पिगमेंटेशन ही एक खूप मोठी त्वचा समस्या आहे. काही जणींना तोंडाजवळील भाग, ओठांच्या खाली आणि वरील भाग तसंच ओठांच्या कोपऱ्यावर हायपर पिगमेंटेशन दिसून येते. यामागे हॉर्मोनल असंतुलन, तोडांतून गळणारी लाळ, सनटॅन, अनुवंशिकता अशी अनेक कारणं असू शकतात. मेकअप करताना कन्सीलर, कलर करेक्टर अथवा इतर काही साहित्य वापरून तुम्ही तात्पुरता हा काळेपणा कमी करू शकता. मात्र नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला तोंडाजवळील काळेपणा कमी करायचा असेल तर करा हे घरगुती उपाय
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम (Best Cream For Pigmentation In Marathi)
चण्याच्या डाळीचे पीठ-
त्वचेचा काळेपणा कमी करण्यासाठी, त्वचा उजळ दिसावी यासाठी तुम्ही चण्याच्या डाळीचे पीठ नक्कीच वापरू शकता. बेसनामध्ये असलेले ब्लीजिंग घटक तुमच्या त्वचेला मुळातून स्वच्छ आणि चमकदार करतात.
कसा कराल वापर –
दोन चमचे बेसन आणि चिमूटभर हळद मिक्स करा आणि गुलाबपाणी, दूध अथवा साध्या पाण्याने एक छान पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुमच्या तोंडाजवळील भागावर लावा आणि पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर
बटाट्याचा रस –
बटाट्याच्या रसमध्ये त्वचेला उजळ करणारे घटक असल्यामुळे तुमचा स्किन टोन सुधारण्यास मदत होते. तोंडामधून लाळ गळल्यामुळे जर तुमच्या ओठांजवळील भाग काळवंडला असेल तर त्यावर तुम्ही बटाट्याचा रस लावू शकता.
कसा कराल उपाय –
कच्चा बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा आणि तुमच्या ओठांजवळील भागावर लावा. तुम्ही कच्चा बटाटा चिरून त्याचे कापदेखील या भागावर चोळू शकता. सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा काही दिवसांमध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवू लागेल
घरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Anti Aging Face Packs In Marathi)
ग्लिसरिन आणि गुलाबपाणी –
हिवाळ्यात त्वचा कोरडी झाल्यामुळे कोरडी होते आणि काळवंडते. जर तुमच्या तोंडाजवळील भाग यामुळे काळवंडला असेल तर तो भाग स्वच्छ करण्यासोबत त्वचा मऊ होईल याची काळजी देखील घ्यायला हवी.
कसा कराल उपाय –
एक चमचा ग्लिसरिन आणि एक चमचा गुलाबपाणी एकत्र करा. हे मिश्रण ओठांच्या जवळील भागावर लावा आणि थोडं मसाज करा. रात्री हे मिश्रण लावून झोपा आणि सकाळी चेहरा धुवून टाका.
ओट्स –
ओटस् खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहेच पण त्याचप्रमाणे त्याचा तुमच्या त्वचेवरही चांगला परिणाम दिसून येतो. कारण ओट्समध्ये अॅंटि ऑक्सिडंट आणि अॅंटि इनफ्लेमटरी गुणधर्म आढळतात.
कसा कराल उपाय –
एक चमचा ओट्स वाटून घ्या आणि त्या पावडरमध्ये थोडं पाणी मिसळून पॅक तोंडाजवळील भागावर लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
मध आणि लिंबू –
मध आणि लिंबू पिंगमेंटेशन कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी नैसर्गिक घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा वापर तुम्ही यासाठी करू शकता.
कसा कराल उपाय –
एक चमचा लिंबाचा रस आणि एक ते दोन थेंब मध मिक्स करा. हे मिश्रण तोंडाजवळच्या भागावर लावा आणि पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा.