मेष : स्वयंपूर्ण बनाल
प्रथम स्थानातील राशी स्वामी आपल्याला स्वयंपूर्ण बनविणार आहे. स्वत:च्या बळावर कोणतीही गोष्ट पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहिल. व्यापार, व्यवसायासाठीही आजचा दिवस सुखद असा आहे. आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवा. अगोदर श्रम नंतरच भाग्य अशीही परिस्थिती आपल्याला अनुभवायला येईल. परिश्रम करीत राहा व त्यात सातत्य ठेवा. तुमच्या हाताला यश नक्की मिळेल.
कुंभ : प्रॉपर्टीतून लाभ
आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. बाहेरच्या पदार्थ किंवा विशेषत: जंक फूड आज खाऊच नका. त्रास होऊ शकतो. जोडीदाराशी मतभेद होऊन मनमुटाव होण्याची शक्यता आहे. घरोघरी मातीच्या चुली असतात. त्यामुळे विषय वाढवू नका. सामंजस्याचे धोरण स्विकारा.
मीन : व्यवसायात यश
इच्छेपेक्षा जास्त मिळविण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. व्यवसायामध्ये फार मोठं यश आज तुम्हाला मिळू शकतं. संधीला ओळखून तिचा लाभ करुन घ्या. जोडीदाराबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. वादापेक्षा किंवा तो वाढविण्यापेक्षा तो सुधरविण्यावर भर द्या.
वृषभ : भाग्याची साथ
आपल्या राशीचा स्वामी भाग्यात असल्यामुळे आपल्याला भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे जे काही करायचे आहे, ते आजच करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात मात्र गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले एखादे महत्त्वपूर्ण काम आज पूर्ण होऊ शकतं. म्हणून प्रयत्न वाढवा. नाही तर हत्ती गेला नि शेपूट राहिले अशी परिस्थिती होईल.
मिथुन : व्यवसायात संधी
आपल्या राशीचा स्वामी हा दशमात असल्यामुळे व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. त्याचा योग्य तो लाभ घ्यावा. कुटुंबात आज आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज मदत मिळणार आहे. तुम्ही आज जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात. आरोग्यही उत्तम राहिल. दिवसभर ताजेतवाने राहाल.
कर्क : कर्जाचा विचार
आपल्या राशीचा स्वामी हा शष्टात असल्यामुळे कर्जाचा विचार आपल्या मनात येणार आहे. त्यामुळे विचारपूर्वकच निर्णय घ्यावा. व्यवसायात आज घवघवीत यश मिळविण्याचा दिवस आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी आज सज्ज राहायला हवे. अपेक्षेपेक्षा जास्त काही मिळविण्याचा आजचा दिवस आहे. मात्र झटपट पैसे कमविण्याच्या मार्गाला जाऊ नका.
सिंह : सुसंवाद होईल
आपल्या राशीचा स्वामी सप्तमात असल्यामुळे जोडीदाराशी आपल्या योग्य तो सुंसवाद होणार आहे. त्यामुळे संबंध बिघडलेले असतील तर आज त्यांना सुधरविण्याची संधी आहे. व्यावसायिकांनी आज आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवावे. गरज असेल तिथे स्वार्थीही होण्याची आवश्यकता आहे. सरकारी कर्मचारी मात्र आज गोंधळात पडू शकतात.
कन्या : आरोग्याकडे लक्ष द्या
आज तुम्हाला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. छोटी दुखणीही त्रासदायक ठरु शकतात. सासरच्या मंडळींशी कुठल्या तरी कारणाने आज वाद होऊ शकतो. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा. वाद वाढवू नका. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी स्वत:ची अवस्था होऊ देऊ नका. शत्रु वरचढ होतील.
तूळ : खर्चाकडे लक्ष द्या
अंथरुन पाहूनच पाय पसरायचे असतात. आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च होणार नाही, याकडे आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. आर्थिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे. आपल्याला आज आरोग्याकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. छोटी दुखणीही त्रासदायक ठरु शकतात. तसेच जेष्ठ नागरीकांनीही आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवा
आवश्यक असलेले खर्च करावेच लागतात. मात्र खर्च करीत असतांना आपल्या उत्पन्नाकडे लक्ष ठेवणे व त्यानुसार त्यावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक असते. म्हणून आंथरुन पाहून पाय पसरायचे असतात. वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. तुमच्यासाठी ते अत्यावश्यक आहे. आज जोडीदरासोबत तुम्हाला प्रावासाचा आनंद घेता येणार आहे.
धनु : स्वार्थी बना
कधी कधी स्वार्थी बनणेही आवश्यक असते. व्यावसायिकांनी आज स्वार्थी बनून आपल्या नफ्याकडे लक्ष द्यायला हवे. आज तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्ही जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.
मकर : जोड व्यवसायाचा विचार
प्रगतीच्या दृष्टीकोनातून आज तुमच्या मनात जोड व्यवसायाचा विचार येऊ शकतो. त्यामुळे जोही निर्णय घ्याल तो विचारपूर्वकच घ्या. नाही तर एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था होईल. अन्नबाधेचा त्रास होण्याची शक्यता आहे. आहार व पथ्यांवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळून त्यातून खर्चही होणार आहे.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र