ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
home remedies for eye puffiness

डोळ्याचा पफीनेस करा त्वरीत दूर, जाणून घ्या सोपे घरगुती उपाय

काही जणांना सकाळी उठल्यानंतर डोळ्यांखाली पफीनेस अर्थात सूज जाणवते. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळ्यांमुळे पूर्ण चेहराही खराब दिसतो. काही जणांना हा नेहमीचा त्रास असतो. त्यामुळे आंघोळ केल्यावर बर्फ लावणे असे प्रकार केले जातात. डोळ्यांया पफीनेसमुळे चेहरा निस्तेज आणि आजारी असल्यासारखाही वाटतो. डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदतही घेऊ शकता. पण नक्की सकाळी उठल्यानंतर डोळ्यांना सूज अर्थात पफीनेस का जाणवतो याची कारणही त्याआधी जाणून घेणे गरजेचे आहे. तरच त्यावर योग्य उपचार करता येतील. डोळ्यांच्या पफीनेसची कारणे पाहून त्यावरील सोपे उपायही आपण जाणून घेऊया. 

डोळे सुजण्याची कारणे 

eyes puffiness
Shutterstock

सकाळी झोपून उठल्यानंतर डोळे का सुजतात याची कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. सध्या आपला अधिकतम वेळ हा लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा मोबाईलसमोरच जातो. तसेच आयुष्यात अनेक तणावही असतात. पाहूया नक्की कारणे – 

स्क्रीन – आजकाल आपल्या व्यक्त लाईफस्टाईलमध्ये लोक जास्तीत जास्त वेळ स्क्रिनवर काम करत असतात. तर घरी बसल्या बसल्यादेखील सतत हातात मोबाईल डोळ्यांसमोर धरलेला असतो. सतत सोशल मीडियाचा वापर करण्यात व्यस्त अशतात. स्क्रिन जास्त काळ पाहिल्याने डोळ्यांवर परिणाम होतो. तसंच रात्री उशीरापर्यंत जेव्हा तुम्ही मोबाईल पाहता तेव्हा सकाळी उठल्यावर डोळ्याला सूज अर्थात पफीनेस येणे साहजिक आहे. 

पाण्याची कमतरता – शरीरारमध्ये पाण्याची कमतरता असणे हेदेखील डोळ्यांना सूज येण्याचे कारण आहे. यामुळे केवळ आपल्या शरीरावरच नाही तर डोळ्यांवरही परिणाम होत असतो. पाण्याची कमतरता ही शरीरातील कमजोरीमुळे येते. त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे दिवसातून किमान 8-9 ग्लास पाणी प्यायलाच हवे. 

ADVERTISEMENT

तणाव – सतत काम, नोकरीवरील ताण, मनावरील कामाचा तणाव यामुळे व्यवस्थित झोप लागत नाही. किमान दिवसातून आठ तास झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे झोपेचा थेट परिणाम हा डोळ्यांना सूज येण्यावर होत असतो. 

डोळ्यांचा पफीनेस दूर करण्यासाठी घरगुती उपाय 

डोळ्यांचा पफीनेस दूर करण्यासाठी तुम्हाला सतत डॉक्टरांकडे जायची गरज नाही.  तुम्ही घरच्या घरीदेखील यावर उपाय करू शकता. यासाठी तुम्ही कोणत्या सोप्या पद्धती अवलंबू शकता हे जाणून घ्या. 

थंड चमच्याचा करा उपयोग 

थंड चमचे – Freepik

डोळ्यांचा पफीनेस (eye puffiness) दूर करण्यासाठी तुम्ही थंड चमच्याचा उपयोग करून घेऊ शकता. याचा खूपच चांगला परिणाम होतो. थंड चमच्याचा 5 मिनिट्स वापर करून तुम्ही डोळ्यांची सूज कमी करून घेऊ शकता. थंड चमच्याचा उपयोग कसा करायचा असा प्रश्न आता नक्कीच तुमच्या मनात आला असेल. तर सर्वात पहिले तुम्ही चार चमचे घ्या आणि तुमच्या फ्रिजमध्ये स्वच्छ धुऊन थंड होण्यासाठी ठेवा. 5 मिनिट्सनंतर एक चमचा घ्या. उलटा चमचा तुम्ही डोळे बंद करून त्यावर ठेवा. काही सेकंदाने चमचा हटवा. त्यानंतर दुसरा चमचा घ्या. असं चारही चमच्यांच्या बाबतीत करा. यामुळे त्वरीत डोळ्याचा पफीनेस कमी होण्यास मदत मिळते. 

दूध आणि कापसाचा करा उपयोग

दूध आणि कापसाचा बोळा – freepik

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी तुम्ही थंड दुधाचा उपयोग करून घेऊ शकता. थंड दुधाचा वापर केल्याने केवळ पफीनेस दूर होईल असे नाही तर तुम्हाला डोळ्यांखाली काळी वर्तुळं (dark circles) आले असतील तर तेदेखील कमी होण्यास मदत मिळते. पफीनेस दूर करण्यासाठी एका वाटीत दूध घ्या. या दुधात कापसाचा बोळा बुडवा आणि ते फ्रिजमध्ये ठेवा. दूध थंड झाल्यावर त्यातील कापसाचा बोळा डोळ्यावर ठेवा. 5 मिनिट्स तसंच ठेवा आणि परिणाम पाहा. यामुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत मिळते. तसंच यामुळे डोळे अधिक तजेलदार दिसण्याही मदत मिळते. यासाठी काही जण अंडर आय क्रिम्सचाही वापर करतात.

ADVERTISEMENT

आईस क्युब

आईस क्यूब – Freepik

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी तुम्ही आईस क्युबचा वापर करू शकता. तुम्हाला डोळ्यांवर आईस क्युबचा डायरेक्ट वापर करता येणार नाही. तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये आईस क्यूब घ्या आणि मग हलक्या हाताने डोळ्यांच्या आजूबाजूला मसाज करा. यामुळे डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत मिळते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT