Advertisement

Diet

प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी (Pregnancy Care Tips In Marathi)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jun 4, 2019
प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी (Pregnancy Care Tips In Marathi)

Advertisement

आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणाला तुम्हाला तुम्ही ‘आई’ होणार आहात हे समजतं तो क्षण तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. कोणत्याही स्त्रीसाठी प्रेगन्सीचा काळ हा खासच असतो. एक नवा जीव आपल्यातून निर्माण होणार आहे ही भावनाच वेगळी असते. त्यात  पहिल्यांदाच हा अनुभव घेणाऱ्या महिलांसाठी काय करावे आणि काय करू नये असं होऊ शकतं. प्रत्येक स्त्रीचं वय, अनुभव, परिस्थिती, शारीरिक क्षमता, आरोग्य एकसारखं असेल असं नाही. त्यामुळे प्रेगन्सीमधील अनुभव आणि या काळात घ्यायची काळजी निरनिराळी असू शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला तुम्ही गरोदर आहात का हे ओळखण्यापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत काय काळजी घ्यायची हे देत आहोत. ज्याचा तुम्हाला तुमच्या आई होण्याच्या सुखद प्रवासात नक्कीच फायदा होऊ शकतो.

तुम्ही गरोदर आहात हे कसं ओळखाल (How To Know If You Are Pregnant)

गरोदरपणातील काळजी (Care During Pregnancy)

गरोदरपणातील आहार (Pregnancy Diet)

care during pregancy

तुम्ही गरोदर आहात हे कसं ओळखाल (How To Know If You Are Pregnant)

तुम्ही गरोदर आहात हे समजण्यासाठी आधी प्रेगन्सी टेस्ट करणं फारच गरजेचं आहे. पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांना प्रेंगन्सी टेस्ट कधी करावी आणि यासाठी कोण-कोणत्या प्रेगन्सी टेस्ट कधी कराव्यात हे माहीत नसतं. तर काही जणी इतक्या संवेदनशील असतात की प्रेगन्सी टेस्ट न करताही त्यांना त्या गरोदर आहेत हे समजू शकतं. मात्र प्रेगन्सी कन्फर्म करण्यासाठी टेस्ट करण्याची नक्कीच गरज असते.

गर्भधारणा झाल्यावर (HCG – Human Chorionic Gonadotropin) हार्मोन्स तुमच्या युरिनमध्ये आढळते त्यामुळे प्रेगन्सी टेस्टसाठी युरिन टेस्ट केल्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच आम्ही तुम्हाला प्रेगन्सी टेस्ट करण्याचे काही प्रकार आणि ती केव्हा आणि कशी करावी याची माहिती देत आहोत.

खाण्याची काय काळजी घ्यावी (After Pregnancy Diet In Marathi)

प्रेगन्सी टेस्ट किट (Pregnancy Test Kit)

आजकाल जाहिरात आणि इतर माध्यमातून आपल्याला प्रेगन्सी टेस्ट किटविषयी योग्य माहिती नक्कीच मिळत असते. मात्र हे प्रेगन्सी टेस्ट स्वतःसाठी पहिल्यांदा वापरताना मनात  अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. यासाठी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकते.सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेगन्सी टेस्ट नेहमी सकाळच्या वेळीच करावी. कारण सकाळी युरिनमध्ये HCG हॉर्मोन्स स्पष्टपणे आढळून येतं. मासिक पाळी चुकल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही प्रेगन्सी टेस्ट करू शकता. प्रेगन्सी टेस्ट किटच्या माध्यमातून पाच मिनीटात तुम्हाला तुम्ही गरोदर आहात का हे समजू शकतं. कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये प्रेगन्सी टेस्ट किट सहज उपलब्ध असतं. या किटवरील सूचना नीट वाचून घ्या. प्रेगन्सी टेस्ट करण्यासाठी किटवर दिलेल्या माहितीनुसार युरिनचे काही थेंब ड्रॉपरने टाका. जर तुमच्या युरिनमध्ये HCG हॉर्मोन आढळले तर किटवर दोन गुलाबी रंगाच्या रेषा उमटतात. याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात अथवा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे असा होतो. जर किटवर एकट गुलाबी रंगाची रेष उमटली तर तुमची टेस्ट निगेटिव्ह आहे असा त्याचा अर्थ होतो. जर तुमची टेस्ट निगेटिव्ह आली तर मुळीच चिंता करू नका. कारण गरोदर होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे पुढच्या वेळेस नशिब तुमची नक्की साथ देईल असे म्हणून रिझल्टकडे दुर्लक्ष करा. शिवाय कधी कधी प्रेगन्सी टेस्टचा रिझल्ट चुकीचा असण्याची शक्यता असल्यामुळे काही पुढील आठवड्यात मासिक पाळी न आल्यास पुन्हा एकदा टेस्ट करा. जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर प्रेगन्सी कन्फर्म करण्यासाठी एखाद्या चांगल्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. कारण आधी सांगितल्याप्रमाणे कधी कधी प्रेगन्सी टेस्ट किट चुकीचा रिझल्टदेखील दाखवू शकते. शिवाय मासिक पाळी उशीरा येण्याची अनेक कारणे असू शकतात. यासाठी असे असल्यास डॉक्टरकडे जाऊन तपासणी जरूर करा.

गर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या

क्लिनिकमध्ये करण्यात येणाऱ्या प्रेगन्सी टेस्ट (Pregnancy Test At Clinic)

युरिन टेस्ट – आजकाल क्लिनिकमध्येदेखील प्रथम प्रेगन्सी टेस्ट किटच्या मदतीने अथवा लॅब टेस्ट द्वारे युरीन टेस्ट केली जाते. युरिन टेस्ट लॅबमध्ये केल्यास अचूक परिणाम मिळू शकतो.

ब्लड टेस्ट –  युरीन टेस्ट केल्यानंतर डॉक्टर तुमच्या रक्ताची तपासणी करतात. रक्त तपासणीद्वारे तुम्ही गरोदर आहात का हे अचूक समजू शकते.

अल्ट्रा साऊंड सोनोग्राफी – अल्ट्रा साऊंड सोनोग्राफीमुळे तुम्ही गरोदर आहात का हे कळणे अधिक सोपे जाते. कारण मासिक पाळीच्या चार आठवड्यानंतर सोनोग्राफीद्वारे तुमच्या पोटातील गर्भाचा आकार त्यात दिसून येतो. सातव्या आठवड्यानंतर बाळाचे ठोकेदेखील तुम्ही या माध्यमातून ऐकू शकता.

गर्भधारणा कन्फर्म झाल्यावर फर्स्ट स्टेप आहे त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं. कारण त्यामुळे तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य कसे आहे ते समजू शकते. गर्भारपण तीन टप्प्यामध्ये असते पहिल्या महिन्यापासून तिसऱ्या महिन्यापर्यंतच्या काळाला पहिली तिमाही असं म्हणतात. चौथ्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापर्यंतच्या काळाला दुसरी तिमाही असं म्हणतात. तर सातव्या महिन्यापासून डिलिव्हरीच्या काळाला तिसरी तिमाही असं म्हणतात. पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये गरोदर महिलांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. यासाठीच संपूर्ण गरोदरपणात काय काळजी घ्यावी हे जरूर वाचा.

