उन्हाळा म्हटला की अंगाची काहिली आणि घशामध्ये सतत तहान तहान होणे हे ठरलेलेच आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हीच परिस्थिती आहे. पण बरेचदा अनेकांना फ्रिजमधील थंड पाणी सहन होत नाही. मग अशावेळी घरात माठात पाणी साठवून प्यायले जाते. अनेकदा घरांमध्ये केवळ उन्हाळा आल्यावरच माठाचा वापर केला जातो. उन्हाळ्यात आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात सर्वांनाच खूप तहान लागते. त्यामुळे अनेक घरांमध्ये फ्रिजमधून थंड पाणी प्यायले जाते. उन्हातून आल्यानंतर काही जण लगेच पाणी पितात पण त्यामुळे उन्हाळी लागण्याची शक्यता असते. पण पूर्वी फ्रिज नसताना मातीच्या माठातले पाणी प्यायले जायचे आणि हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि फायदेशीर समजण्यात येते. नैसर्गिकरित्या थंड झालेल्या पाण्याची चव अधिक चांगली लागते असं म्हटलं जातं.
का प्यावे माठातील पाणी
मातीची भांडी अथवा तांब्याची भांडी ही पाणी पिण्यासाठी उत्तम ठरतात. कारण याने शरीराला फायदा मिळतो. आजकाल मात्र प्लास्टिकच्या बाटलीतून अधिक पाणी प्यायले जाते. मातीमध्ये अनेक रोगांशी लढण्याची क्षमता असते आणि यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत मिळते. मातीच्या मठातून बारहेर आलेल्या पाण्याच्या थेंबाच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया होत असते आणि मग पाणी थंड होते. जिते बाष्पीभवन अधिक तितके पाणी थंड. त्यामुळेच माठाच्या तळाशी पाणी नेहमी झिरपत असलेले तुम्हाला दिसून येते. त्याशिवाय तुम्ही थंड कपडा त्यावर लाऊन ठेवल्यास, पाणी नैसर्गिकरित्या अधिक थंड होते आणि याचा शरीराला अधिक फायदा होतो. म्हणून उन्हाळ्यात माठाचे पाणी पिणे चांगले असते.
माठाचे पाणी उन्हाळ्यात पिण्याचा फायदा
माठातील पाणी हे तुमच्या शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरते. मातीचा सुगंध हा सर्वांना आवडतो. पोट थंड राहाते आणि तहानही भागते हे महत्त्वाचे. तसंच माठातील पाणी नियमित प्यायल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहाता. याशिवाय तुमची पचनक्रिया अधिक मजूबत होण्यास मदत मिळते अर्थात चयापचय क्रिया सुधारते. हे पाणी नैसर्गिक थंडावा देत असल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. फ्रिजमधील थंड पाण्यामुळे वजनवाढीचा धोकाही संभवतो. याशिवाय माठातील पाणी हे शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी खूपच मदत करते. माठातील पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटाशी संबंधित असलेले आजार यामुळे बरे होतात. पित्त झाले असेल अथवा पोटात मुरड येत असेल तर ते दूर करण्यासाठी हे पाणी नियमित पिणे योग्य आहे. याशिवाय सनस्ट्रोकपासूनही बचाव करते. उन्हाळ्यात अनेकांना असे त्रास होत असतात, त्यामुळे माठातील पाण्याचाच उपयोग करावा. म्हणूनच अगदी पूर्वीपासून माठाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा हा जुना पर्याय उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम ठरतो हे नक्की!
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचा थंडावा योग्य राहणे गरजेचे आहे आणि त्यामुळे यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते ते म्हणजे माठाचे पाणी. त्यामुळे तुम्ही बिनधास्त माठाचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसात प्या आणि स्वतःची काळजी घ्या!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक