जेव्हा जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. ज्यामध्ये घसा खवखवणे, घसा दुखणे, सर्दी-खोकला आणि ताप यासारखे आजार होणं कॉमन आहे. सर्दी-खोकल्या झाल्यावर घसा खवखवण्याचा (sore throat) होणारा त्रास हा खूपच त्रासदायक आणि वेदना देणारा असतो. घसा खवखवण्यामुळे आपल्या जेवणावरही आणि पूर्ण रूटीनवरच परिणाम होतो. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन होतं तेव्हा आपलं शरीर प्रतिकारशक्तीनुसार प्रतिक्रिया देतं त्यामुळे आपल्याला घसा खवखवण्याचा त्रास होतो. घश्याची खवखव सुरू झाल्यावर तुम्हाला पुढील लक्षणे जाणवू शकतात. घश्याला सूज येणे, घसा दुखणे, कोणताही पदार्थ गिळताना घसा दुखणे किंवा जळजळ होणे, घश्याच्या खवखवीमुळे स्वरयंत्राला सूजही येऊ शकते, कणकण जाणवणे. जर तुमचाही घसा खवखवत असेल किंवा घसा दुखण्यामुळे तुम्ही हैराण झाला असाल (कोरोना लक्षणे) तर पुढील घसा खवखवणे उपाय (ghasa khavkhavne upay) घरच्या घरी कसे करता येतील ते जाणून घ्या.
घसा खवखवू लागल्यास हमखास सांगण्यात येणारा उपाय म्हणजे मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घश्याची खवखव लगेच कमी होते. या पाण्याने घश्याच्या वेदना आणि सूज दोन्ही कमी होतं. कारण या उपायाने बॅक्टेरियांचा नाश होण्यास मदत होते.
कसा कराल उपाय – गुळण्या करण्यासाठी तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ घालून त्याने 5 मिनिटं गुळण्या करा आणि मग चूळ भरा. हा उपाय तुम्ही दर तीन तासांनी केल्यास घश्याची खवखव होणं थांबेल.
घसा खवखवणे यावर मधाचा उपयोग पूर्वापारपासून सुरू आहे. अनेक रिसर्चमध्ये हे आढळलं आहे की, मध हा खोकला आणि घश्याच्या दुखण्यावर गुणकारी आहे.
कसा कराल उपाय – मध तुम्ही नुसता चाटण रूपात किंवा चहा/कॉफीमध्ये साखरऐवजी घालून घेऊ शकता. तसंच घश्याला सूज आल्यास किंवा दुखत असल्यास तुम्ही मधाचा वापर करू शकता.
ज्येष्ठमधाचा उपयोग अनेक काळापासून घसा खवखवणे उपाय (ghasa khavkhavne upay) आणि घसा दुखणे घरगुती उपाय केला जातो.
कसा कराल उपाय – ज्येष्ठमधाचं मूळ हे पाण्यात भिजवून घ्यावं. या पाण्याने गुळण्या केल्यास तुम्हाला घसा दुखणे आणि खवखव या त्रासापासून त्वरित आराम मिळेल. गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी (pregnant and breastfeeding) मात्र हा उपाय करू नये.
मेथीचा वापर आपल्या घरात मुख्यतः स्वयंपाकात केला जातो. मेथीचे आरोग्यासाठी असणारे अनेक फायदे आहेत. अगदी घसा खवखवणे यावरही मेथी गुणकारी आहे.
कसा कराल उपाय – घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय करताना तुम्ही मेथीचे दाणे किंवा मेथी घातलेला चहा पिऊ शकता. संशोधनात आढळलं आहे की, मेथी ही घसा दुखीपासून आराम देण्यासाठी गुणकारी आहे. ही घश्यातील बॅक्टेरियांचा नाश करते आणि यातील अँटीफंगल गुणांमुळे घश्याची सूज आणि जळजळ कमी होते. पण गर्भवती महिलांनी मात्र याचं सेवन करू नये.
लसूण हा नैसर्गिकित्या जीवाणुरोधक गुण असतात. लसूणमध्ये आढळणाऱ्या अॅलीसीन (allicin) जे ऑर्गनसल्फर (organosulfre) युक्त आहे, त्यात इंफेक्शनशी लढण्याची क्षमता असते. रिसर्चनुसार, नियमितपणे लसणीचा वापर आपण जेवणात केल्यास इंफेक्शनमुळे होणाऱ्या सर्दीपासून आपलं संरक्षण होतं.
कसा कराल उपाय – लसणीचा वापर तुम्ही रोजच्या आहारात आवर्जून करावा. लसूण सोलून किंवा लसणीचा ताजा पाला तुम्ही कच्चाही खाऊ शकता किंवा तुम्ही लसूण तेलात शेकून तसंही खाऊ शकता. लसणीच्या वापराने तुम्ही घसा खवखवीपासून (sore throat) आराम मिळवू शकता.
पहिल्या घरगुती उपायात सांगितल्याप्रमाणे घश्याची खवखव बरी करण्यासाठी तुम्ही मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता. तसंच हा उपाय करताना तो अजून प्रभावी ठरावा म्हणून त्यात तुम्ही बेकिंग सोडाही घालू शकता. बेकिंग सोडा घरगुती उपाय म्हणून उपयुक्त आहे. ज्यामुळे तुम्हाला घसा दुखणे आणि घश्याची खवखव असे दोन्ही त्रास होणार नाहीत. हा उपाय केल्याने घश्यातील इंफेक्शन कमी होऊन बॅक्टेरिया मारले जातात. तसंच हे फंगल इंफेक्शनही कमी करतं.
कसा कराल उपाय – एक कप गरम पाण्यात एक चतुर्थांश बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा मीठ घाला. दर तीन तासांनी हा उपाय करा. नक्कीच बर वाटेल.
घसा खवखवणे उपाय – नारळाचं तेल
नारळाच्या तेलात अनेक गुण आढळून येतात. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. मग ते जेवण असो वा केसांसाठी असो. रिसर्चनुसार नारळाच्या तेलात इंफेक्शनचा नाश करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे घश्याची सूज आणि खवखव कमी होते. त्यामुळे तुम्हाला घश्याची खवखव असल्यास नारळाच्या तेलाचा वापर नक्की करा.
कसा कराल उपाय – घशाची खवखव कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून एक चमचा नारळाचं तेल गरम करून ते एक चमचा सूपमध्ये मिक्स करा. हे तेल तोंडात पूर्णपणे विरघळेपर्यंत तसंच राहू द्या आणि मग गिळून टाका. दर दिवशी तुम्ही किमान दोन चमचे नारळाच्या तेलाच सेवन करू शकता.
मीठाच्या पाण्याचा गुळण्यांप्रमाणेच हळद घातलेलं दूध हा घसा खवखवीवरील हमखास उपाय आहे. कारण हळद घातलेल्या दूधाचा वापर हा अनेक शतकांपासून केला जात आहे. हळदीचे अनेक फायदे आहेत. हळदीतील अँटी फंगल (Anti fungal) आणि अँटीबॅक्टेरियल (Anti Bacterial) गुणांमुळे घश्याची खवखव आणि दुखणं कमी तर होतेच त्यासोबतच यामध्ये घश्याची सूज कमी करणारे गुणही आढळतात. जे तुमच्या घश्याची सूज आणि वेदना लवकरात लवकर कमी करतात. तसंच सुका खोकल्यासाठी घरगुती उपाय म्हणूनही तुम्ही हळदीचा वापर करू शकता.
कसा कराल उपाय – आयुर्वेदामध्ये हळदीला नॅचरल अँटी बायोटिक्सच्या रूपात वापरलं जातं. तुम्हीही गरम दूधात एक चमचा हळद घालून ते रात्री झोपण्याआधी घ्या. मात्र लक्षात ठेवा दूध घेतल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये. नाहीतर याचा परिणाम कमी होईल.
कॅमोमाईल टी मध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये अजिबात फॅट अर्थात चरबी नाही. तसंच कार्ब्सचं प्रमाणदेखील यामध्ये कमी प्रमाणात असतं. तसंच महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पोटॅशियम, लोह आणि विटामिन ए चं देखील प्रमाण असतं. यातील पोषक तत्वामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होत असतात. तसंच तुम्ही अनेक आजारांंपासून दूर राहण्यासाठी या पोषक तत्वांचा उपयोग होतो. कॅमोमाइल चहाचा स्टीम आपल्या घशात खवखव कमी करू शकतो आणि सर्दीवर उपाय आहे.
कसा कराल उपाय – तुम्ही नेहमीच्या चहाऐवजी घश्याला त्रास होत असल्यास कॅमोमाईल टी घ्यावी. ज्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता वाढून घश्यातील इंफेक्शन दूर होण्यास मदत होते. घशात खवखवणे उपाय करताना हे नक्की करून पाहा.
एपल साईडर व्हिनेगर (ACV) याचाही अनेक घरगुती उपायांमध्ये हमखास वापर केला जातो. अनेक संशोधनात यातील अँटीबॅक्टेरियल गुण दिसून आले आहेत. एपल साईडर व्हिनेगरच्या अल्कली प्रकृतीमुळे घश्यातील जीवाणूंचा हे नाश करतं.
कसा कराल उपाय – जर तुम्हाला घश्याची खवखव आणि घसा दुखीचा त्रास असेल तर एक कप पाण्यात एक ते दीड चमचा ACV मिक्स करा आणि त्याने गुळण्या करा. हा उपाय दर दोन तासांनी करा. पण या उपायादरम्यान भरपूर पाणी प्या.
घसा खवखवणे घरगुती उपाय आपण वर पाहिलेच. घसा खवखवण्याचा त्रास हा खूपच वेदनादायक असतो. हा त्रास टाळायचा असल्यास तुम्ही पुढील काळजी घेऊ शकता.
अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला घश्याची खवखव किंवा घश्याच्या इंफेक्शनमुळे होणारा त्रास टाळता येईल.
घसा खवखवणे किंवा दुखणे हा त्रास कशामुळे झाला आहे, यावर तो किती दिवस जाणवेल हे अवलंबून असतं. काहीवेळा हा त्रास लगेच बरा होतो तर काही वेळा अगदी बरेच दिवस जाणवतो. बरेचदा व्हायरल किंवा बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे हा त्रास जाणवतो.
हो, घशाची खवखव ही संसर्गजन्य असते आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचीही शक्यता असते. हा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकण्यातून किंवा थुंकीतून व्हायरस किंवा बॅक्टेरिया पसरतात. या व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंमुळे किंवा चुंबन केल्याने दुसऱ्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो.
अलर्जीमुळे बरेचदा घसा खवखवण्याचा त्रास बरेचदा होतो. नाकाद्वारे होणाऱ्या कोणत्याही अलर्जीमुळे घशाला संसर्ग होऊन घश्याची खवखव जाणवू लागते.
घसा खवखवण्याच्या साधारण कारणांमध्ये तणाव, मानसिक आजार आणि चिंता यांचाही समावेश आहे. चिंता किंवा तणावामुळे सतत आवंढा गिळल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.