ADVERTISEMENT
home / आरोग्य
Home Remedies for Sour Belching in Marathi

सतत येत असतील आंबट ढेकर तर करा हे घरगुती उपाय

जेवल्यावर ढेकर येणं हे पोट भरल्याचं लक्षण मानलं जातं. मात्र बऱ्याचदा जेवल्यावर अथवा इतर वेळीदेखील अनेकांना आंबट ढेकर येतात. आंबट ढेकर येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की अति प्रमाणात खाणं, पोटातील इनफेक्शन, अपचन, वेळेवर न जेवणं, अति ताण, व्यसनांच्या अधीन जाणं, अति चमचमीत मसालेदार पदार्थ खाणं. कारण जेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही, तेव्हाच तुम्हाला आंबट ढेकर येण्याची शक्यता असते. पोटात निर्माण होणाऱ्या गॅसमुळे तोंडावाटे आंबट पाणी वर येतं ज्याला आपण आंबट ढेकर असं म्हणतो. एकदा तुम्हाला आंबट ढेकर यायला सुरुवात झाली की तुमच्या संपूर्ण पचन संस्थेवर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो.कारण पचन संस्था बिघडल्यामुळे आंबट ढेकर येण्याचं प्रमाण पुढे वाढू लागतं.  म्हणूनच जर तुम्हाला सतत असे आंबट ढेकर येत असतील तर त्वरीत त्यावर हे घरगुती उपाय करा. तसंच (Acidity Home Remedies In Marathi) अॅसिडीटीवर घरगुती उपाय करा आणि ऍसिडिटी ची लक्षणे

आंबट ढेकर कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आंबट ढेकर येण्यामागचं मुख्य कारण अपचन असल्यामुळे आधी त्यावर उपाय केला की तुमचे आंबट ढेकर येणं आपोआप कमी होतं. 

ओवा खा

ओव्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत असतीलच, पण ओव्याचा महत्त्वाचा फायदा हा की यामुळे तुमची अॅसिडिटी लगेच कमी होते. ओवा खाऊन त्यावर कोमट पाणी पिण्यामुळे पोटातील गॅस कमी होतो आणि अन्न पचण्यास मदत होते. यासाठी ओवा चावून चावून खायला हवा. ज्यामुळे ओव्यातील रस तुमच्या पोटात जातो आणि त्वरीत उपाय केला जातो. ओव्यामुळे तुमच्या शरीरात डायजेस्टिव्ह हॉर्मोन्स निर्माण होतात ज्यामुळे अन्न पचतं आणि आंबट ढेकर थांबतात.

हिंगाचे पाणी प्या

हिंग पचनासाठी उत्तम समजला जातो. यासाठीच स्वयंपाकात काही पदार्थांमध्ये मुद्दाम हिंगाची फोडणी दिली जाते. जेव्हा तुम्हाला वारंवार आंबट ढेकर येत असतील तेव्हा पटकन हिंगाचे पाणी प्या. चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून ते पिण्यामुळे तुमचे आंबट ढेकर पटकन कमी होऊ शकतात. कारण हिंगामध्ये अपचन कमी करून पोट स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. हिंगाचे पाणी पोटावर लावण्यामुळेही पोटातील गॅस कमी होतो. यासाठी जाणून घ्या हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान | Hing Khanyache Fayde, Nuksan Marathi

ADVERTISEMENT

बडिसोप खा 

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये जेवल्यावर बडिसोप खाण्याची पद्धत आहे. बडिसोपचा वापर मुखशुद्धीसाठी आणि अन्नाचे पचन नीट व्हावे यासाठी केला जातो. आंबट ढेकर सुरु झाल्यावर बडिसोप चावून खाण्यामुळे त्वरीत आराम मिळू शकतो. कारण यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे आंबट ढेकर थांबतात आणि पोटातील गॅस कमी होतो. शिवाय तुमच्या पोटात गेलेले अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. 

वेलची चघळा

वेलची अनेक आरोग्य समस्यांवर गुणकारी आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीत वेलची एक महत्त्वाचा मसालादेखील आहे. वेलचीमुळे पोटातील गॅस कमी होतो, तोंडाला चांगला वास येतो आणि पचनाला मदत होते. म्हणूनच जर तुम्हाला वारंवार आंबट ढेकर येत असतील तर अशा वेळी तोंडात दाताखाली वेलची ठेवून ती चघळणं नक्कीच फायद्याचं ठरेल. 

जिऱ्याचं पाणी

पोटाच्या अनेक समस्यांवर जिरं फायदेशीर मानलं जातं. आंबट ढेकर, अॅसिडिटी, पोटदुखीवर जिरं भाजून खाणं उपयुक्त ठरेल. अपचन कमी करण्यासाठी ताक पिणार असाल तर ताकात भाजलेल्या जिऱ्याची पूड टाका. सलाड, आंब्याचे पन्हे, लिंबू सरबत, कोकम सरबत अशा पेयांमध्ये जिऱ्यांची पूड टाकून पिण्यामुळे देखील आंबट ढेकर कमी होतील. सर्वात सोपा उपाय म्हणजे रात्रभर जिरं पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्या. तुमची अपचनाची समस्या हळू हळू यामुळे कमी होईल. जिऱ्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT