प्रकार आढळतात. बासमती, आंबेमोहर, मोगरा, इंद्रायणी, कोलम अशा तांदळाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. मधुमेही अथवा लठ्ठपणा असेल तर भात कमी खाण्याचा सल्ला अशा लोकांना दिला जातो. मात्र जर तुमचे प्रमुख अन्न भात असेल तर अशा वेळी भात कमी खाणे नक्कीच अशक्य होते. अशा लोकांनी हातसडीचा तांदूळ (Hand Pounded Natural Rice) भात करण्यासाठी वापरावा. कारण आरोग्य तज्ञ्ज भात कमी खाण्याचा सल्ला देतात याचं प्रमुख कारण आजकाल भात पॉलिश केलेल्या स्वरूपात विकत मिळतो. ज्यामधून शरीराला फारशी पोषकमुल्ये मिळत नाहीत. हातसडीचा तांदूळ म्हणजे हाताने सडलेला किंवा पॉलिश न केलेला तांदूळ. अशा तांदळामध्ये रिफाईंड न केल्यामुळे त्यावरील थर अथवा आवरण तसेच असते. तांदळावर ब्रान, जर्म आणि इंडोस्पर्म असे तीन थर असतात. तांदूळ पॉलिश करताना हे आवरण अथवा थर निघून जातात. या प्रोसेसमध्ये तांदळातील प्रथिनं, लोह आणि फायबर्सही निघून जातात. म्हणूनच पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातने सडलेला हातसडीचा तांदूळ खाणे सर्वांसाठीच चांगले असते. हातसडीच्या तांदळामध्ये असलेले पोषक घटक (Nutrition Content In Hand Pounded Natural Rice) तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. यात भरपूर प्रमाणात सोडीअम, पोटॅशिम, फायबर्स आणि प्रोटीन्स असतात. शिवाय त्यामध्ये फॅट्स आणि कॅलरिज कमी असल्यामुळे तुमचे वजन वाढत नाही.
हातसडीच्या तांदळाचे फायदे | Health Brown Rice Benefits in Marathi
हातसडीच्या तांदळामध्ये अनेक पोषक घटक असल्यामुळे हातसडीचा तांदूळ खाणे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
शरीराला ऊर्जा मिळते
हातसडीच्या तांदळामध्ये शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे पोषक घटक असतात. यासाठी नियमित हातसडीचा भात प्रत्येकाने खायला हवा. एक वाटी हातसडीच्या भातातून तुमच्या शरीराला ऐंशी टक्के मॅग्नेशिअम मिळते. हातसडीच्या भातात असलेल्या मॅग्नेशिअम, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटमुळे तुम्हाला दिवसभर उत्साही आणि टवटवीत वाटते. शरीराचे फ्री रेडिकल्सपासून आणि इतर आजारापासून संरक्षण करण्यासाठी या सर्व पोषक घटकांची गरज असते.
ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षण होते
आजकाल जीवनशैलीत झालेले बदल आणि अयोग्य आहार याचा परिणाम महिलांच्या शरीरावर जास्त प्रमाणात होताना आढळतो. अनेक महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. यासाठी महिलांच्या आहारात वेळीच योग्य ते बदल केले गेले पाहिजेत. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, हातसडीचा तांदूळ तसेच अनेक फळांमध्ये महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करणारे घटक असतात. त्यामुळे महिलांनी हातसडीचा भात अवश्य खावा.
पित्ताशयातील खडे कमी होतात
आहारातून गेलेल्या अनेक चुकीच्या घटकांचा परिणाम नकळत शरीरावर होत असतो. पचनक्रियेवर परिणाम झाल्यास पित्ताशयातील खडे वाढू शकतात. मात्र अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक हातसडीचा तांदूळ खातात त्यांचे पित्ताशयाचे खडे कमी होतात. कारण हातसडीच्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. आहारातून पुरेसे फायबर्स पोटात गेले की पित्ताशयाचे कार्य सुरळीत होते आणि पित्ताशयात खडे निर्माण होत नाहीत.
वजन कमी करण्यास मदत होते
तुमच्या आहारात नियमित हातसडीचा तांदूळ असेल तर तुमचे वजन वाढत नाही. कारण या तांदळामध्ये फायबर्स आणि लेसीथीन भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रित राहते. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, पांढऱ्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ अथवा ब्राऊन राईस खाण्यामुळे तुमचे वजन कमी होते.
कोलेस्ट्रॉल कमी होते
निरोगी जीवनशैलीसाठी आहारात योग्य ते बदल करणं आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. हातसडीच्या तांदळामध्ये जास्त प्रमाणात फॅटस नसल्यामुळे यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. सध्या शरीरात वाढणारे बॅड कोलेस्ट्रॉल ही एक सर्वात मोठी डोकेदुखी आहे. कारण कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहात अडथळे येतात. ज्याचा परिणाम ह्रदयावर दाब येतो आणि ह्रदयरोग वाढू लागतात. मात्र जर तुम्ही आहारात हातसडीचा तांदूळ समाविष्ट केला तर तुमच्या रक्तदाब नियंत्रित राहतो कारण रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
मेनोपॉझमध्ये महिलांसाठी उत्तम
प्रत्येक महिलेच्या आयुष्यात रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजचा टप्पा येतो. मॅनोपॉजमध्ये असणाऱ्या महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. पण जर तुम्ही नियमित हातसडीचा तांदूळ आहारातस घेत असाल तर तुम्हाला मेनोपॉजचा त्रास नक्कीच कमी जाणवतो. कारण संतुलित आहारामुळे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सदेखील संतुलित राहतात.
टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो
मधुमेह हा विकार सध्या एवढ्या प्रमाणात वाढला आहे की तो जीवनशैली विकारच झाला आहे. आजकाल प्रत्येक घरात एकतरी मधुमेही आढळतोच. मधुमेहींचा त्रास कमी व्हावा अथवा त्यांना टाईप 2 मधुमेह होऊ नये यासाठी भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र जर तुम्ही लहानपणापासून हातसडीचा तांदूळ खात असाल तर भात खाऊनही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. कारण हातसडीच्या तांदळामध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
उत्तम अॅंटिबायोटिक
हातसडीच्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम असते. ज्यामुळे तुमचा अस्थमा, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, हार्ट अटॅक, स्ट्रोक अशा अनेक गंभीर आजारापासून संरक्षण होते. कारण मॅग्नेशिअममुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालते. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यासाठीच आहारात हातसडीचा तांदूळ असावा कारण ते एक उत्तम अॅंटि बायोटिक आहे.
बद्धकोष्ठता कमी होते
हातसडीच्या तांदळामध्ये जवळजवळ पन्नास टक्के फायबर्स असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. फायबर्समुळे तुम्हाला अपचन अथवा पोटाच्या इतर समस्या होत नाहीत. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. आजकाल अयोग्य आहारामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होताना दिसतो. मात्र जर तुम्ही नियमित हातसडीचा भात खात असाल तर तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत नाही.
सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits In Marathi)
त्वचेसाठी ब्राऊन राईसचे फायदे | Skin Brown Rice Benefits In Marathi
हातसडीचा तांदूळ अथवा ब्राऊन राईस तुमच्या आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतो. कारण हातसडीच्या तांदळामुळे तुमच्या त्वचेवर चांगले फायदे होतात.
- नियमित हातसडीचा तांदूळ खाण्यामुळे तुमचे हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण होते.
- त्वचेवर वयाआधीच दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा यामुळे कमी होतात.
- त्वचेची लवचिकता टिकून राहते ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत.
- आहारातून पुरेसे अॅंटि ऑक्सिडंट मिळाल्यामुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्स येत नाहीत.
- हातसडीच्या तांदळाचे अथवा ब्राऊन राईसचे पाणी तुम्ही त्वचेवर एखाद्या क्लिंझरप्रमाणे वापरू शकता. ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण निघून जाते.
- शिजलेला भात देखील फेसपॅकसाठी वापरता येतो.
केसांसाठी ब्राऊन राईसचे फायदे | Hair Brown Rice Benefits In Marathi
त्वचेप्रमाणेच केसांवरही हातसडीच्या तांदळाचा चांगला परिणाम दिसून येतो. कारण हातसडीच्या तांदळातून तुमच्या शरीराला पर्यायाने केसांना चांगली पोषक तत्त्वे मिळतात.
- आहारातून मिनरल्स आणि पोषक घटक मिळाल्यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते.
- केसांची वाढ जोमाने होते आणि तुमची केस गळण्याची समस्या कमी होते.
- हातसडीच्या तांदळामध्ये भरपूर स्टार्च आणि फायबर्स असतात. ज्यामुळे तुम्ही या तांदळाचे पाणी केसांसाठी कंडिशनर प्रमाणे वापरू शकता.
- हातसडीच्या तांदळाचे पाणी केसांना लावण्यामुळे तुमच्या केसांतील कोंडा कमी होतो कारण यामध्ये नैसर्गिक सेलेनियम असते जे कोंडा दूर करते.
- नियमित केसांच्या मुळांना आणि स्काल्पला तांदळाचे पाणी लावणे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरते कारण त्यामुळे स्काल्प निरोगी होतो आणि केस मजबूत होतात.
घनदाट केसांसाठी वापरा तांदूळाचे पाणी (Benefits Of Rice Water For Hair In Marathi)
हातसडीचा तांदूळ कसा वापरावा | How To Use Brown Rice
हातसडीचा तांदूळ अथवा ब्राऊन राईस तुम्ही आहारातून नक्कीच वापरू शकता. हातसडीच्या तांदळामध्ये असलेले पोषक घटक तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. यासाठी नियमित थोड्या प्रमाणात हातसडीचा भात तुम्ही आहारातून खाऊ शकता. हातसडीचा तांदूळ हा प्राचीन काळापासून भारतीय खाद्यसंस्कृतीत वापरला जातो. हातसडीचा भात सडून त्याच्यापासून तांदूळ काढण्यासाठी पुर्वी उखळाचा वापर केला जात असे. त्यामुळे या भातातील पोषकमुल्ये टिकून राहत असत. मात्र काळाच्या ओघात आणि आधुनिक जीवनशैलीत पॉलिश केलेला भात वापरण्याची सवय सर्वांना लागली आहे. जर तुम्ही पहिल्यांच आहारात हातसडीचा तांदूळ वापरणार असाल तर तुम्हाला त्याबाबत काही गोष्टी माहीत असायला हव्या.
- हातसडीच्या तांदळामध्ये फायबर्स कमी असल्यामुळे तो तांदूळ जास्त काळ टिकत नाही. तुम्हाला हा तांदूळ दोन ते तीन महिन्यात वापरावा लागतो. जास्त काळासाठी टिकवण्यासाठी तो व्यवस्थित टिकवून ठेवावा लागतो.
- हातसडीचा तांदूळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे हा तांदूळ कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पातेल्यामध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवावा.
- हातसडीच्या तांदळाची निर्मिती कमी प्रमाणात केली जात असल्यामुळे त्याचा पूरवठा कमी प्रमाणात होतो. सहाजिकच पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ कमी प्रमाणात आणि महाग मिळतो.
- हातसडीचा तांदूळ डाळ, आमटी, सोलकढी, सार, कढीसोबत चांगला लागतो. मात्र त्याचा पुलाव, बिर्याणी अथवा भाताचे निरनिराळे प्रकार चांगले होतीलच असे नाही.
तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ, रेसिपी मराठीत (Rice Recipes In Marathi)
हातसडीचा तांदूळ आणि काही प्रश्न – FAQ’s
1. हातसडीचा तांदूळ आणि ब्राऊन राईसमध्ये काय फरक आहे ?
तांदळाचे पीक काढल्यावर कोंड्यासकट भात काढला जातो. मात्र तांदळावर असलेले तपकिरी रंगाचे आवरण काढल्यावर जो भात मिळतो त्याला ब्राऊन राईस असे म्हणतात. भातावरील आवरण काढण्यासाठी जेव्हा तो हाताने सडला जातो तेव्हा त्याला हातसडीचा तांदूळ असे म्हणतात. तांदूळ जेव्हा खूप वेळा पॉलिश केला जातो तेव्हा तो पांढरा शुभ्र दिसू लागतो. मात्र पॉलिश करताना वरील आवरणासोबत अनेक पोषक मुल्यै नष्ट होतात.
2. ब्राऊन राईसचे काही दुष्परिणाम असतात का ?
होय, ब्राऊन राईसमध्ये इतर धान्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात अर्सेनिक असते. ज्यामुळे जर जास्त प्रमाणात अर्सेनिक पोटात जाणे हानिकारक असू शकते.
3. सिंगल पॉलिश तांदूळ आणि हातसडीचा तांदूळ एकच असतो का ?
भात पॉलिश केल्यावर पांढराशुभ्र तांदूळ मिळतो. जेव्हा भात हाताने सडला जातो तेव्हा त्यास हातसडीचा तांदूळ असे म्हणतात. मात्र मशिनमध्ये पॉलिश केलेला तांदूळ हा पांढरा शुभ्र असतो. मशीनमध्ये तांदूळ बरेचवेळा पॉलिश केला जातो. एकदा पॉलिश केलेला तांदूळ हा सिंगल पॉलिश असतो. ज्यामधील पोषक मुल्ये मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली नसतात.