अचानक काही प्लॅन झाल्यानंतर पटकन तयार व्हायचे म्हणजे तारेवरची कसरत असते. ड्रेस निवडणे आणि मेकअप करणे जितके कठीण आहे तितकेच कठीण आहे चेहऱ्यावर पटकन ग्लो आणणे आहे. पण चेहऱ्यावर पटकन ग्लो हवा असेल तर तुम्ही काही असे फेसमास्क वापरु शकता ज्यामुळे तुमच्या त्वचेवर चटकन बदल जाणवेल. घरात असलेल्या अशा साहित्यातून तुम्ही असे क्विक फेसमास्क बनवू शकता. हे मास्क अगदी कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी परफेक्ट आहेत. चला जाणून घेऊयात क्विक ग्लो येण्यासाठी फेसमास्क
लिपस्टिकच्या मदतीने अशी मिळवा तुमच्यासाठी परफेक्ट शेड
ओट्स- लिंबू मास्क
ओट्स- लिंबू हे मास्क कॉम्बिनेशन त्वचेसाठी खूपच चांगले आहे. ओट्समधील स्मुथिंग घटक त्वचा स्वच्छ करुन त्याला एक स्मुथ लुक देतात. ओट्स भिजत घाला त्यामध्ये अगदी एक ते दोन थेंब लिंबाचा रस घाला. एकत्र करुन ही जाड पेस्ट त्वचेला लावा. 5 मिनिटे त्वचेवर ठेवून हा मास्क थंड पाण्याने धुवून टाका. मास्क काढून टाकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आवडीचे सीरम किंवा रोझ वॉटर स्प्रिंकल करा. तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल .
दही- लिंबू मास्क
दही हे पटकन ग्लो देण्यासाठी फारच फायद्याचे असते. दही- लिंबू चेहऱ्यावरील काळे डाग लाईट करुन त्वचा ग्लो करण्यास मदत करते. दोन चमचे दही चांगले फेटून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस किंवा संत्र्याचा रस घालून हा तयार मास्क चेहऱ्याला लावा. वाळेपर्यंत ठेवा त्यानंतर धुवून टाका. चेहऱ्यावर त्यामुळे इन्स्टंट ग्लो येतो. जर तुम्हाला चेहरा खूप तेलकट वाटत असेल तर चेहरा पाण्याने पुन्हा धुवा. त्यानंतर मेकअप करा चेहरा खूप सुंदर दिसतो.
तांदुळाचा मास्क
अनेक चायनीज आणि कोरिअन ब्युटी रेजीममध्ये तांदूळाचा उपयोग केला जातो. जर तुम्हाला ग्लोसोबत त्वचा फ्रेश दिसावी असे वाटत असेल तर तुम्ही घरी असलेले तांदूळ पाण्यात भिजत घाला. त्याचे पाणी काढून न टाकता ते वाटून घ्या. आता ही पेस्ट चेहऱ्याला लावा. हा मास्त तुमची त्वचा फ्रेश ठेवण्यासोबत त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतो आणि चेहरा परफेक्ट करतो.
ट्रिपल क्लिंझिंग म्हणजे काय, त्वचेसाठी आहे का फायदेशीर
गुलाबाच्या पाकळ्या- मध
गुलाबाचे फूल हे सौंदर्यात फारच महत्वाचे असते. गुलाबांच्या पाकळ्य आणि मधाचा उपयोग करुनही तुम्ही मास्क तयार करु शकता. यामध्ये मधाचे प्रमाणे खूप असता कामा नये. मधामधील असलेले अँटिऑक्सिडंट घटक आणि गुलाबाच्या पाकळ्यामधील घटक त्वचेवर तजेला आणण्यास मदत करतात.
पुदिना- ओट्स फेसमास्क
किचनमधील काही कॉम्बिनेशन हे त्वचेसाठी फारच आदर्श मानले जातात. असेच कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे पुदिना आणि ओट्स. दोन्ही साहित्य समप्रमाणात घेऊन त्याचा एक मास्क तयार करा. असा मास्क खूपच रिफ्रेशिंग आणि त्वचेवर पटकन ग्लो आणतो. याच्या एका वापरातच त्वचा उजळते.
आता पटकन त्वचेला तयार करायचे असेल तर अशा पद्धतीने फेसमास्क वापरुन त्वचा ग्लो करु शकता.