हॉटेलमधून ग्रेव्ही किंवा भातासारखे पदार्थ ऑर्डर केल्यानंतर ते प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये येतात. मध्यंतरीच्या काळात प्लास्टिकंबदी आल्यामुळे प्लास्टिकच्या डब्यांना पुठ्ठ्याच्या अॅल्युमिनिअम फॉईलच्या डब्यांनी रिप्लेस केलं होतं. पण आता पुन्हा लहान- मोठे असे प्लास्टिकचे डब्बे सर्रास ऑर्डर आल्यानंतर येतात. अनेक जण यातील पदार्थ खाऊन झाले की, त्या डब्यांना केराची टोपली दाखवतात. पण काही जण त्याचा पुरेपूर उपयोग करतात. तुमच्याकडेही असे खूप डबे साचून असतील तर तुम्हीही त्याचा उपयोग आम्ही सांगत आहोत त्याप्रमाणे करु शकता.
मिक्स डाळींपासून बनवा या हेल्दी रेसिपीज
भाज्या, कोथिंबीर राहतात फ्रेश
काही हॉटेलमधून आलेले डबे इतके छान असतात की, ते टाकण्याची इच्छा अजिबात होत नाही. ते स्वच्छ करुन बरेचदा आपल्या किचन ट्रॉलीमध्ये इकडे तिकडे पडून असतात. जर तुम्हाला त्यांचा योग्य वापर करुन ते फेकायचे असतील तर तुम्ही त्याचा उपयोग चिरलेली भाजी, कडिपत्ता, कोथिंबीर, मिरची ठेवण्यासाठी करु शकता. कारण हे डब्बे एअरटाईट असल्यामुळे त्यांच्यामध्ये या सगळ्या ओल्या गोष्टी अगदी छान राहतात. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही तुमचे फ्रिज कंटेनर म्हणून करु शकता.
रोपे लावण्याचा बेस्ट पर्याय
हल्ली अनेक सोसायची मातीच्या मोठमोठ्या कुंड्या खिडक्यांमध्ये ठेवू देत नाही. अशावेळी गार्डनिंगची हौस असणाऱ्यांचा हिरमोड होतो. अशावेळी जर तुम्हाला लहान लहान रोपे तयार करायची असेल तर तुम्ही या प्लास्टिकच्या डब्यांचा उपयोग करा. यामध्ये माती किंवा कोकोपीठ कमी लागते. तुम्ही यामध्ये पुदिना, कडिपत्ता, मिरची, मिनी गुलाब अशा काही झाडांची रोपे लावू शकता. (ही झाडं वाढल्यानंतर तुम्ही ती तुमच्या मोठ्या प्लास्टिकच्या कुंड्यामध्ये लावू शकता.)
नखांशिवाय नेलपेंटचा असाही होऊ शकतो वापर
कडधान्य भिजवण्यासाठी फायद्याचे
प्रत्येक घरात कडधान्य भिजत घातली जातात. आता कडधान्य भिजत घालण्यासाठी आपण एखादे स्टीलचे पातेले किंवा डबा वापरतो. जर तुमच्याकडे प्लास्टिकचे डबे असतील तर तुम्ही त्याचा उपयोग करुन शकता. प्लास्टिकच्या डब्यात कडधान्य भिजत घालू शकता. त्याच डब्यात तुम्हाला पाणी काढून कडधान्यांना मोड आणता येते. एअर टाईड कंटेनरमुळे कडधान्यांना मोडही अत्यंत चांगल्या पद्धतीने येतात.
प्रवासात नेण्याचा चांगला पर्याय
घरात कितीही चांगले डबे असले तरी प्रवासात आई आपल्याला चांगले महागातले प्लास्टिकचे डबे घेऊन जायला देत नाही. पण पिकनिक किंवा मोठ्या प्रवासासाठी निघताना आपल्याला अनेकदा आपल्या बॅगमध्ये आवळासुपारी,चॉकलेट, खजूर, ड्रायफ्रुट असे सवयीचा भाग म्हणून ठेवायचे असते. किंवा काहींना प्रवासात गाडी लागण्याचा त्रास असतो. अशावेळी एखाद्या छोटेखानी डब्यात आपलेल्या गोळ्या ठेवायच्या असतात. त्यासाठीही हा डबा उत्तम आहे. कारण हा डबा हरवला तरी फारसा फरक पडत नाही. शिवाय प्रवासामध्ये तुमच्याकडे असा एक रिकामी डबा बॅगमध्ये हवाच याचे कारण असे की, ट्रेकिंग किंवा मोठ्या प्रवासात अनेकदा आपण बाहेर खातो. पार्सल घेतो. सोबत प्लेट घेणे नेहमीच शक्य नसते. अशावेळी अशा एअरटाईट डब्यांमध्ये तुम्ही तुमचे पदार्थ ठेवू शकता. एकाचवेळी सगळे खाता आले नाही तरी तुम्हाला ते एअरटाईट बंद केल्यामुळे नंतर खाता येतात.
तर तुम्ही अशापद्धतीने घरी आलेल्या प्लास्टिकच्या डब्यांचा वापर करु शकता. पण हे करताना तुमचे प्लास्टिक कोणत्या क्वालिटीचे आहे ते बघा. ते किती दिवस वापरायचे तेही बघा.म्हणजे तुम्हाला त्याचा आणखी कोणत्या पद्धतीने वापर करायचा ते कळेल.
बाळंतपणानंतर स्ट्रेचमार्क्स दूर करण्यासाठी असा वापर करा कॉफीचा