मेष: जोडीदाराच्या सहकार्याची होईल मदत
जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला तुमचे करिअर घडवायला मदत करेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद दूर करण्यास सोपे जाईल. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायिक भागीदारीत फायदा होईल. देण्या-घेण्याचे व्यवहार करताना सावध राहा.
कुंभ: महत्त्वपूर्ण निर्णय लगेचच घ्या
आज कामाच्या ठिकाणी झालेल्या चुकीमुळे तुमच्या डोक्याचा ताप वाढू शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.महत्वपूर्ण निर्णय लगेचच घ्या. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनवृद्धी होण्याची शक्यता आहे.वरिष्ठांच्या आरोग्यामुळे तुम्ही सतत चिंतीत राहाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मीन: आरोग्य बिघडण्याची शक्यता
कामाच्या व्यापामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमची नेहमीची कामे वेळेवर पूर्ण करा. खाण्यापिण्याची काळजी घ्या.जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. दुसऱ्यांकडून सहाकार्य मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. विरोधक हार मानतील. देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावधान
वृषभ : कामाचा पसारा आवरण्यात यश मिळेल
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कामाचा पसारा आवरण्यात यश मिळेल.उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायातील नवे संबध फायद्याचे ठरतील. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. एखादी धार्मिक यात्रा घडण्याचे योग आहेत. रचनात्मक कामात प्रगती होईल.मित्रांची झालेली भेट सुखद असेल.
मिथुन: आज कोणतेही कर्ज घेऊ नका
नव्या योजनेसाठी अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. आज कोणतेही कर्ज घेऊ नका. कारण ते कर्ज फेडणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे कोणताही निर्णय घेणे तुम्हाला कठीण जाऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्रांचे सहकार्य लाभेल. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
कर्क : कामाच्या ठिकाणी सावध राहा
आईचे आरोग्य बिघडले असेल तर तिच्या आरोग्यात सुधारणा होईल. आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार असाल. कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहा.व्यवसायात एखाद्या नव्या योजनेला यश मिळेल. अडकलेले काम पूर्ण झाल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्सास वाढेल.जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
सिंह: जवळच्या व्यक्ती नाराज होऊ शकतात
आज कुटुंबातील लोक तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. विनाकारणच्या तणावापासून दूर राहा. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात असलेल्या तक्रारी दूर होतील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या: सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करुन काम करा
जोडीदाराला बळावलेला आजार त्याला पुन्हा त्रास देण्याची शक्यता आहे. रोजच्या भांडणांमुळे नोकरी किंवा एखादे काम सोडण्याचा विचार कराल. कोणतेही असे काम करु नका. ज्यामुळे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल.देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावधान. जोडीदारासोबत संबंध अधिक मजबूत होतील.
तूळ: परदेश यात्रेचे योग आहेत
देण्या-घेण्याचे व्यवहार आज सुटल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल. स्थावर मालमत्ता घेण्याचा विचार कराल. परदेश यात्रेचे योग आहेत. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल. कामाच्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.वाहन चालवताना सावधान. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.
वृश्चिक: मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील
आज मन आनंदी राहील. ज्या लोकांनी तुम्हाला विरोध करत होते. त्यांचे सहकार्य तुम्हाला लाभेल.नवे मित्र बनतील. मित्रांच्या मदतीने अडकलेली कामे पूर्ण होतील. कोर्ट कचेरीतल्या केसेस सुटण्याची आज शक्यता आहेत.कोणत्यातरी संस्थेद्वारे तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे.
धनु: सध्या करत असलेल्या कामाचा भविष्यात फायदा
कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची होण्याची शक्यता आहे.तुमच्या आवडीची एखादी सुविधा न मिळाल्यामुळे तुम्ही एखादे काम सोडून देण्याचा विचार करु शकता. जे काम तुम्ही सध्या करत आहात ते करत राहा कारण भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. धार्मिक कार्यात तुम्हाला अधिक आनंद मिळेल. मित्रांसोबत केलेली एखादी पिकनिक आनंददायी असेल. कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतील.
मकर: वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल
आयात- निर्यात या क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना आज फायदा होण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यात आज तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायासाठी विमानाने जाण्याचा योग आहे.आज तुम्ही एखाद्या राजनैतिक किंवा मंगल कार्यात व्यग्र असण्याची शक्यता आहे.बिघडलेली कामे पूर्ण होतील. नात्यात गोडवा टिकू राहील.
हेही वाचा
तुम्हाला नक्की कसं सेक्स करायचं आहे हे सांगू शकते तुमची रास
जाणून घ्या राशीनुसार काय आहे तुमचा लकी नंबर
आळशी असतात या राशीचे लोक तुम्ही ही आहात का आळशी