ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
home-remedies-to-get-rid-of-unwanted-finger-hair

बोटांवर केस नको असतील तर करा सोपे घरगुती उपाय

हातापायावर केस असणे कोणालाच आवडत नाही. ज्या महिलांना जास्त केस असतात त्यांना खूपच कंटाळवाणे वाटते. आपल्याला नको असलेले केस सतत पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करून काढून घ्यावे लागतात. याचाही कंटाळा येतो. हात, पाय आणि अंडरआर्म्समध्ये वॅक्सिंग करून केस काढू शकतो. पण हाताच्या बोटांवरदेखील काही जणांच्या केस असतात. त्यांना मात्र वॅक्सिंग करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. अशावेळी महिला हाताच्या बोटांवरील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करतात. पण त्याचा उपयोग केल्यास, काही दिवसांनी अधिक जाड केस येतात आणि बोटं अधिक खराब दिसतात. तुम्हीदेखील हाताच्या बोटांवरील केसांमुळे हैराण असाल तर काही घरगुती उपयांनी तुम्ही हे केस काढून टाकू शकतात. असे काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

हळद आणि कच्च्या दुधाने हटवा बोटांवरील केस 

Turmeric_milk_FB

हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट असते आणि दुधामुळे त्वचेला अधिक मुलायमपणा मिळतो. बोटांवरील केस हटविण्यासाठी हे नक्कीच चांगले कॉम्बिनेशन आहे. हळदीपासून फेसपॅकदेखील बनतो.

  • अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा दूध घ्या
  • हळद आणि कच्चे दूध व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या
  • ही पेस्ट तयार झाल्यावर बोटांवरील केसांवर लावा आणि रगडा
  • आठवड्यातून 3-4 वेळा या पेस्टचा वापर करा आणि काही दिवसामध्ये तुम्हाला यातील फरक दिसून येईल 

उडीद डाळ, बेसन आणि मोहरीचं तेल 

उडीद डाळ, बेसन आणि मोहरीचं तेल हे केस काढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. याचे उटणे लहान मुलांसाठीही वापरता येते. लहान बाळांच्या अंगावरील केस काढण्यासाठीही या पेस्टचा वापर करण्यात येतो. बोटांवरील केस हटविण्यासाठी तुम्ही याचा वापर करावा. मोहरीच्या तेलाचा उपयोग केसांसाठीही होतो.

  • उटणे बनविण्यासाठी तुम्ही एक चमचा बेसन, एक चमचा उडीद डाळ पावडर, एक चमचा मोहरीचे तेल घ्या 
  • एका भांड्यात या वस्तू नीट मिक्स करून घ्या आणि बोटांवर जिथे जिथे केस आहेत तिथे लावा 
  • साधारण 10 मिनिट्स हे तसंच राहू द्या. ही पेस्ट सुकल्यानंतर हळूहळू हाताने रगडा 
  • आठवड्यातून 3-4 वेळा हे तुम्ही लावा. याचा लवकरच परिणाम मिळतो आणि नवे केस येणंही कमी होतं

लिंबू आणि साखर 

sugar

लिंबू आणि साखरेच्या मिश्रणानेही तुम्ही बोटांवरील केस हटवू शकता. बोटांवरील केस घालविण्यासाठी तुम्हाला हा सोपा उपाय करता येतो. 

ADVERTISEMENT
  • लिंबाची साल आणि एक चमचा साखर एका भांड्यात घ्या
  • लिंबाची साले तुम्ही उकळून घ्या. हे पाणी इतके उकळा की, त्याची जेल तयार होईल. जेव्हा जेल तयार होईल तेव्हा त्यात साखर मिक्स करा 
  • मिश्रण थंड होऊ द्या 
  • त्यानंतर हे मिश्रण बोटांवर लावा आणि हळूहळू रगडा 
  • असं केल्याने बोटांवरून केस हटविण्यास मदत मिळते. तसंच हातांचे टॅनिंगही दूर होते

सूचना – या घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्हाला त्वरीत परिणाम मिळेल असा आमचा दावा नाही. तसंच तुम्हाला यापैकी कोणत्याही वस्तूंची अलर्जी असेल तर तुम्ही त्याचा वापर करू नये अथवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापर करावा आणि त्याची योग्य काळजी घ्यावी. 

04 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT