ADVERTISEMENT
home / Diet
निरोगी आरोग्यासाठी ‘ब्रोकोली’ आहे लाभदायक

निरोगी आरोग्यासाठी ‘ब्रोकोली’ आहे लाभदायक

भाजीमंडईत आजाकाल हिरवीगार ‘ब्रोकोली’ सर्वत्र उपलब्ध असते. ब्रोकोली दिसायला अगदी फ्लॉवरप्रमाणेच असते फक्त तिचा रंग हिरवा असतो. मात्र असं असलं तरी या ब्रोकोलीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म दडलेले आहेत. यासाठीच ब्रोकोलीचा वापर नियमित आहारात करणं गरजेचे आहे.  ब्रोकोलीत प्रोटिन्स, लोह, कॅल्शियम,फायबर्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. शिवाय तिच्याध्ये अॅंटिऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरोग्यासाठी ती अतिशय लाभदायक ठरते. ब्रोकोली फ्लॉवरच्या भाजीप्रमाणे शिजवून अथवा परतून खाण्यापेक्षा ती उकडून अथवा सॅलेडमधून खाल्लास चांगला फायदा मिळू शकतो. कारण अशा पद्धतीने खाण्याने ब्रोकोलीमधील पोषकतत्त्व शिजल्यावरदेखील टिकून राहतात. 

जाणून घ्या ब्रोकोलीचे आरोग्यावर काय फायदे होऊ शकतात –

वजन कमी होण्यास मदत होते –

ब्रोकोलीच्या भाजीत पाणी आणि फायबर्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे तिच्या सेवनाने तुमचे वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी उकडलेली ब्रोकोली सॅलेडमध्ये टाकून दोन्ही वेळच्या जेवणासोबत खा. अथवा मधल्या वेळेस ब्रोकोलीची स्मूदी खाण्यास काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या पोटात फायबर्स पुरेशा प्रमाणात जातील आणि तुम्हाला वारंवार भुक लागणार नाही. सहाजिकच ब्रोकोली खाण्याने तुमचे पोषण होईल शिवाय वजनदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

गर्भवती महिलांसाठी उत्तम

गरोदरपणात नेमका कोणता आहार घ्यावा याबाबत अनेक समज आहेत. मात्र या काळात गरोदर स्त्रीचे आणि तिच्या गर्भाचे उत्तम पोषण होणे गरजेचे असते. ब्रोकोलीमधील पोषणतत्त्वे गर्भाच्या वाढीसाठी पोषक (Folic Acid Foods In Marathi) असतात. यामुळे त्यांच्या मेंदू आणि शारीरिक विकास होण्यास मदत होते. 

कर्करोगापासून बचाव होतो

बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाण यामुळे आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जीवनशैलीत बदल आणि योग्य आहार यामुळे कर्करोगापासून बचाव होणे शक्य आहे. एका संशोधनानूसार आहारात नियमित ब्रोकोलीचा वापर केल्यामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते. कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर आहे. 

ADVERTISEMENT

पचनसंस्था सुधारते

ब्रोकोली या  फळभाजीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. नेहमीच्या जेवणात ब्रोकोलीचा वापर केल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर आहारात ब्रोकोलीचा वापर जरूर करा.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

ब्रोकोलीमध्ये बीटा केरोटिन मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते. वयोमानानुसार होणारे मोतिबिंदू, काचबिंदू यापासून बचाव होण्यासाठी नियमित ब्रोकोली अवश्य खा.

मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत

मधुमेहींसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणं हे मोठं आव्हानंच असतं. टाईप 2 मधुमेह असणाऱ्या लोकांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित ब्रोकोली खाल्लास चांगला फायदा होऊ शकतो.

Shutterstock

ADVERTISEMENT

बोक्रोली खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ?

कोणतीही भाजी खरेदी करताना ती सावधपणे खरेदी करणं गरजेचं आहे. कारण आजकाल अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून ते बाजारात विकले जातात. त्यामुळ ब्रोकोली खरेदी करताना काही गोष्टी नीट सावधपणे पाहाव्यात. ब्रोकोलीची भाजी खरेदी करताना तिचा कंद टणक, हिरवागार (रंग एकसमान हिरवा असणं) ताजी आहे याची खात्री करून घ्या. ब्रोकोलीची भाजी बाजारातून विकत आणल्यावर हवाबंद पिशवीत टिकवून ठेवता येऊ शकते. मात्र शक्य असल्यास ती लवकर संपवावी. कारण भाजी शिळी झाल्यास तिच्यामधील पोषकतत्त्व कमी होत जातात. हवाबंद पिशवी अथवा डब्यात ब्रोकोली दोन ते तीन दिवस चांगली टिकते. 

अधिक वाचा

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित प्या ‘गाजराचा रस’

जाणून घ्या कंदमूळं खाणं आरोग्यासाठी कसं आहे फायदेशीर

ADVERTISEMENT

हे नॅचरल ड्रिंक्स पिऊन तुमच्या चेहऱ्यावर येईल महिन्याभरात ‘ग्लो’

फोटोसौजन्य – शटरस्टॉक 

06 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT