ADVERTISEMENT
home / मनोरंजन
होम मिनिस्टरमध्ये आता रंगणार नणंद- जावेची जुगलबंदी

होम मिनिस्टरमध्ये आता रंगणार नणंद- जावेची जुगलबंदी

मराठी गेम शोमधील सगळ्यात आवडता असा गेम शो म्हणजे ‘होम मिनिस्टर’ गेली कित्येक वर्ष हा शो खूप जणांच्या आवडीचा आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात याची क्रेझ आहे. जिथे जिथे मराठी कुटुंब तिथे तिथे हा खेळ जाऊन पोहोचला आहे. त्यामुळेच की काय जगभरातील लोकांनी हा गेम शो पाहिला आहे. यात जिंकणाऱ्या साड्यांची राणी पैठणीचा मान मिळतो. आता या गेम शोमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे. कारण याचे एक नवे पर्व नुकतेच सुरु झाले आहे. या नव्या पर्वात आता सासरच्या सगळ्यांनाच पैठणी जिंकण्याचा मान मिळणार आहे. सासू, नणंद, सून, वहिनी या सगळ्यांनाच पैठणीचा मान मिळणार आहे. त्यामुळे आता यामध्ये एक वेगळीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

अटक झालेल्या हिना पांचाळला कुटुंबियांचा पाठींबा

असे असणार नवे पर्व

होम मिनिस्टरमध्ये आतापर्यंत अनेक नवे पर्व आपण सगळ्यांनी पाहिले आहे. आताही एक वेगळे पर्व सुरु झाले आहे. आता या पर्वामध्ये सासरच्या सगळ्या महिलांमध्ये हा गेम शो रंगणार आहे. एकाच घरातील सासू, नणंद, जाऊ यांना एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत. खेळामध्ये एकमेकांना हरवून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी जिंकता येणार आहे. इतकेच नाही. तर त्यातूनच जिंकलेल्यांना पैठणीचा मान देखी मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबातील एकमेकांच्या विरोधातच उभे राहावे लागणार आहे. एकमेकांबद्दल अधिक जाणून घेताना एक वेगळीच मजा या  खेळामध्ये येणार आहेत. 

रणवीर सिंहच्या या लुकची सगळीकडे चर्चा, आता केलाय असा अवतार

ADVERTISEMENT

नव्या पर्वात नवी धमाल

होम मिनिस्टरमध्ये आतापर्यंत अनेक पर्व आले आहेत.  या  प्रत्येक पर्वात सहभागी होणाऱ्या  महिलांचे कुुंटुबिय देखील वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी झाले आहेत. त्यामुळे नेहमीच या पर्वाची मजा वेगळी असते. सासू- सूनांशी संवाद साधताना घरातील इतरांची मतं जाणून घेतल्यामुळे आनंद हा थोडा वेगळाच असतो. त्यामुळेच हा शो गेल्या कित्येक वर्षांपासून  मनावर राज्य करुन आहे. आता या नव्या पर्वाची सुरुवात वटपौर्णिमेपासून झाली असून आता या पर्वाचा आनंदही अनेक जण घेत आहेत. 

शिल्पा शेट्टीने घेतली सुपरडान्सरच्या गुरूची फिरकी, उलटवली चाल

घरी जाऊन सुरु झाला गेम शो

 होम मिनिस्टर हा गेम शो लॉकडाऊनच्या काळात बंद होता. शूटिंहला परवानगी मिळाल्यानंतर  हा गेम शो ऑनलाईन पद्धतीने सुरु झाला होता.  घरीच बसून कॅमेरा सेट करुन हा गेम शो सुरु झाला होता. अत्यंत साध्यापद्धतीने हा शो सुरु झाला तरी देखील याची प्रसिद्धी अजिबात कमी झाली नाही. आता सगळे काही पुन्हा पूर्वपदावर आल्यानंतर आता हा शो घरोघरी जाऊन पुन्हा एकदा सुरु झाला आहे. त्यामुळे आता हा शो परत एकदा जुन्या पद्धतीने घरी जाऊन शूट केला जात आहे. त्यामुळे आता या खेळाची मजा आणखीनच जास्त वाढलेली आहे. या नव्या पर्वामध्ये कुटुंबातच हा गेम शो पार पडणार असल्यामुळे एक वेगळाच आनंद साजरा करता येणार आहे. ॉ

तुम्ही अजूनही हे नवे पर्व पाहिले नसेल तर पाहा आणि पैठणीचा मान मिळवण्यासाठी यामध्ये सहभागी व्हा.

ADVERTISEMENT
01 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT