ADVERTISEMENT
home / Nail Care
मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण बरचं काही करत असतो. क्लीनअप, फेशिअल आणि ब्युटी एक्सपर्टनी सांगितलेल्या अनेक टिप्स आपण फॉलो करत असतो.  पण पायांचे काय? कारण पायांची म्हणावी तशी काळजी आपण घेतो असे नाही. त्यामुळे तुमचा चेहरा आणि पाय यात खूप फरक जाणवायला लागतो. पण पायांची योग्य काळजी घेतली तर तुमची पायाची त्वचाही तितकीच सुंदर दिसू शकते. आज आपण मुलायम आणि कोमल पायांसाठी घरच्या घरी काय करु शकतो हे पाहणार आहोत. पण त्या आधी पायाची त्वचा खराब कशामुळे होते हे जाणून घेऊया

पायांची त्वचा खराब होण्याची कारणे

पायाला सतत ऊन लागणे

सगळेच प्रत्येक सीझनमध्ये शूज घालतात असे नाही. शिवाय प्रत्येक कपड्यावर शूज चांगलेच दिसतात असे नाही . त्यामुळे साहजिकच आपण वेगवेगळ्या फॅशनचा चपला कपड्यांनुसार घालत असतो. अशा चपलांमुळे पायांना थेट उन लागते. पायांना सतत ऊन लागल्यामुळे तेथील  त्वचा कालांतराने काळवंडते. आता आपण त्याला टॅन होणे असे म्हणतो. जर तुम्ही जास्त लक्ष दिले नाही तर पायाची त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे पायांना ऊन लागणे हे पायाची त्वचा खराब करण्याचे पहिले कारण आहे.

चपला लागणे

मुलींना चप्पलांचे एक जोड थोडीच पुरते. प्रत्येक कपड्यावर वेगवेगळ्या चप्पल घेताना त्या सगळ्याच चपला पायांना आरामदायी असतात असे नाही. त्यामुळे त्या अनेकदा पायांना लागतात. शू बाईटमुळे पायांना जखमा होत असतात. त्यांच्यावर तात्पुरता इलाज आपण करतो. पण अशा चपला सातत्याने घातल्यामुळे पायांच्या जखमा बऱ्या होत नाहीत आणि पायांवरील डाग वाढत राहतात. तसंच यामुळे फंगल इन्फेक्शनही पायाला होऊ शकते. शिवाय त्या जखमेवर डेड स्किन येत राहते.shoe bite

पाय धुण्याचा कंटाळा

अनेकांना पाय धुण्याचा कंटाळा असतो. बाहेरुन आल्यानंतर  केवळ पायावर पाणी घ्यायचे असते. म्हणून अनेक जण पाय धुतात. बाहेर तुमच्या पायावर धूळ-माती बसत असते. ती तशीच चिकटून राहिली की, पायाची त्वचा खराब होते. पायाच्या त्वचेतील बदल तुम्हाला लगेच जाणवत नाही. पण कालांतराने तुमच्या पायाची त्वचा खराब होत जाते.

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स असे करता येतील कमी

पायांना भेगा पडणे

अनेकांना थंडीत पायांना भेगा पडण्याचा त्रास होतो. त्यावर अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. काहींना हा त्रास फक्त थंडीत होतो तर काहींना कायमच. या भेगांमुळे तुमच्या पायांचे सौंदर्य बिघडते. भेगा पडलेल्या पायांची काळजी घेणे फारच गरजेचे असते

cracked heels

सतत पाण्यात काम

सतत पाण्यात राहूनही पायाची त्वचा फुगते. जास्त वेळ पाण्यात काम केल्यास तेथील त्वचा पांढरी दिसू लागते. नखांजवळील त्वचा खूप वेळ पाण्यात राहिली की, अगदी वेगळीच दिसते. शिवाय सततच्या पाण्यातील कामांमुळे पायाला भेगा देखील पडतात. त्यामुळे देखील तुमची त्वचा खराब होते.  

ADVERTISEMENT

या काही कारणांमुळे तुमच्या पायांचे सौंदर्य बिघडते.

पायांचा वरील भागाला जर तुम्ही कधी हात लावून पाहिला तर तुम्हाला ती त्वचा खरखरीत  काही ठिकाणी निस्तेज, डेड स्कीन असलेली जाणवेल. तुम्हालाही तुमच्या पायाची त्वचा तशी जाणवत असेल तर लगेचच आम्ही सुचवलेले घरगुती उपाय तुम्ही करुन पाहा.

चेहऱ्यावर हवा आहे ग्लो? मग हे नक्की वाचा

अशी घ्या पायांची घरच्या घरी काळजी (Home Remedies For Soft & Smooth Foot)

पायांची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रॉडक्टची निवड करणे गरजेचे असते. घरच्या घरी पायांची काळजी घेण्यासाठी नेमके काय करायला हवा ते जाणून घेऊया

ADVERTISEMENT

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा सगळ्यांच्या किचनमध्ये असतोच.घरी आल्यानंतर जर तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळत असेल .तर तुम्हाला हा प्रयोग करायला हरकत नाही. गरम पाण्यात तुम्हाला १ मोठा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. या पाण्यात तुम्हाला तुमचे पाय २० ते ३० मिनिटे ठेवायचे आहेत. पाण्यातून पाय काढून तुम्हाला ते कोरडे करुन घ्यायचे आहेत. तुम्हाला पाय कोरडे केल्यानंतर लगेचच पायात झालेला बदल जाणवेल. शक्य असल्यास हा प्रयोग रोज करण्यासही काही हरकत नाही.

baking soda water 

बनाना मास्क

त्वचा मुलायम होण्यासाठी केळ देखील वापरले जाते. घरी एखादे पिकलेलं केळं असेल तर ते स्मॅश करुन घ्या आणि तुमच्या पायांना केळ्याची पेस्ट लावा. हा मास्क पूर्ण वाळल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवून घ्या. कोरडे करुन त्यावर मॉश्चरायझर लावा. आठवड्यातून एकदा तरी केळ्याचा मास्क लावा. 

टीप- स्मॅश केलेल्या केळ्यामध्ये मध किंवा ओट्स घातले तरी चालतील.

ADVERTISEMENT

Also Read Best Home Remedies For Shoe Bites In Marathi

कॉफी स्क्रब

पायावरील मृत त्वचा काढण्यासाठी कॉफी हा चांगला पर्याय आहे. आता कॉफी महाग असे तुम्हाला वाटेल. पण बाजारात जाडी भरडी कॉफी पावडर मिळते. जी तुम्ही पीत असलेल्या फिल्टर कॉफीचाच उरलेला भाग असते. एका भांड्यात ३ ते ४ चमचे जाड दळलेली कॉफी घेऊन त्यात लिंबाचा रस घालून थोडी थीक पेस्ट तयार करुन घ्यायची आणि ती पायाला चोळायची आहे. कॉफी तुमच्या पायावरील घाण काढून टाकते. शिवाय तुमची त्वचा कोमल करते.

coffee scrub

व्हॅसलीन मास्क

व्हॅसलीन  किती उपयोगी आहे हे आता सांगायलाच नको. ओठांपासून ते पायांच्या तळव्यांपर्यंत व्हॅसलीन लावण्याचा सल्ला दिला जातो.  व्हॅसलीन जेली घेऊन तुम्हाला ती संपूर्ण पायाला लावायची आहे.व्हॅसलीन पायावरुन जाऊ नये आणि तुम्ही घसरुन पडायला नको म्हणून तुम्ही मोजे घालायला हवे.त्यामुळे हा प्रयोग रात्रीच्यावेळी करुन पाहिल्यास उत्तम. शिवाय पायांना भेगा पडल्या असतील तरी व्हॅसलीनने त्या भरुन निघतात. 

ADVERTISEMENT

टीप- कॉफी स्क्रब पायांना चोळल्यानंतर व्हॅसलीन लावल्यास आणखी उत्तम. कारण स्क्रब केल्यानंतर तुमचे पोअर्स ओपन होत असतात. त्यावर व्हॅसलीन लागले तर त्वचा अधिक मुलायम होईल.

socks on

ओट्स

ओटस जितके सुदृढ शरीरासाठी पौष्टिक असतात तितकेच ते तुमच्या त्वचेसाठी चांगले असतात. एका भांड्यात तुम्हाला ओट्स,दही, हळद  एकत्र करायचे आहे. तयार पेस्ट तुम्हाला पायांना चोळायची आहे. यात थोडा आणखी ट्विस्ट आणण्यासाठी तुम्ही त्यात हळद घालण्याऐवजी लिंबू पिळू शकता. लिंबामधील व्हिटॅमिन c आणि ब्लिचींग एजंट तुमच्या पायांची नखे टणक करते शिवाय तुमच्या तजेलदार त्वचेला आवश्यक असलेले व्हिटॅमिन c पुरवते.

मसाज

दिवसभर तुमचे पाय खूप काम करत असतात. त्यांना देखील आराम नको का? आता हा आराम तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही पायांना छान मसाज करायला हवे. बदामाचे किंवा ऑलिव्ह ऑईल घेऊन तुम्ही तुमच्या पायांचा मसाज करा. रात्रीच्या वेळी तसे केल्यास उत्तम. कारण मसाज केल्यानंतर तुम्हाला पाय धुण्याची काहीच गरज नाही. मस्त सॉक्स घाला आणि झोपून जा तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटेल छान झोपही येईल. चांगली झोप हे चांगल्या त्वचेचे रहस्य आहे. हे काही सांगायला नको.

ADVERTISEMENT

foot reflexology

नियमित स्वच्छता महत्वाची 

बाहेरुन आल्यानंतर पाय धुण्याची सवय अनेकांना असते. पण घरी थकून आल्यानंतर आपण केवळ औपचारिकता म्हणून पायावर पाणी घेत असतो. पण रोज पायांची नीट काळजी घेतली तर पायाची त्वचा चांगली राहते. रोज घरी आल्यानंतर पायाला चांगला साबण लावून पाय धुवा. पायाची बोटे, बोटांमधील जागा, टाचा घासून घ्या. रोजच्या स्वच्छतेमुळे तुम्हाला पेडिक्युअर करायची गरजही भासणार नाही. 

पेडिक्युअर

पार्लरमध्ये ६०० रुपयांपासून पेडिक्युअर सुरु होते. ते नेहमीच सगळ्यांना परवडू शकेल असे नाही. घरच्या घरी तुम्ही पेडिक्युअर करु शकता. पेडिक्युअरमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचे आहे नखांची स्वच्छता करणे. नखांची स्वच्छता राखताना पाय स्क्रब करणे येतेच. शिवाय पायांना मसाजही मिळतो. त्यामुळे महिन्यातून दोनदा तरी पेडिक्युअर करा.

daily cleaning

ADVERTISEMENT

चपलांची स्वच्छता

पायांची इतकी निगा राखल्यानंतर तुम्हाला स्वच्छ चपला घालणे गरजेचे आहे. कारण  आपला पाय दिवसभर चपलांमध्ये असतो. पायांना अजिबात हवा लागत नाही. अशावेळी जर तुमच्या चपलांना धूळ, माती लागलेली असेल तर त्याचा जास्त त्रास आपल्या शरीराला होतो. शिवाय सुकलेल्या घामामुळे तयार झालेले जंतूही पायांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्यामुळे बाजाराम मिळणारे फूट स्प्रे किंवा शूज क्लिनर वापरुन चपला नेहमी धूत जा.

shoes cleaning

फोटो सौजन्य-Instagram

 
26 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT