मेष- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. शारीरिक दुखापत होऊ शकते. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. मेहनतीचे फळ मिळेल. देणी-घेणी करताना सावध रहा.
कुंभ – नात्यातील कटूपणा वाढेल
आज संवेदनशीलता आणि राग यावर नियंत्रण ठेवा. नातेसंबध बिगडू शकतात. एखादी समस्या प्रेम आणि शांतीने सोडवा. संकटसमयी मित्रांची मदत मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या सुटतील. व्यापारात यश मिळेल. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
मीन- नवीन प्रोजेक्ट मिळेल
आज एखाद्या नवीन प्रोजेक्टवर कामाची संधी मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात नवीन सहकारी लाभतील. नोकरीत उन्नती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. महत्वाची कामे सर्वात आधी करा. आत्मसन्मान वाढेल. प्रेमात त्रिकोण निर्माण होऊ शकतो.
वृषभ – प्रेमात यश मिळेल
प्रेमप्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. मनासारखा जोडीदार मिळेल. कायदेशीर समस्या सुटतील. व्यवसायात नवीन ओळखींमुळे लाभ होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार करताना सावध रहा. बोलताना सावध रहा. राजकारणाचा फायदा होईल. मित्रांशी भेट होण्याची शक्यता.
मिथुन- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी आज एखादे आव्हान समोर येण्याची शक्यता आहे. काम करताना सावध रहा. समस्या सुटतील. अडकलेल्या कामांना गती मिळेल. कौंटुबिक वातावरण आनंदाचे असेल. संतानप्राप्तीची योजना आखाल. आईचे सहकार्य मिळेल.
कर्क – संपत्तीचा वारसाहक्क मिळेल
आज दिवस नवीन योजना आखण्यात जाईल. कुटुंबाकडून सांपत्तिक वारसाहक्क मिळू शकतो. व्यवसायाच्या नवीन योजना मनात येतील. नवीन संपर्कातून लाभ होण्याची शक्यता. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल.वाहन खरेदीचा विचार कराल.
सिंह – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही
विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. वरिष्ठांचा विरोध होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची काळजी घ्या. एखाद्या जवळच्या मित्रांकडून मदत मिळाल्याने बिघडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराची मदत मिळेल.
कन्या – जोडीदाराचे आरोग्य बिघडेल
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मन अशांत आणि निराश होण्याची शक्यता आहे. कौंटुबिक बाबतीत सर्वांचे मत विचारात घ्या. जोखिमेच्या कामांपासून दूर रहा. व्यवसायात नवीन ओळखींचा फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
तूळ – कुटुंबातील वाद मिटतील
आझ तुमचे भाग्य तुमची साथ देणार आहे. कौटुंबिक वाद कमी होतील. विरोधक हार पत्करू शकतात. नवीन ओळखींचा फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. राजकारणात जबाबदारी वाढेल.वादविवादांपासून दूर रहा. जोखिम उचलू नका. प्रवासाचे योग आहेत.
वृश्चिक – विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना त्यांच्या सकारात्मक विचारसरणीचा फायद होईल. विशेष गुणांमुळे यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
धनु – आर्थिक संकट येण्याची शक्यता
आयात -निर्यातीच्या व्यवसायामध्ये एखादे संकट येऊ शकते. उत्पन्नाची नवीन साधने शोधावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. कुटुंबाची साथ मिळेल. रचनात्मक कार्यात यश मिळेल. प्रवास करणे टाळा.
मकर – आरोग्य सुधारेल
आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध रहा. प्रवासामुळे फ्रेश व्हाल. मानसिक ऊर्जा वाढेल. उत्पन्नाची साधने वाढतील. योजना सफळ होतील, धार्मिक कार्यात यश मिळेल. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. स्वार्थी लोकांपासून सावध रहा.
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली