ADVERTISEMENT
home / Diet
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित प्या बेलफळाचे सरबत

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित प्या बेलफळाचे सरबत

भगवान शंकराला बेल प्रिय असल्यामुळे शंकराची पूजा करताना बेलपत्र हमखास वाहिलं जातं. सोमवारी अथवा महाशिवरात्रीला शंकाराच्या पिंडीवर एक हजार बिल्वपत्रांचा अभिषेक केला जातो. सहाजिकच सर्वांना बेलाची पाने आणि त्याचे महत्त्व माहीत असेलच. मात्र बेलाचे फळ आणि त्यापासून केले जाणारे सरबत तुमच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहेत का? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी बेलफळाचे सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो. बेलफळाचे सरबत पिण्याने बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्या कमी होतात. मधुमेहींसाठी तर बेलफळ वरदानच ठरते. यासाठी जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे 

पचनशक्ती सुधारते –

बेलफळाच्या सरबतामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. या रसामुळे पचनसंस्थेतील अडथळे दूर होतात ज्यामुळे पोट स्वच्छ होते. सहाजिकच यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याधी, पोटदुखी, गॅस होणे अशा समस्यांपासून तुमची सुटका होते. 

Instagram

ADVERTISEMENT

रक्त शुद्ध होण्यास मदत होते –

बेलफळाच्या सरबतामुळे रक्त शुद्ध होते. कारण यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे यकृत आणि किडनीचे कार्य सुधारते. रक्त शुद्ध झाल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरळदेखील कमी होतात. यासाठीच त्वचा सुंदर आणि नितळ हवी असेल तर बेलफळाचा रस पिणे गरजेचं आहे. 

मधुमेहींसाठी गुणकारी –

मधुमेहींसाठी बेलफळाचा रस अथवा सरबत घेणे फारच फायद्याचे आहे. कारण यामुळे मधुमेहींच्या इन्शुलीनच्या निर्मितीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अती प्रमाणात वाढत अथवा कमी होत नाही.

श्वसनाच्या समस्या दूर होतात –

बेलफळाच्या रसामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात. बेलफळाचे सरबत पिण्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकल्यात आराम मिळतो. म्हणून श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी बेलफळाचे सरबत अवश्य प्या.

ADVERTISEMENT

Instagram

इन्स्टंट एनर्जी मिळते –

उन्हाळ्यात सतत होणाऱ्या उष्णतेच्या त्रासामुळे तुम्हाला  थकल्यासारखे आणि निरूत्साही वाटत असते. अशा वेळी जर तुम्ही  बेलफळाचे सरबत प्यायला तर तुम्हाला इन्संट ऊर्जा मिळू शकते. कारण एका शंबर मिलीग्रॅम बेल फळामध्ये 140 कॅलरिज असतात. बेलफळातील प्रोटिन्समुळेही तुम्हाला  लगेच फ्रेश वाटू लागते. 

किडनी विकार दूर राहतात –

किडनी विकार असलेल्या लोकांना बेलफळाचा रस घेण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण बेलफळामुळे किडनीमधील अशुद्धता बाहेर टाकण्यास मदत होते. टॉक्सिनचा निचरा  व्यवस्थित न झाल्यामुळे किडनीच्या समस्या निर्माण होत असतात. म्हणूनच किडनीचे विकार रोखण्यासाठी नियमित बेलफळाचा रस घेण्यास विसरू नका. 

बेलफळाचे सरबत करण्याची सोपी पद्धत –

साहित्य – दोन मध्यम आकाराची बेलफळे, पाणी, जिरे पावडर, चवीपुरते मीठ आणि  चार चमचे साखर अथवा गुण ( मधुमेंहींनी साखरेचा वापर करू नये )

ADVERTISEMENT

सरबत करण्याची पद्धत –

बेलफळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. बेलफळे कापून त्यातील गर काढून घ्या. भांड्यामध्ये हा गर काढून घ्या आणि त्या गराच्या दुप्पट पाणी त्यात मिसळा. गर आणि पाणी एकजीव करा. मिश्रण एकजीव झाल्यावर एका गाळणीच्या मदतीने ते गाळून घ्या. गाळताना गाळणीमध्ये पल्ब दाबून त्यातील सर्व रस भांड्यात निथळून घ्या. जर तुम्ही मधुमेही नसाल तर तुम्ही या सरबतामध्ये आवडीनुसार साखर अथवा गुळ मिसळू शकता. सरबत ग्लासात काढून घ्या. वरून चवीपुरते मीठ आणि जिरेपावडर टाक.  सरबत ढवळून घ्या. उन्हाळ्यासाठी गारेगार बेलफळाचे सरबत तयार आहे.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी (Benefits Of Yoga In Marathi)

ADVERTISEMENT

लवंगतेलाचे आरोग्य आणि सौंदर्यावर होणारे फायदे

आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे

24 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT