खरबूज हे उन्हाळी हंगामातील लोकप्रिय फळांपैकी एक आहे. हे पल्पी फळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवून केवळ उष्णतेपासून आराम देत नाही तर डझनभर आरोग्य फायद्यांनी युक्त आहे.या लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात थंडगार खरबुजाचा आस्वाद घेताना, तुम्ही पौष्टिकतेने भरलेल्या बिया फेकून देत आहात का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 100 ग्रॅम खरबुजाच्या बियांमध्ये अंदाजे 7% कर्बोदके, 2% प्रथिने आणि 1% चरबी असते. याव्यतिरिक्त, या बियांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जसे की व्हिटॅमिन ए, सी, ई, के, नियासिन, जस्त, मॅग्नेशियम इ.नियमितपणे सेवन केल्यास, या बिया आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
खरबुजाच्या बियांमध्ये असतात पौष्टिक घटक
खरबुजाच्या फळाप्रमाणे त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते. यातील पोषक घटक आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि शरीराला रोग आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. यामध्ये डाएटरी फायबर असते, जे बद्धकोष्ठते सारख्या पचनाशी संबंधित आजारांसाठी फायदेशीर असते. खरबुजाच्या बियांमध्ये कॅल्शियम देखील असते, जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते. खरबुजाच्या बिया या अँटिऑक्सिडंट्सचा देखील चांगला स्त्रोत आहे. अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे सेल्युलर नुकसानापासून संरक्षण करतात तसेच हृदयविकार आणि काही प्रकारच्या कर्करोगांचा प्रतिबंध करतात. खरबुजाप्रमाणे त्याच्या बियांमध्येही फोलेट असते. हे पोषक तत्व कर्करोग तसेच हृदयविकाराचा धोका कमी करते. तथापि, गर्भधारणेदरम्यान त्याची सर्वात महत्वाची भूमिका मानली जाते. गर्भधारणेच्या एक महिना अगोदर मुलाचे अनेक जन्म दोषांपासून संरक्षण करण्यासाठी फॉलेट सप्लिमेंट्सची शिफारस केली जाते.
खरबुजाच्या बिया या ओमेगा थ्री फॅटी ऍसिडने समृद्ध असतात. ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. हे केवळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी आणि विशिष्ट कर्करोगांना प्रतिबंध करण्यासाठीच नाही तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि चिंता आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. शाकाहारी लोकांसाठी खरबुजाच्या बिया हा प्रथिनांचा एक उत्तम पर्याय आहे कारण ते या मॅक्रोन्युट्रिएंटने भरलेले आहेत. खरबुजाप्रमाणेच त्याच्या बियांमध्ये देखील व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
खरबुजाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे
- खरबुजाच्या बियांमध्ये भरपूर पोटॅशियम असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
- या बियांमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनचे उच्च प्रमाण असते जे आपली दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करते तसेच मोतीबिंदू होण्याचा धोका कमी करते.
- खरबुजाच्या बियांमधील हाय प्रोटीन कन्टेन्ट शरीराच्या ऊतींच्या वाढीस मदत करते आणि केस आणि नखांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते.
- या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवून रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
- या बियांमधील फोलेटचे चांगले प्रमाण शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकते, ज्यामुळे गर्भवती महिलांमध्ये वॉटर रिटेन्शनची समस्या कमी होते.
- या बिया खाल्ल्याने मनावरचा ताण कमी होतो. या बिया कशा प्रकारे तुमचा तणाव कमी करू शकतात हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. या बिया खाल्ल्याने मेंदूला मिळणारा ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे आपल्या मेंदूच्या ऊती शांत आणि तणावमुक्त होतात.
- या बियांची pH व्हॅल्यू न्यूट्रल असते. त्यामुळे ज्यांना ऍसिड रिफ्लक्स समस्या किंवा पोटाच्या इतर समस्या असतात त्यांच्यासाठी या बिया वरदान आहेत.
- खरबुजाच्या बिया शरीरातील अतिरिक्त कफ काढून टाकतात आणि कंजेशन दूर करण्यात मदत करतात.
म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा खरबूज खाल तेव्हा त्यातील बिया टाकून न देता जपून ठेवा व त्यांचा आहारात समावेश करा.
फोटो क्रेडिट – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक