त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी डेली स्किन केअर रूटिन आणि नाईट स्किन केअर रूटिन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. दिवसा तुमच्या त्वचेला जशी चांगलं क्लिंझर, मॉईस्चराईझर, फेस पॅक, फेस क्रिम, सनस्क्रिनची गरज असते. अगदी त्याचप्रमाणे रात्री तुमच्या त्वचेला योग्य काळजी घेण्याची गरज असते. वास्तविक रात्रीच्या वेळी त्वचेवर लावण्यासाठी अनेक नाईट फेस मास्क, फेस स्क्रिम, लोशन आणि सिरम बाजारात मिळतात. रात्री त्वचेवर ही उत्पादने लावण्यामुळे तुमची त्वचा मऊ राहतेच शिवाय त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. मात्र तुम्हाला जर बाजारातील केमिकलयु्क्त प्रॉडक्ट सूट होत नसतील तर तुम्ही घरी देखील नैसर्गिक नाईट क्रिम बनवू शकता. यासाठी घरी असलेल्या बदामाच्या तेलापासून बनवा घरच्या घरी असं नैसर्गिक आणि सोपं नाईट क्रिम
त्वचेला का असते नाईट क्रिमची गरज –
दिवसभर काम करून थकल्यावर जशी तुमच्या शरीराला आरामाची गरज असते तशीच तुमच्या त्वचेलाही आरामाची गरज असते. त्वचेला पुरसा आराम मिळाल्यामुळे तुमची त्वचा टवटवीत राहते आणि त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. ज्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी ताजेतवाणे दिसता. मात्र जर तुम्ही रात्री त्वचेला नाईट क्रिम लावलं नाही तर रात्री तुमची त्वचा जास्त डिहायड्रेट होते. कारण तुम्ही रात्री झोपल्यावर बराच काळ पाणी पित नाही शिवाय तुम्ही पंखा अथवा एसीमध्ये झोपता. ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. यासाठी त्वचा हायड्रेट राहण्यासाठी त्वचेला नाईट क्रिम लावण्याची गरज असते.
बदाम तेलाचा काय होतो त्वचेवर परिणाम –
बदाम तेलामध्ये इतर पोषक घटकांसोबत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्वचेसाठी व्हिटॅमिन ई खूप गरजेचं आहे. ज्यामुळे तुमची कोरडी त्वचा मऊ, मुलायम होते आणि त्वचेच्या सर्व समस्यादूर होतात. रात्री झोपताना जाणिवपूर्वक बदाम तेलाचे नाईट क्रिम लावल्यास तुमच्या त्वचेवर चांगले परिणाम लगेच दिसू लागतात. यासाठी जाणून घ्या बदाम तेलापासून कसे बनवावे घरच्या घरी नाईट क्रिम
बदाम तेलाचे नाईट क्रिम
साहित्य –
एक चमचा बदामाचे तेल
एक चमचा कोको बटर
एक चमचा मध
एक चमचा गुलाबपाणी
यातील प्रमाण तुम्ही तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता.
बदामच्या तेलापासून नाईट क्रिम करण्याची पद्धत –
बदामाचे तेल, कोको बटर एका भांड्यात थोडं गरम करा.
थंड झाल्यावर त्यात गुलाबपाणी आणि मध टाका.
सर्व मिश्रण एकजीव करा आणि एका डबीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
बदामाच्या नाईट क्रिमचे फायदे
दररोज रात्री झोपताना नाईट क्रिमचे फायदे मिळतात. तुम्ही तुमचा चेहरा आणि मानेवर लावू शकता. यामध्ये तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मऊ ठेवणारे घटक आहेत. या घटकांमुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं आणि त्वचेला मुलायमपणा येतो. कोरडी त्वचा मऊ झाल्यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळेपणा, पिंगमेंटेशन कमी होते. शिवाय नियमित वापर केल्यास तुमची त्वचा चिरतरूण दिसू लागते.