ADVERTISEMENT
home / आरोग्य
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Cholesterol)

कोलेस्ट्रॉल वाढले असेल अथवा कॉलेस्टेरॉल वाढू देऊ नकोस असे अनेकदा आपल्या कानावर येत असते. पण कोलेस्ट्रॉल म्हणजे काय (what is cholesterol) आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे काय आहेत याबाबत तुम्हाला माहीत आहे का? आपल्या शरीरातील नर्व्हेस सिस्टिमचे सुरक्षा कवच आणि हार्मोन्स निर्माण करण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका असते. रक्तामध्ये चरबी मिक्स होते तेव्हा कोलेस्ट्रॉल तयार होते. आपल्या शरीरामध्ये दोन स्वरूपाचे कोलेस्टेरॉल असते. एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन – चांगले कोलेस्टेरॉल) आणि एक एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, वाईट कोलेस्टेरॉल). शरीरासाठी चांगले कोलेस्टेरॉल फायदेशीर ठरते. हे अत्यंत हलके असते आणि आपल्या रक्तातील साठलेली चरबी वाहून नेण्यास मदत करते. मात्र वाईट कोलेस्टेरॉल हे शरीराला नक्कीच हानिकारक ठरते. यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे एचडीएल 60 मिलीग्रॅमपेक्षा अधिक आणि एलडीएल हे 100 मिलीग्रॅमपेक्षा कमी असायला हवे. या लेखातून आपण कोलेस्टेरॉलची लक्षणे (cholesterol symptoms in marathi), कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे आणि कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे (how to reduce cholesterol in marathi) याचे घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) जाणून घेणार आहोत. 

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे (Cause Of Cholesterol In Marathi)

cholesterol kami karnyache upay
cause of cholesterol in marathi

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे जेव्हा आपण शोधू लागतो तेव्हा समजते की, असंतुलित आहार आणि चुकीची दिनचर्या हे मुख्य कारण आहे. कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे नक्की काय आहेत ते आधी जाणून घेऊया – 

असंतुलित आहार – शरीरातीर संपूर्ण चरबीचा वापर शरीरामध्ये होऊ लागला तर कोलेस्ट्रॉल निर्माण होऊ लागते. ज्या आहारामध्ये जास्त चरबी असते त्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात निर्माण होते. तुम्ही जर कोलेस्टेरॉल कमी करण्यसाठी घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) शोधत असाल तर तुम्ही सर्वात पहिले लाल मांस, बटर, पनीर, केक, तूप असे अधिक चरबीयुक्त पदार्थ खाणे कमी करायला हवे. सध्याच्या आयुष्यात अनेकांच्या जेवणाची वेळ योग्य राहिलेली नाही. तसंच योग्य आहारही घेतला जात नाही. असंतुलित आहारामुळेच कोलेस्ट्रॉल वाढीला लागते. 

आनुवंशिक कारण – तुमच्या कुटुंबात जर कोणाला उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रकृतीबाबत चिंता करावी लागेल. कारण हा एक आनुवंशिक आजार आहे. कोलेस्ट्रॉलमुळे वेळेआधी ब्लॉकेज आणि स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. त्यामुळे घरात कोणालाही हा आजार असेल तर तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला हवे. 

ADVERTISEMENT

तणाव – आजकालच्या कामामध्ये आणि आयुष्यात प्रत्येकालाच तणाव असतो. तणावापासून सुटका मिळविण्यासाठी अनेक जण सिगारेट स्मोकिंग अर्थात धुम्रपान करणे, दारूचे सेवन आणि फास्टफूड खाणे याकडे अधिक कल दिसून येतो. पण यामुळे तणाव कमी होत नाही तर तणावासह तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढीला लागलेले दिसून येते. 

दारूचे सेवन – दारूचे अधिक सेवन हे लिव्हर अर्थात यकृत आणि हृदयाच्या मांसपेशींना अधिक नुकसान पोहचवते आणि उच्च रक्तदाबाचे कारण ठरते आणि यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचेही प्रमाण अधिक वाढून शरीराला हानी पोहचते. 

याचप्रमाणे मधुमेह आणि हायपोथारॉईड अशा आजारांमुळेही शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढताना दिसून येतो. त्यामुळे तुम्ही नियमित आपल्या शरीराची तपासणी अर्थात हेल्थ चेकअप करत राहायला हवे. 

कोलेस्ट्रॉलची लक्षणे (Cholesterol Symptoms In Marathi)

Cholesterol Symptoms In Marathi
cholesterol symptoms in marathi

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढले आहे हे नक्की कसे समजावे असा प्रश्न आपल्याला नक्कीच मनात येतो. तर कोलेस्ट्रॉल वाढले आहे हे समजून घेण्याची काही विशिष्ट लक्षणे आहेत. कोलेस्ट्रॉलची लक्षणे (cholesterol symptoms in marathi) घेऊया जाणून. 

ADVERTISEMENT

डोक्यात सतत दुखणे – तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल आणि त्याशिवाय डोकं सतत हलके भासत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याणे हे लक्षण आहे. वास्तविक कोलेस्ट्रॉलमुळे डोक्यातील नसांना योग्यरित्या रक्ताचा पुरवठा होत नाही, त्यामुळे ही समस्या निर्माण होते. त्यामुळेच डोकेदुखी आणि चक्कर येणे अथवा संवेदना निघून जाणे अशा समस्या निर्माण होताना दिसतात. 

श्वासाचा त्रास – तुम्हाला जरासे काम केल्याने अथवा मेहनत केल्यानंतर लगेच श्वासाचा त्रास होत असे तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले आहे याचे हे संकेत आहेत. श्वास फुलल्याने थकवा येत असेल तर तुम्ही योग्यवेळीच तुमचे कोलेस्टेरॉल तपासून घ्यावे. तसंच काही वेळा कोणतेही काम न करतादेखील थकवा येत असेल तर कोलेस्ट्रॉल वाढल्याचे हे लक्षण आहे. लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना या समस्येला अधिक सामोरे जावे लागते. 

लठ्ठपणा – तुमची जाडी अचानक वाढू लागल्याचे तुम्हाला जर जाणवत असेल तर हे कोलेस्ट्रॉल शरीरात वाढत असल्याचे संकेत आहेत. याशिवाय तुम्हाला पोटात जडपण सतत जाणवत असेल आणि नेहमीपेक्षा जास्त घाम येऊन सतत गरम होत असेल तर तुम्ही वेळीच तुमचे कोलेस्ट्रॉल तपासून घ्यायला हवे. 

सतत बेचैन वाटणे – कोलेस्ट्रॉल वाढल्याने सर्वात जास्त हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तुम्हाला सतत बेचैनी जाणवत असेल तर तर कोलेस्टेरॉल वाढल्याचे हे लक्षण आहे. या दरम्यान तुमच्या हृदयाचे ठोके विनाकारण वाढतात. याकडे दुर्लक्ष करणे मात्र तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना भेट द्या. तसंच डोळ्यांखाली आणि मानेवर लहान लहान पुळ्या येणे अथवा त्वचा निघणे हीदेखील कोलेस्टेरॉल वाढण्याची लक्षणे (cholesterol symptoms in marathi) आहेत. 

ADVERTISEMENT

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Cholesterol Kami Karnyache Upay)

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) नक्कीच करता येतात. त्यासाठी सतत बाहेरची औषधे खाण्याची गरज नाही. घरच्या घरी कोलेस्ट्रॉल कसे कमी करायचे (how to reduce cholesterol in marathi) ते जाणून घेऊया. 

अक्रोड (Walnut) 

walnut
home remedies for cholesterol

अक्रोड हे एनर्जीचे भांडार आहे. रोज तुम्ही चार अक्रोड खाल्ले तरी आपल्या शरीरामध्ये उर्जा टिकून राहाते. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा – 3, फायबर, कॉपर आणि फॉस्फोरससारखे अनेक पोषक तत्व आहेत. रोज सकाळी तुम्ही चार अक्रोड खाल्ल्यास, रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले कोलेस्ट्रॉल वितळते आणि तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल पुन्हा यकृतापर्यंत पाठविण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही रोज किमान 4 अक्रोडचे सकाळी सेवन करावे. 

लसूण (Garlic)

garlic

how to reduce cholesterol in marathi

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसणीचा चांगला फायदा मिळतो. लसणीमध्ये असे काही एंजाईम्स आढळतात जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. वैज्ञानिकांद्वारे शोधण्यात आल्यानुसार लसणीचे नियमित सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर 9 ते 15 टक्के घटण्यास मदत मिळते. याशिवाय लसणीचे सेवन रक्तदाबदेखील नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर रोज दिवसातून एक वेळ लसणीच्या किमान दोन पाकळ्या खा. यामुळे तुम्हाला फायदाच मिळेल. 

ADVERTISEMENT

ओट्स (Oats)

oats

ओट्समध्ये असणारे बीटा ग्लुकॉन नावाचे चिकट तत्व हे आपल्या आतड्यांची स्वच्छता ठेऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल टिकून राहत नाही. एका अभ्यासात सांगतलेल्यानुसार, जर तीन महिने तुम्ही नियमित स्वरूपात ओट्सचे सेवन केले तर कोलेस्ट्रॉलची पातळी ही 5% टक्के कमी होण्यास मदत मिळते. 

सोयाबीन्स (Soyabeans)

soyabeans

सोयाबीन्स, डाळ आणि मोड आलेले कडधान्य हे रक्तातील असणारे एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी लिव्हरची मदत करते. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये सोयाबीन्सचा वापर करून घ्यायला हवा. तसंच सोयाबीन्स हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी सोयाबीन्स रेसिपी (soyabean recipe in marathi) चा आहारात समावेश करून घ्या. 

लिंबू (Lemon)

lemon

लिंबासहित सर्व आंबट फळांमध्ये फायबर आढळतात, जे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहत मिक्स होण्यापासून थांबवतात. या फळांमधील आढळणारे विटामिन सी हे रक्तवाहिन्यांची अधिक स्वच्छता करण्यास मदत करते. त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल हे पचनतंत्राच्या सहाय्याने शरीराच्या बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. आंबट फळांमध्ये आढळणारे एंजाइम्स हे मेटाबॉलिजम प्रक्रिया वाढवून वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात.

ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)

Olive oil

ऑलिव्ह ऑईलमध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर राखण्यास मदत मिळते. यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. तसंच उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही याचा फायदा मिळतो. एका तपासत सिद्ध झाल्यानुसार, तुम्ही जर आठवड्यातील सहा दिवस ऑलिव्ह ऑईलमध्ये तयार करण्यात आलेले जेवण खाल्ले तर यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी 8% कमी होण्यास मदत मिळते. तुम्हाला शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत असल्याची लक्षणे (cholesterol symptoms in marathi) जाणवली तरी तुम्ही योग्य प्रमाणात ऑलिव्ह ऑईलचे सेवन सुरू करा. 

ADVERTISEMENT

आळशी (Flax Seeds)

flax seeds

आळशीचे शरीराला अनेक फायदे होतात. आळशीचे बी हे वाढते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते. तुम्हीदेखील नियमित आळशीचे सेवन करायला हवे. तुम्हाला अख्खी आळशी खाणे जमणार नसेल तर तुम्ही आळशीची पावडर तयार करून घ्या आणि रोज ताकामध्ये एक चमचा मिक्स करून तुम्ही हे ताक प्या. तुम्ही कोणत्याही भाजीतदेखील आळशीचा वापर करू शकता. याचा तुम्हाला फायदाच होतो. सर्वात सोपे म्हणजे बडिशेप आणि आळशी भाजून एका डबीत भरून ठेवणे आणि जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा रोज खाणे. यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यास मदत मिळते. 

आवळा (Amla)

amla

रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा आवळ्याचा रस (Amla Juice) आणि कोरफडचा रस (Aloe vera juice) एकत्र मिक्स करून नियमित सेवन करा. याचे सेवन केल्याचे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. आवळ्याच्या रसातील विटामिन सी आणि सायट्रिक असिडचे उच्च प्रमाण हो कोलेस्टेरॉल कमी करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 

विटामिन सी (Vitamin C)

vitamin C

जितके विटामिन सी आणि सायट्रिक असिडयुक्त फळं आहेत ते सर्व कोलेस्ट्रॉलचा आजार असणाऱ्या रूग्णांसाठी वरदान ठरतात. आवळा, डाळिंबाचे दाणे, लिंबू, संत्रे, मोसंबी इत्यादी फळांमध्ये सायट्रिक असिड असून तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राखण्यास याचा उपयोग होतो. तसंच कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण आणण्यासाठीही तुम्ही याचे नियमित सेवन करावे. 

काळे चणे (Bengal Gram)

बऱ्याच जणांना काळ्या चण्याची वाटण लावलेली भाजी खायला अगदी मनापासून आवडते. काळ्या चण्याचा फायदाही होतो. काळ्या चण्यामध्ये विटामिन बी, सी, डी चे अधिक प्रमाण असते. याशिवाय काळ्या चण्यात कॅल्शियम, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरससारखे पोषक तत्वही आढळतात. रात्री एक मूठभर काळे चणे पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे खा. तसंच ज्या पाण्यात काळे चणे भिजवले आहेत ते पाणीदेखील तुम्ही प्या. कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. याशिवाय तुम्ही भाजलेले काळे चणे खाल्ले तरीही तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. 

ADVERTISEMENT

बेदाणे (Raisin)

raisin

तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढत आहे अशी लक्षणे जर जाणवू लागली तर त्वरीत तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय (cholesterol kami karnyache upay) तुम्ही करत असाल तर तुम्ही रात्री पाण्यात साधारण 10-12 बेदाणे आणि 6-7 बदम भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही दोन्हीचे सेवन करा. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते. मात्र तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही बेदाण्याचे सेवन करू नये ही गोष्ट लक्षात ठेवा. 

मोहरीचे तेल (Mustard Oil)

Mustard oil

आपल्याकडे उत्तरकडे आणि अनेक ठिकाणी मोहरीच्या तेलाचे जेवणासाठी अधिक उपयोग केला जातो. पण आता अनेक ठिकाणी तूप, रिफाईंड आणि अन्य तेलांचा जास्त वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पण ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांनी घरगुती उपाय करताना मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीच्या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉली सॅच्युरेटेड फॅटी असिड अधिक प्रमाणात आढळते. आरोग्याच्या दृष्टीने हे अधिक लाभदायक आहे. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही हमखास मोहरीच्या तेलाचा वापर करावा. याचा फायदा होतो. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. डॉक्टरांकडे नक्की केव्हा जायला हवं? 

कोलेस्ट्रॉल वाढू लागल्याची लक्षणे जाणवायला लागल्यावर तुम्ही त्वरीत घरगुती उपाय चालू कराच. मात्र कोलेस्ट्रॉल किती प्रमाणात वाढलं आहे हे तपासून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांनाही संपर्क साधावा. 

ADVERTISEMENT

2. सतत वजन वाढणे हेदेखील कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे का?

हो. तुम्ही काहीही न करता जर सतत वजन वाढत असेल तर तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे. कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर वजनावर नियंत्रण राहत नाही. 

3. डोकं सतत दुखतं का?

कोलेस्ट्रॉलची पातळी शरीरातील वाढू लागली तर डोकं सतत दुखतं. तसंच तुम्हाला काहीही काम करावं वाटत नाही आणि अचानक थकवा सतत जाणवू लागतो. 

ADVERTISEMENT
13 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT