निप्पल्समध्ये कोरडेपणा येणे आणि दुखणे अशा समस्या अनेकांना येतात. विशेषतः स्तनपान करणाऱ्या महिलांना ही समस्या अधिक प्रमाणात येते. वास्तविक हे अतिशय सामान्य आहे. पण असे झाल्यानंतर काही महिला मुलांना स्तनपान करणे सोडून देतात. कोरडी त्वचा अथवा थ्रशच्या कारणामुळे निप्पलमध्ये त्वचेला क्रॅक (krack) येतो. तुम्हालादेखील हा त्रास होत असेल आणि निप्पल्स कोरडे झाले असतील तर सोपे घरगुती उपाय तुम्हाला या लेखातून आम्ही सांगत आहोत. बऱ्याचदा या विषयावर बोलणे महिलांना योग्य वाटत नाही त्यामुळे महिला ही समस्या सहन करत राहतात. पण असे अजिबात करू नका. अशी समस्या तुम्हालाही असेल तर तुम्ही वेळीच काही सोपे घरगुती उपाय यासाठी करून पाहा.
ब्रेस्ट मिल्कने करण्यात येणारा मसाज (Breast Milk Massage)

जेव्हा स्तनपान करणाऱ्या माता आपल्या बाळाला दूध पाजतात त्याचवेळी क्रॅक गेलेल्या अर्थात कोरड्या झालेल्या निप्पल्सना मऊपणा देण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. निप्पल जर दुखत असेल तर तुम्ही थोडेसे दूध लावा आणि हलक्या हाताने स्तनांचा मसाज आणि निप्पल्सचा मसाज करा. कोरड्या झालेल्या निप्पल्सना मऊ करण्याचा हा अत्यंत चांगला आणि सोपा उपाय आहे. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते आणि अँटीबॉडीजच्या संक्रमणापासून बचावासाठी याचा उपयोग होतो.
गरम शेक
गरम पाण्याचा शेक देऊन तुम्ही निप्पल्सचा त्रास कमी करू शकता. ही समस्या सोडविण्यासाठी गरम पाण्याचा शेक तुम्ही द्यावा. यामुळे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि या उपचाराचा उपयोग होतो. एक स्वच्छ कपडा गरम पाण्यात भिजवा आणि अतिरिक्त पाणी काढून टाका. त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हे निप्पल्सवर लावा. या पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मीठ मिक्स करा आणि त्याचा उपयोग तुम्ही शेकण्यासाठी करा. हे तुमच्या निप्पल्सचा आलेला कोरडेपणा कमी करतात.
तूप

तुपाचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, तुपामध्ये क्लिन्झिंग आणि डिटॉक्सिफाईंग गुण असतात,जे उपचाराला वाढ देण्यासाठी मदत करतात. याचा उपयोग घाव भरण्यासह, सूज कमी करणे आणि फाटलेल्या गोष्टी सुधारण्यासाठी अनादी काळापासून करण्यात येत आहे. आयुर्वेदिक डॉक्टरही तडा गेलेल्या आणि कोरड्या झालेल्या निप्पल्सच्या उपचारासाठी मातांना याचा हलक्या हाताने मसाज करण्याचा सल्ला देतात. यामुळे निप्पल मऊ आणि मुलायम राहतात आणि त्रासदायक ठरत नाही. त्वचा खेचली जात नाही.
नारळाचे तेल

व्हर्जिन नारळाचे तेल हे पारंपरिक स्वरूपात कोणतेही घाव भरण्यासाठी वापरण्यात येते. अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, यामध्ये बायोअॅक्टिव्ह गुण असतात, जे उपचाराला अधिक प्रभावी ठरण्यास मदत करतात. यामध्ये मायक्रोबियल गुणही आढळतात, जे संक्रमणाशी लढतात. तडा गेले निप्पल्स पूर्ववत करण्यासाठी तुम्ही थोडेसे फूड ग्रेड नारळाचे तेल त्याला लावा. हे तेल तुम्हाला फंगसविरोधातही मदत करतात आणि थ्रशचे कारण होण्यापासून रोखतात.
मध

मधाचा उपयोग नेहमीच मॉईस्चराईजर आणि जखम भरण्यासाठी तसंच त्वचा अधिक मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी करण्यात आला आहे. अनेक शोधांमधूनही हे सिद्ध झाले आहे. यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे संक्रमणाला थांबवतात आणि त्याशिवाय टिश्यूचा विकास करण्यापासून आणि ब्लड सेल्स निर्माण करण्यापासून उत्तेजित करतात त्यामुळे जखम भरण्यास मदत मिळते. तुम्ही स्तनपान करत असाल तर याचा जास्त उपयोग करू नको. अन्यथा निप्पल्सना (nipple) तडा गेला असेल तर तुम्ही मेडिकल ग्रेड मधाचा वापर करा. तसंच बाळाला दूध पाजण्यापूर्वी हा भाग व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.
टीप – कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या. तसंच तुमचे बाळ लहान असेल आणि तुम्हाला निप्पल्स कोरडे होण्याची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की सल्लामसलत करून मगच घरगुती उपायांचा वापर करावा.