बीटाचे फायदे माहीत असूनही खूप जण आहारात त्यांचा समावेश करत नाहीत. बीटामुळे त्वचा आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. अशावेळी बीटाचा समावेश थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचा असेल तर तुम्ही बीटाच्या काही अशा रेसिपीज करायला हव्यात. ज्या तुम्हाला अगदी सहज करता येतील आणि त्या खाताना चटपटीत आहेत. आहारात बीटाचा समावेश करण्यासाठी काही सोप्या बीटाच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. त्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्यास मदत मिळेल.
फोडणीचे बीट
बीट नुसते किसून खायला आवडत नसेल तर तुम्ही बीटपासून मस्त फोडणीचे बीटं बनवू शकता. यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही
साहित्य: किसलेले बीट, तेल, मोहरी, हिंग, मीठ आणि थोडी साखर
Soyabean Recipe In Marathi | आजच ट्राय करा या सोयाबीन रेसिपीज
कृती:
- एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी आणि थोडेसे हिंग घाला.
- मोहरी हिंग तडतडले की आवडत असल्यास त्यात थोडासा कडीपत्ता घाला.
- त्यामध्ये किसलेले बीट घालून अगदी दोन मिनिटांसाठी परता. वरुन मीठ आणि साखर पेरुन तुम्ही थोडावेळा झाकून ठेवा.
- बीट शिजायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे अगदी काहीच मिनिटात हे तयार होते.
- ही भाजी चपातीसोबत खायलाही छान लागते
बीट पराठा
अगदीच काहीतरी वेगळं खायचं असेल आणि ते चटपटीत हवं असेल तर तुम्ही बीटपासून बीटाचा पराठा सुद्धा बनवू शकता. हा पराठा चवीला फारच चांगला लागतो
साहित्य: किसलेलं बीट, कणीक, चाट मसाला, कोथिंबीर, उकडलेला बटाटा
कृती:
- किसलेल्या बिटात चाट मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उकडलेला बटाटा आवश्यकतेनुसार घाला
- आता मळलेली कणीक घेऊन त्यामध्ये तयार बीट आणि बटाट्याचे सारण घाला. पराठा लाटून घ्या.
- मस्त तूप लावून पराठा शेकून घ्या. द्ह्यासोबत हे पराठे खूपच छान लागतात.
बीट थालिपीठ
बीटापासून तुम्हाला थालिपीठही बनवता येऊ शकते. खूप जणांना थालिपीठ आवडतात. अशावेळी तुम्ही मस्त थालिपीठ सुद्धा बनवू शकता.
साहित्य: थालिपीठाची भाजणी, किसलेलं बीट
कृती:
- थालिपीठाच्या इतर कृती प्रमाणाचे तुम्हाला करायचे आहे. फक्त पीठ मळताना त्यामध्ये कांद्यासोबत बीटाचा किस घालायचा आहे. तयार गोळ्याची थालिपीठ थापायला घ्यायची आहेत.
- त्यावर मस्त पांढरे लोणी घालून त्याचा आनंद तुम्हाला लुटता येईल
आता बीटपासून तुम्ही या रेसिपी नक्की ट्राय करा.
घरीच बनवा मस्त बाजारासारखी बालुशाही, सोपी पद्धत