ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Home Business Ideas in Marathi

असा सुरू करा घरगुती व्यवसाय, सहज सोप्या कल्पना (Home Business Ideas in Marathi)

किती वर्ष नोकरी करणार आता काहीतरी स्वतःचं करायला हवं असा विचार कधी ना कधीतरी आपल्या प्रत्येकाच्या मनात येतोच. पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे नक्की कोणता व्यवसाय करायचा (Business Ideas In Marathi), घरगुती व्यवसाय कोणता करावा (Home Business Ideas In Marathi), घरगुती व्यवसाय यादी कशी काढायची, भांडवल कसे उभे करायचे आणि यातून आपण आपला व्यवसाय कसा वाढवायचा हे सगळेच प्रश्न उपस्थित होतात. व्यवसाय करणे हे नक्कीच सोपे काम नाही. पण अशक्यही नाही. यासाठी महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून तुम्हाला देत आहोत. तुम्हीही व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहात असाल तर त्यासाठी नक्की काय करायचे, घरगुती व्यवसाय महिलांसाठी (New Business Ideas In Marathi) अनेक असतात तर त्यासाठी हे स्वप्न कसे उभे करायचे याची एक लहानशी सुरूवात तुम्ही नक्कीच हा लेख वाचून करू शकता. मुळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही कल्पना लागतात. अशाच काही सहज सोप्या कल्पना खास तुमच्यासाठी.

ऑनलाईन बिझनेस आयडिया मराठीत (Online Small Business Ideas In Marathi)

Business Ideas In Marathi

Online Business Ideas In Marathi

सध्या कोणताही व्यवसाय करायचा म्हटला की भांडवल महत्त्वाचे ठरते. पण त्यातही तुम्ही ऑनलाईन स्मॉल बिझनेस आयडियांचा नक्कीच विचार करू शकता. अनेक असे ऑनलाईन बिझनेस अर्थात उद्योग आहेत जे तुम्हाला आपल्या इतर कामांसह करता येतात. अगदी घरातील गृहिणीही याचा फायदा घेऊ शकतात. मात्र याची योग्य माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. आजची तरूण पिढी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाकडे जास्त कल देऊ लागली आहे. यातून खूपच चांगला नफा मिळवता येतो. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय तुम्ही ऑनलाईन व्यवसाय सुरू करू शकता. आपल्याला केवळ त्यातील काही तांत्रिक कौशल्ये आणि इंटरनेट वापरण्याची माहिती रितसर शिकून घेण्याची गरज आहे. तसंच तुम्हाला ऑनलाईन बँकिंग व्यवहारदेखील जमायला हवेत. यामध्ये तुम्ही ऑनलाईट डेटा एंट्री जॉब (Online Data Entry Job), ऑनलाईन फळं, फुलं विकणे अथवा अगदी लहानसा कपड्यांचा व्यवसाय अथवा कोणत्याही ग्रोसरीच्या व्यवसायाचा नक्कीच विचार करू शकता. याशिवाय तुमचा एखादा फूड ऑनलाईन बिझनेस (Online Food Business) करण्याचा विचार असेल तर तुम्ही त्याचाही विचार यासाठी करू शकता. तसंच ऑनलाईन गिफ्टची विक्रीही तुम्ही करू शकता. 

शेअर्सचे ट्रेडिंग (Share Trading Business Ideas In Marathi)

Share Trading Business Ideas In Marathi

Share Trading Business Ideas In Marathi

ADVERTISEMENT

शेअर्समध्ये पैसे गुंतवणे हे सामान्य माणसाला नेहमीच जोखमीचे काम वाटते. कारण शेअर बाजार आणि त्यातील नफा आणि तोटा याची माहिती शक्यतो सर्वांना नसते. पण तरीही काही जणांना शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असते. मग अशावेळी जर तुम्हाला या गोष्टीची योग्य माहिती असेल तर तुम्ही शेअर्सचे ट्रेडिंग ऑनलाईन करण्याचा व्यवसायही करू शकता. शेअर्समधील गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एक परवाना लागतो. हा परवाना एकदा काढल्यानंतर शेअर्समधील उलाढाल करण्यासाठी तुम्ही एजंट म्हणून उत्कृष्ट काम करू शकता. यातून मिळणारा नफा हादेखील चांगला असतो. तुमच्या डोक्यात एखादा लहानसा व्यवसाय करायचे असेल तर तुम्ही या कामापासून नक्कीच सुरूवात करू शकता.

बेबी सिटींग व्यवसाय (Babysitting Business Ideas In Marathi)

Babysitting Business Ideas In Marathi

Babysitting Business Ideas In Marathi

आजकाल घरामध्ये आई आणि वडील हे दोघेही नोकरी करणारे असतात. त्यामुळे आपल्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना कोणीतरी खात्रीशीर आणि चांगली व्यक्ती लागते. त्यामुळे तुम्हाला जर मुलं सांभाळण्याचा चांगला अनुभव असेल तर तुम्ही डे केअर सेंटर (Day Care Centre) अथवा बेबी सिटिंग व्यवसाय (Gharguti Vyavsay In Marathi) नक्कीच चालू करू शकता. पैसे कमावण्याचा हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी आहे. तुम्ही अगदी घरातील सर्व कामे सांभाळूनही हा व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता भासत नाही. तुम्ही घरापासूनही याची सुरूवात करू शकता अथवा तुम्ही त्यासाठी जागा शोधूनही हा व्यवसाय पुढे वाढवू शकता.

वाचा – घरगुती व्यवसाय महिलांसाठी

ADVERTISEMENT

लघु उद्योग माहिती (Selling Old Goods Online Home Business Ideas in Marathi)

लघु उद्योगासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना तुम्हाला उपयोगी ठरतील. अशा लघु उद्योगांसाठी (Laghu Udyog In Marathi) विविध बँक्स, नाबार्ड याच्या माध्यमातून अनेक योजना आणि आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळते. तसंच यातून अनेक सवलतीही तुमच्या उद्योगासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. शेतीचा विकास, प्रशिक्षण, उत्पादनासाठी विपणन (Product Marketing), ग्रामीण कारागिरांसाठी विविध व्यवसाय, जुन्या गोष्टी ऑनलाईन विकणे या सर्वासाठी अनेक गटांना आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यात येते. आवश्यक ते कागदपत्र तुम्ही सोपविल्यास, तुम्हाला प्रकल्प खर्चाच्या 70-80 टक्के कर्ज हे बँकांकडून मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या लघुउद्योगासाठी याचा वापरही करून घेऊ शकता. तसंच यासाठी लागणारे भांडवल, कच्चा माल, बाजारपेठ, ग्राहक आणि विक्री हे सर्व मुख्य घटक आहेत आणि याचा अभ्यास करूनच मग तुम्ही यामध्ये उतरावे ही अपेक्षा असते. त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही तुम्हाला यापैकी नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे ते मनाशी पक्के ठरवून यात उतरा. व्यवसायातील बारकावे, यश आणि अपयश याचे सखोल ज्ञान घ्या आणि मोठ्यांचा सल्ला घेऊन तंत्रज्ञानाची योग्य माहिती घेऊन त्यानुसार आपल्या उद्योगाला चालना द्या.

वाचा – घरगुती पॅकिंग व्यवसाय कसा सुरु करावा

वेबसाईट डिझाईन कंपनी (Website Design Business Ideas In Marathi)

सध्या प्रत्येक गोष्टीसाठी डिजीटल वेब ही एक गरज झाली आहे. कोणत्याही कंपनीसाठी संकेतस्थळ अर्थात वेबसाईट असणे आणि ती डिझाईन करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही वेबसाईट डिझाईनचा लघु उद्योग सुरू करू शकता. बरेचदा वेबसाईट डिझाईन हे महाग वाटते. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने हाताळत योग्य दरात समोरच्या कंपनीला डिझाईन करू दिल्यास, तुमचा हा उद्योग अधिक चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो. बाजारामध्ये इतर कंपनी किती कोट करत आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात आपल्या उत्पन्नाचा कोट ठरवू शकता. सध्या हा व्यवसाय ट्रेंडमध्ये आहे.

बिझनेस प्रमोशन (Business Promotion Ideas In Marathi)

Home Business Ideas in Marathi

Home Business Ideas In Marathi

ADVERTISEMENT

कोणत्याही व्यवसायाला मोठे करायचे असेल तर त्याचे प्रमोशन करता येणे गरजेचे आहे. सध्या कोणतीही गोष्ट सोशली जास्तीत जास्त दाखवणे गरजेचे असते. मग तुम्ही त्यानुसार बिझनेस प्रमोशनचा व्यवसायही करू शकता. कोणत्याही कंपनीसाठी त्याचा पीआर (Public Relation) अथवा त्या कंपनीचे सोशल मीडिया हँडल करणे आणि कंपनीच्या उत्पानांबाबत अधिकाधिक प्रमोशन करण्याचा व्यवसाय हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. तसंच तुम्ही यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management) देखील करू शकता. तुम्हाला यातून नक्कीच चांगले उत्पन्न मिळते. मात्र तुम्हाला याचे व्यवस्थित प्रशिक्षण असायला हवे.

