काही नाती जेव्हा जुळतात तेव्हा ती फारचं सुंदर असतात. पण जेव्हा माणसांचं खरं रूप समोर येतं तेव्हा ते नातं किती पोकळं होतं ते कळतं. अशीच एक सुंदर दिसणारी पण सत्यपरिस्थितीत वेगळ्याच वळणावर पोचलेली #MyStory आज घेऊन आलो आहोत. नताशा एक शिकलेली आणि चांगल्या घराण्यातील मुलगी असूनही अविनाशच्या कुटुंबाने तिला accept केलं नाही. कारण जाणून घेण्यासाठी वाचा आजची #MyStory.
नात्याची सुंदर सुरूवात
माझा स्वभाव आधीपासूनच खूप रोमँंटीक होता. त्यामुळे माझ्या प्रत्येक रिलेशनशिपमध्ये मी बुडून जायचे. सुरूवातीच्या माझ्या काही रिलेशनशिपबाबत माझं नशीब चांगलं नव्हतं. अनेकवेळा माझं मन दुखावलं गेलं, ब्रेकअप झाला. पण नंतर माझी भेट अविनाशशी झाली. आम्ही दोघंही एकत्र पोस्ट ग्रॅज्युएशनला होतो. आम्ही दोघंही आमच्या कुटुंबापासून लांब राहत होतो. त्यामुळे जवळपास रोज आमचा दिवस एकत्र जायचा. आम्ही सतत एकत्रच असायचो. मला तर असं वाटू लागलं होतं की, माझं स्वप्न खरं झालं.
Shutterstock
रिलेशनशिपमध्ये काही वेळ राहिल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की, आता आपापल्या घरच्यांना या नात्याबाबत सांगायला हवं म्हणजे गोष्टी पुढे जातील. माझे आईबाब दोघंही वेगवेगळ्या community मधून होते आणि त्यांनी मलाही सांगितलं होतं की, त्यांना या गोष्टींबाबत काहीच problem नाही की, जर माझीही दुसऱ्या धर्माच्या किंवा जातीच्या मुलाशी लग्न करायची इच्छा असेल. पण अविनाश एका typical महाराष्ट्रीयन कुटुंबातला होता. जिथे धर्म आणि जातीला खूप importance दिला जायचा. पण त्याने मला विश्वास दिला की, त्याचे आईबाबा खूपच पुढारलेले आहेत आणि त्यांना मी ख्रिश्चन असले तरी काहीच प्रोब्लेम होणार नाही
जेव्हा नात्याची कुरूपता समोर आली…
सेमिस्टर ब्रेकमध्ये आम्ही दोघंही आपापल्या घरी गेलो आणि आम्ही पक्कं केलं होतं की, आमच्या future plans बाबत आमच्या पेरेंट्सना सगळं सांगून टाकायचं. माझ्या आईबाबांशी मी याबाबत मोकळेपणाने चर्चा केली. त्यांना माझ्या choice वर भरोसा होता आणि त्यांनी लगेचच होकार दिला. माझ्या पेरेंट्सनी होकार देताच ही चांगली बातमी देण्यासाठी फोन हातात घेतला. तेव्हा आधीच अविशानचा WhatsApp message आलेला होता. “मी माझ्या बाबांशी बोलायला जात आहे. तुझ्याशी थोड्या वेळाने बोलतो. <3”. मी पूर्ण दिवस त्याच्या फोन आणि मेसेजची वाट पाहात राहिले. पण ना त्याचा फोन आला ना काही मेसेज. पुढचाही संपूर्ण दिवस वाट पाहण्यात गेला. तो मी पाठवलेले मेसेजेसही वाचत नव्हता. अखेर तीन दिवसांनी मी त्याला कॉल केला. जसा त्याने फोन उचलला आणि हॅलो म्हटलं तसं मी बोलायला सुरूवात केला की, “गेले तीन दिवस मी त्याच्या फोन आणि मेसेजची वाट पाहत आहे. त्याच्या मनात एकदाही माझ्याबद्दल विचार आला नाही का.” हे सर्व ऐकून त्याने फक्त एवढंच म्हटलं की, “नताशा… आपण हे नातं पुढे नेऊ शकत नाही.” मला तर धक्काच बसला. या आधी मीही कधी माझ्या आईबाबांशी कोणत्याही रिलेशनशिपबाबत काही बोलले नव्हते. त्यामुळे ते दोघंही अविनाशबाबत खूपच excited होतं. पण आता मला काय करावं काहीच कळत नव्हतं. लहानपणी माझ्या चेहऱ्यावर जोरात बास्केटबॉल लागला होता. आत्ताही मला तसंच फील होत होतं. मला काय होतंय काहीच कळायला मार्ग नव्हता.
Shutterstock
मी त्याला विचारलं की, का असं बोलतोयस. काय झालं? तो खूप हळू आवाजात म्हणाला की, त्याच्या बाबांना मी ख्रिश्चन असल्यामुळे प्रोब्लेम आहे आणि जर अविनाशचं लग्न माझ्याशी झालं तर समाजात त्यांची नाचक्की होईल. त्यांची समाजात असलेली पत धूळीला मिळेल. मी हैराण झाले. माझी जडणघडण एका अशा कुटुंबात झाली होती जिथे धर्म आणि जातीला एकाच नजरेने पाहायलं जायचं. त्यामुळे माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की, आजही समाजातील सुशिक्षित लोकं असा विचार करतात. तो पुढे सांगू लागला की, “तुझं ख्रिश्चन असणं मोठा प्रोब्लेम नाहीयं. खरंतर मी माझ्या बाबांना नाही म्हणू शकत नाही कारण तू आमच्या कुटुंबासाठी योग्यही नाहीस. कारण तू जास्त गोरी नाहीस.” मी हे ऐकताच लगेच फोन ठेवला. कारण अशा लोकांशी बोलून काहीच अर्थ नव्हता. कारण ते आजही 18 व्या शतकातच जगत होते. त्यानंतर अविनाशने मला शंभर वेळा फोन केला पण मी एकदाही फोन उचलला नाही. माझं मन त्याने तोडलं होतं. एक खूप चांगलं नातं एका फालतू गोष्टीमुळे तुटलं होतं. मला खात्री आहे की, एक दिवस त्याला अशी मुलगी मिळेल जी त्याच्या कुटुंबाला शोभण्याएवढी गोरी असेल.
नवी सुरूवात…
सध्या मी सिंगलच आहे आणि खूप जास्त आनंदीही आहे. नुकतंच मी युरोपची सोलो ट्रीप करून आले. आता त्या दिवसांबाबत विचार केल्यावर वाटतं की, खरंच तो क्षण माझ्या आयुष्यातील टर्निंग पाँईट होता. तसंही माझ्यासारखी independent विचारांची मुलगी त्यांच्यासारख्या narrow minded लोकांमध्ये अॅडजस्ट होऊ शकली नसती. त्यामुळे मी आज अविनाशसोबत नसूनही खूश आहे.
Giphy
आजही आपल्या समाजात धर्म आणि जातींना लग्नाच्याबाबतीत अग्रगण्य महत्त्व आहेच. पण त्याहीपेक्षा मुलगी दिसायला गोरी आहे की नाही याबाबत अजूनही चिकित्सा केली जाते. खरंतर मुलीच्या दिसण्याबाबत आणि गोरी आहे की नाही यावरून तिला निवडण्यापेक्षा ती स्वभावाने कशी आहे, हे खरं परिमाण असलं पाहिजे. समाजात अशा अविनाशची गरज आहे, जो आपल्याला आवडणाऱ्या मुलीतील चांगले गुण आईबाबांसमोर ठामपणे मांडून तिला सून म्हणून घरी आणेल. ज्या दिवशी असे अविनाश समाजात असतील त्या दिवशी प्रत्येक नताशाला अभिमानाने समाजात वावरता येईल.
#MyStory : माझं पहिलं प्रेम जे कधीच….#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….