वाचा – जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते

गरोदरपणातील काळजी (Care During Pregnancy In Marathi)

care during pregancy 2

नियमित डॉक्टरकडे जा (Go To Regular Doctor)

प्रेगन्सी टेस्ट केल्यावर आणि प्रेगन्सी कर्न्फम झाल्यावर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं  आहे. डॉक्टर तुमची तपासणी करून तुमचे आणि बाळाची आरोग्यस्थिती पाहू शकतात. सोनोग्राफीच्या मदतीने बाळाचे ठोके आणि स्थिती योग्य आहे का हे समजू शकते. कधी कधी एखाद्या व्हिटॅमिन अथवा पोषक तत्त्वाचा अभाव असल्यास डॉक्टर तुम्हाला औषधांच्या मदतीने त्यावर उपाययोजना सूचवू शकतात. शिवाय नियमित तपासणी केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित आहे का आणि तुमच्या बाळाचे योग्य पोषण होत आहे का हे देखील समजू शकते.

गरोदर महिलांसाठी स्टाईल्स (Pregnancy Outfit Ideas In Marathi)

शारीरिक हालचाल (Physical Movement)

सुखरूप गरोदरपण आणि सुलभ प्रसूतीसाठी गरोदरपणी आवश्यक शारीरिक हालचाल करणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही गरोदर आहात आजारी नाही हे नेहमी लक्षात ठेवा. उगाचच सतत पडून राहणे अथवा कोणतीच कामे न करणे यामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो.

वाचा – काळजी कशी घ्यावी (How To Care 7th Month Of Pregnancy)

प्रवास करताना (While Travelling)

जर तुम्ही नोकरी करत असाल तर गरोदरपणी तुम्हाला प्रवास करावाच लागतो. मात्र या काळात प्रवास करताना रिक्क्षा, बाईकवरून जाणे टाळा. खड्डे असलेले रस्ते आणि धक्कादायक ठिकाणी प्रवास न केलेलाच बरा.

व्यायाम (Exercise)

जर तुमचे आणि बाळाचे आरोग्य ठणठणीत असेल तर तुम्ही गरोदरपणी हलके व्यायाम नक्कीच करू शकता. तज्ञांच्या मदतीने योगासने आणि प्राणायम केल्यामुळे तुमचा प्रसूती काळ सुलभ होऊ शकतो. दिवसभरात तीस मिनीटे निरोगी आयुष्यासाठी जरूर द्या. यासाठी तुम्ही चालण्याचा आणि  पोहण्याचा व्यायामदेखील करू शकता.

वाचा – हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय

सकाळचा नास्ता चुकवू नका (Don’t Miss Breakfast)

मॉर्निंग सिकनेसमुळे अनेक गरोदर महिला सकाळी नास्ता करणे टाळतात. मात्र हे चुकीचेआहे कारण आता तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यायची आहे. मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी सकाळच्या नास्त्यामध्ये दूध,रस असे द्रवपदार्थ न घेता पोहे, पोळी, पराठा असे पदार्थ खा.

वाचा – Reasons Of Weight Gain Post Pregnancy

धुम्रपान आणि मद्यपान टाळा (Avoid Smoking And Drinking)

अनेक महिलांना ताणतणावर दूर करण्यासाठी धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असते. मात्र आता तुम्हाला या गोष्टी दूर ठेवणं गरजेचं आहे. कारण धुम्रपान आणि मद्यपानाचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

आरामदायक कपडे (Comfortable Clothes)

प्रेगन्सीमध्ये तुमचे वजन आणि पोटाचा घेर वाढत जातो. त्यामुळे या काळात खास मॅर्टनिटी ड्रेस वापरणं सोयीचं ठरू शकेल. शिवाय गरोदरपणात घट्ट कपडे घातल्यामुळे तुमच्या रक्तदाब आणि श्वसनक्रियेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही निवडलेले कपडे सुती असतील याची काळजी घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला गरम होणार नाही.

हायजिन केअर (Hygiene Care)

या काळात स्वच्छतेची काळजी घेणं देखील फार गरजेचं आहे. कारण फूड अथवा इतर इनफेक्शनचा थेट तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. यासाठी बाहेरचे अथवा प्रकिया केलेले पदार्थ खाणे टाळा. बाहेर जाताना घरातील पाण्याची बाटली सोबत ठेवा. घरात शक्य तितकी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा.

पुरेसा आराम करा (Get Enough Rest)

गरोदरपण हे आजारपण नसलं तरी या काळात पुरेसा आराम करणं गरजेचं आहे. कारण गरोदरपणात तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला शारीरिक आरामाची गरज असू शकते. शिवाय या काळात अती दगदग झाल्यास आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जर डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असेल तर पुरेशी बेड रेस्ट जरूर घ्या.

गर्भसंस्कार (Garbh Sanskar)

गरोदरपणी तुम्ही जे विचार करता त्याचा तुमच्या बाळावर परिणाम होत असतो. असं म्हणतात गर्भातील बाळावर आईकडून संस्कार घडत असतात. त्यामुळे या काळात तुमच्या आचार, विचारांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. आजकाल अनेक ठिकाणी गर्भसंस्कार कोर्सेचं आयोजन केलं जातं. त्यामुळे अशा गर्भसंस्कार क्लासेस अथवा पुस्तकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

सकारात्मक विचार (Positive Thoughts)

तुम्ही जसे विचार करता तसं तुमचं बाळ निर्माण होत असतं. या काळात सतत चांगले आणि सकारात्मक विचार करा. शिवाय तुमचं बाळ सर्वगुणसंपन्न आणि बुद्धीमान होणार असा  विचार सतत करा.

वाचा – 9 व्या महिन्यातील लक्षणे

गरोदरपणातील आहार (Pregnancy Diet In Marathi)

pregnancy foods

गरोदरपणात तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक पोषणाची गरज असते. या काळात तुमच्या आहारात कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, लोह आणि प्रोटीन्सचा समावेश  असणं गरजेचं आहे.

दूध आणि दुधाचे पदार्थ (Milk and Milk Products)

गरोदरपणी तुम्हाला आणि तुमच्या बाळाला कॅल्शियमची गरज असते. दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटिन्स असतात. यासाठी तुमच्या आहारात दूध, दही, योगर्ट, पनीर, चीज अशा गोष्टींचा समावेश जरूर करा.

तृणधान्ये (Cereals)

गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी अशा तृणधान्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. गरोदरपणात पोटावर येणाऱ्या दाबामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. फायबरयुक्त पदार्थ खाण्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात.

ताजी फळे आणि हिरव्या भाज्या (Fresh Fruits and Green Vegetable)

गरोदर महिलांनी हिरव्या भाज्या आणि ताज्या फळे खाण्यावर भर द्यावा. दुसऱ्या आणि तिसऱ्या  तिमाहीमध्ये तुम्ही कोणता आहार घेता याचा परिणाम तुमच्या बाळाच्या वाढीवर दिसून येत असतो. फळे, भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. शिवाय हिरव्या पालेभाज्यांमधून तुम्हाला फॉलिक अॅसिड मिळू शकते.

बेरीज (Berries)

स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी अशा बेरीज मध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे तुम्हाला संतुलित आहार मिळू शकतो.

सुकामेवा (Dry Fruits)

बदाम, अक्रोड, जर्दाळू अशा सुकामेव्यामुळे बुद्धी तल्लख होते. ओमेगा 3 अॅसिड यातून तुम्हाला मिळू शकतात. मात्र सुकामेवा अती प्रमाणात खाऊ नका.

पपई आणि आंबा (Papaya And Mango)

गरोदरपणी पपई, आंबा असे उष्ण पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलं जातं. मात्र या पदार्थांमध्ये पोषक तत्त्व भरपूर प्रमाणातअ असतात. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात हे पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही.  असं असलं तरी आंबा आणि पपई उष्ण असल्यामुळे ते अती प्रमाणात नक्कीच खाऊ नयेत. त्यामुळे गर्भपात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

वाचा – गर्भपात टाळण्यासाठी घेण्याची विशेष काळजी (Miscarriage Symptoms In Marathi)

कॉफी आणि कॅफेनयुक्त पदार्थ (Coffee And Caffeinated Foods)

काही संशोधनानुसार अती कॉफी अथवा कॅफेनयुक्त पदार्थ सेवन केल्यामुळे बाळाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी गरोदरपणात कॉफी आणि कॅफेन असलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करावे.

मासे (Fish)

काही माशांमध्ये अती प्रमाणात पाऱ्याचे प्रमाण आढळून येते. सुरमई, हलवा ,कोळंबी असे मासे उष्ण देखील असतात.यासाठी गरोदरपणी मासे कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

कच्चे पदार्थ (Raw Foods)

कच्चे मांस अथवा अंडी चविष्ट लागत असली तरी त्यामुळे तुमच्या बाळाला इनफेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी गरोदरपणात असे कोणतेच पदार्थ खाऊ नका ज्यामध्ये न शिजवलेले मांस अथवा अंडी वापरले असतील.

वाचा – असा कमी करा गरोदरपणातील बद्धकोष्ठतेचा त्रास, बद्धकोष्ठता उपाय

जंक फूड (Junk Food)

गरोदरपणात खरंतर कोणतेच बाहेर विकत मिळणारे पदार्थ खाऊ नयेत. जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांतून कोणतेच पोषण होत नाही. शिवाय असे पदार्थ खाण्यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. जे तुम्हाला गरोदरपणात त्रासदायक ठरू शकतो.

FAQs

care during pregancy 1

1. नैसर्गिक पद्धतीने गरोदर राहण्यासाठी काय उपाय करावे?

स्त्री आणि पुरूषांच्या मिलनातून गर्भधारणा होणं ही नैसर्गिक प्रकिया आहे. मात्र असं असलं तरी बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि चुकीचा आहार, विहार यामुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी येतात. असं असल्यास तुम्ही वैद्यकीय मदत घेऊन आणि औषध-उपचार करून आई- बाब होऊ शकता. मात्र जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने गरोदर व्हावं असं वाटत असेल तर तुमच्या जीवनशैलीत योग्य ते बदल करा.

2. गरोदरपणात महिलांनी नोकरी करावी का ?

गरोदरपण हे आजारपण नसून हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सहाजिकच गरोदरपणात तुम्ही तुमची दैनंदिन कामे आणि नोकरी नक्कीच करू शकता. काही ठराविक बाबतीत काळजी घेऊन या काळात नोकरी करण्यास काहीच हरकत नाही.

3. गरोदरपणी किती वजन वाढणे योग्य आहे ?

प्रत्येकीचे वजन, शारीरिक रचना, आरोग्य यानुसार गरोदरपणात तिचे वजन किती असावे हे ठरू शकते. तुमचे डॉक्टर तुमच्या आणि बाळाच्या आरोग्याची स्थिती पाहून ते सांगू शकतात. मात्र गरोदरपणात स्त्रीचे अंदाचे दहा ते पंधरा किलो वजन वाढू शकते.

4. गरोदरपणात सेक्स करणे सुरक्षित आहे का ?

गरोदरपणात सेक्स करावा की नाही याबाबत अनेकांची अनेक मते असू शकतात. काहींच्या मते जर तुमची आरोग्य स्थिती चांगली असेल आणि बाळाला कोणताच धोका नसेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये सेक्स करण्यास काहीच हरकत नसते. मात्र ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असू शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

गरोदरपणानंतर घ्यावा शेक

नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी

डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत हसत खेळत करा ‘हे’ व्यायाम

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना या ‘25’ गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये अवश्य ठेवा

जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता

गरोदर महिलांसाठी सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय (Pregnancy Madhe Sardi Khokla Var Upay)

How To Deal With Morning Sickness During Pregnancy In Marathi

3rd Month Pregnancy In Marathi

गरोदरपणाच्या पाचव्या महिन्याची माहिती