टिफीनचा घरगुती व्यवसाय महिलांसाठी (Tiffin Service Business Ideas In Marathi)

Tiffin Service Business Ideas In Marathi

Tiffin Service Business Ideas In Marathi

माणसाला सतत भूक लागतच असते आणि खाण्याचा व्यवसाय कधीच मरत नसतो. तुम्हाला जर स्वयंपाक करण्याची आवड असेल आणि तुमच्या हाताला चांगली चव असेल तर हा लघु उद्योग तुम्हाला नेहमीच साथ देतो. तुमच्यासाठी ही आवड आणि व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. अगदी लहान आणि मोठ्या दोन्ही स्तरांवर हा व्यवसाय करण्यात येऊ शकतो. घरगुती जेवणापासून ते अगदी हॉटेलमध्ये जेवण पुरविण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही स्वरूपात हा व्यवसाय करू शकता. नोकरी करणाऱ्यांना टिफिनची गरज भासतेच. त्यामुळे टिफिन सर्व्हिस अथवा टिफिन सर्व्हिसची सध्या खूपच भासत आहे. त्यामुळे यातून नफा मिळवणे सहज शक्य होते.

फिटनेस अथवा योगा ट्रेनर (Fitness Trainer and Yoga Business In Marathi)

Trainer and Yoga Business In Marathi

Trainer and Yoga Business In Marathi

ADVERTISEMENT

आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे शरीराला व्यायामाची आणि निरोगी राखण्याची खूपच गरज आहे. तुम्ही त्यासाठी योगा अथवा फिटनेसमध्ये करिअर करण्याचा अथवा हा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे. लोकांचे आता आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष असते. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत ट्रेनरचीही आवश्यकता भासते. योग्य प्रकारे व्यायाम करून घेणे आणि योग्य डाएट देणे हे उत्तम ट्रेनर करून घेऊ शकतो. त्यामुळे सध्या फिटनेस ट्रेनिंग सेंटर अथवा योग वर्ग हा व्यवसायही अधिक चांगला बळावला आहे. योग केवळ शारीरिर संतुलनच नाही तर तुम्हाला मानसिक संतुलनासाठी ही फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही अगदी 500 रूपयांपासून ते अधिकाधिक शुल्क आकारू शकता. आपल्या कुवतीनुसार तुम्ही फिटनेस क्लास घेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. तसंच तुम्ही अगदी घरोघरी जाऊनही ही सेवा देऊ शकता. तुम्हाला सेंटर उघडण्यासाठी सध्या भांडवल नसेल तर तुम्ही घरोघरी जाऊन ट्रेनिंग देऊ शकता. या व्यवसायातून सहज कमाई होते.

व्यक्तीगत शिकवणी मुलांकरिता (Personal Tutor For Children)

Home Business Ideas in Marathi

Personal Tutor – Home Business Ideas in Marathi

आजकाल सगळेच आपल्या नोकरीमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य शिकवण मिळावी म्हणून एखाद्या चांगल्या ट्युटरची गरज सर्वच पालकांना असते. कोणत्याही गुंतवणुकीशिवाय तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ट्युटोरिंग बिझनेस आयडिया तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला जर शिकवण्याचे तंत्र अवगत असेल आणि तुम्हाला शिकविण्याची आवड असेल तर तुम्ही घरच्या घरीही मुलांसाठी शिकवणी घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायात कधीही मंदी येत नाही. शिक्षण हे कायम चालूच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला कधीही शिकवणीसाठी मुलांची कमतरता भासणार नाही. तुमचा अनुभव जसा वाढत जाईल आणि मुलं जशी वाढत जातील त्यानुसार तुम्ही कोचिंग क्लासदेखील काढू शकता. होम ट्यूटर म्हणून हल्ली गणित, सायन्स या विषयांसाठी खूपच मागणी आहेत. त्यामुळे तुम्ही कमी कालावधीत चांगली कमाई करू शकता. तसंच तुम्ही जर चांगले शिक्षक असाल तर तुम्हाला लवकरच यातून चांगले उत्पन्नही मिळू शकते. याशिवाय तुम्ही डान्स कोचिंग क्लास, मेंदी अशा अनेक आर्ट्सचे कोचिंग क्लासही घेऊ शकता.

ऑनलाईन मेकअप ट्युटोरियल (Makeup Tutorial Online Business In Marathi)

New Business Ideas in Marathi

New Business Ideas in Marathi

ADVERTISEMENT

ब्युटी पार्लर काढणे तसे प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण तुम्हाला सौंदर्यप्रसाधनांची आवड असेल आणि मेकअप कसा करायचा हे माहीत असेल आणि इतरांनाही याचा कसा वापर करायचा हे शिकवता येत असेल तर तुम्ही ऑनलाईन मेकअप ट्युटोरियल क्लास घेऊ शकता. सध्या या क्लासचा ट्रेंड आहे. हा व्यवसायही तुम्हाला नक्कीच लहानशा उद्योगाची चालना मिळवून देऊ शकतो. सुंदर दिसायला सर्वांनाच आवडते आणि सगळ्यांना सतत पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करता येत नाहीत. मग अशावेळी तुम्ही ऑनलाईन मेकअप ट्युटोरियलचा वापर करू शकता. त्यामुळे आजच्या काळातील याची मागणी लक्षात घेऊन तुम्ही नक्कीच हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलही जास्त लागत नाही आणि त्याशिवाय यातून कमाईही चांगली होते.

ऑनलाईन केक बेकिंग (Cake Bake Online Business Ideas In Marathi)

Cake Bake Online Business Ideas In Marathi

Cake Bake Online Business Ideas In Marathi

बाहेरून केक आणायचा म्हटला की, त्याचे अव्वाच्या सव्वा भाव ऐकून नक्कीच डोळे पांढरे होतात. केकच्या रेसिपी बनवायला आपल्याला आवडतेच पण तुम्हाला आता ठिकठिकाणी ऑनलाईन केक बेकिंग दिसून येईल. हा एक उत्तम व्यवसाय आहे. घरगुती व्यवसायाच्या कल्पनांमध्ये (Homemade Business Ideas In Marathi) अथवा घरच्या घरी राहून ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा गृहिणींसाठी ही उत्तम व्यवसायाची कल्पना (Home Business Ideas For Ladies In Marathi) आहे. केक घरच्या घरी बनविणे हे नेहमीच आपल्याला कठीण वाटते. पण अशा व्यवसायातून अधिक ज्ञान तुम्हाला देता येते. त्याशिवाय ऑनलाईन क्लासमधून पटकन शिकवताही येते आणि दर आठवड्याला दोन सेशन केले तरीही तुम्हाला त्यातून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे सहज आणि पटकन होणारा तसंच कमी भांडवल लागणारा असा हा घरगुती व्यवसाय आहे. 

प्रश्नोत्तरे (FAQ)

1. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणती गोष्ट लक्षात घ्यायला हवी ?

कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या व्यवसायातून किती आणि कसा फायदा होईल हे पाहणे सर्वात महत्त्वाचे आहे. तसंच आपण स्वतः या व्यवसायात किती झोकून देऊ शकतो हेदेखील पडताळणी करायला हवी. कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहून व्यवसाय करता येत नाही.

2. टी शर्ट व्यवसाय करायचा ठरवल्यास फायदा आहे का ?

टी शर्टवर प्रिंट करून अनेक ठिकाणी मिळतात आणि हा अत्यंत चांगला आणि नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. बऱ्याच सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा कार्यक्रमांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. इतकंच काय अगदी लहानसहान वाढदिवसांसाठीही याचा उपयोग करून घेता येतो.

3. महिलांना व्यवसायासाठी काही खास उपाययोजना आहेत का ?

लघु उद्योगांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्याही अनेक योजना महिलांसाठी राबविण्यात आल्या आहेत. उद्योग करण्यासाठी महिलांनी पुढे यावे यासाठीच या योजना असून त्याचा लाभ घेता येईल.

तुम्हालाही कोणता व्यवसाय सुरू करावासा वाटत असेल तर यापैकी काही पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता. तुमची आवड काय आहे त्यानुसार तुम्ही हे व्यवसाय सुरू करा.

ADVERTISEMENT
17 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT