मेष – दृष्टीसमस्याा अथवा डोके दुखी जाणवेल
आज तुमच्या मुलांना दृष्टी दोष अथवा डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अचानक प्रवासाची योजना आखाल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. जोखिमेची कामे घेऊ नका. देणी-घेणी सांभाळून करा.
कुंभ – आईच्या तब्येतीची काळजी घ्या
आईच्या तब्येतीची काळजी घ्या. हेल्थ रिपोर्ट चांगला आल्याने मन आनंदी असेल. कौटुंबिक मंगलकार्यात सहभागी व्हाल. व्यावसायिक प्रवास करावा लागेल. राजकारणात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मीन – खाजगी संबध बिघडण्याची शक्यता
आज संवेदनशीलता आणि क्रोध या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवा. खाजगी संबंधात कडवटपणा येण्याची शक्यता आहे. कठीण काळात मित्रांची मदत मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार आहेत. देणी-घेणी सांभाळून करा.
वृषभ – धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे
रखडलेली धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून चांगली भेटवस्तू मिळेल. कामातील कौशल्यामुळे आज तुमचे अधिकारी खुश होणार आहेत. पदोन्नतीच्या संधी मिळणार आहेत. नवीन व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – कौटुंबिक वाद दूर होतील
आज तुमचे कौटुंबिक वाद कमी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. राजकारणातील सक्रीयता वाढणार आहे. महत्त्वाची योजना पूर्ण झाल्यामुळे यश मिळेल.
कर्क – नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मन द्विधा मनःस्थिती जाणवेल. घाईघाईत अथवा भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात मन रमेल.
सिंह – व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता
आज नवीन योजनांमुळे तुमचा व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. उत्पन्नाची नवीन साधने वाढणार आहेत. जुने संबंध आज सुधारणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्या जाणवतील.
कन्या – रोजगार शोधावा लागेल
आज युवांना नवीन रोजगार शोधावा लागला आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात समस्या येतील. जोडीदारासोबत तणाव वाढणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
तुला – पोटाच्या समस्या जाणवतील
आज तुमच्या आईला पोटाच्या समस्या जाणवतील. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रतिष्ठित लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे. प्रवास खर्च टाळा.
वृश्चिक – कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होण्याची शक्यता
आज एखाद्या महत्त्वाची जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात. अचानक सुखद वार्ता कानावर पडेल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
धनु – नवीन योजना पूर्ण होतील
आज काहीतरी नवीन करण्याची योजना आखाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. व्यवसायात राजकारणांची मदत मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कौटुंबिक सहकार्य मिळेल.
मकर – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. जोडीदाराशी भावनिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी