मेष – रक्तदाब सुधारेल
रक्तदाबाच्या समस्येमध्ये आराम मिळेल. आहारावर नियंत्रण ठेवा. आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका.
कुंभ – योजना सफळ होतील.
तरूणांना नोकरीची संधी मिळेल. नवीन प्रोजेक्टमध्ये सूचवलेल्या योजना सफळ होतील. उत्पन्नाचे साधन वाढेल. भागीदारीमध्ये नवीन उद्योग करण्यास सुरूवात करा. वाहन चालवताना सावध रहा. राजकारणामध्ये नेतृत्वाची संधी मिळेल.
मीन- पैशांचा व्यवहार करू नका
व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेताना सावध रहा. आज कोणताही मोठा व्यवहार करू नका. विनाकारण दगदग होऊ शकते. विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये यश मिळेल. वाहनाबाबत अडचण येई शकते. अडकलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ – मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता
मित्रमंडळींमध्ये तणाव वाढेल. बोलताना सावध रहा. प्रेमसंबधांमध्ये त्रिकोण स्थिती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी विरोध वाढेल. द्विधा मनःस्थितीत असताना कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. धोक्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
मिथुन – अनमोल भेटवस्तू मिळेल
आजचा तुमचा दिवस अतिशय आनंदाचा असेल. एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. गेलेले पैसे पुन्हा परत मिळतील. व्यवसायामध्ये फायदा होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. घरासाठी एखादी महागडी भेटवस्तू खरेदी करा.
कर्क – अंगदुखीचा त्रास होईल
अंगदुखीमुळे त्रस्त व्हाल. दिवसभर शारीरिक थकवा जाणवेल. आहाराबाबत सावध रहा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहिल. धोक्यांपासून सावध रहा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. जोडीदारासोबत नातेसंबध सुधारतील.
सिंह – नवीन नातेसंबध निर्माण होतील
जोडीदाराच्या भावना समजून घेऊन समस्या दूर करा. नवीन नातेसंबधांमुळे आनंद मिळेल. एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये मानसन्मान मिळण्याची शक्यता. कायद्याच्या त्रासातून सुटका मिळेल. देणी-घेणी करताना सावध रहा.
कन्या – उद्योगात यश
उद्योग धंद्यामध्ये यश मिळेल. विनाकारण दगदग वाढेल. कामाच्या ठिकाणी वाद निर्माण होतील. राजकारणात सहकार्य मिळेल. कलात्मक कार्यांमध्ये रस वाढेल.
तूळ – नवीन ओळखी वाढतील
वास्तूमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये वाढ होईल. नवीन ओळखी वाढतील. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. महत्त्वाची कामे आधी पूर्ण करा. वाहन खरेदीचा योग आहे.
वृश्चिक – नवीन नोकरी शोधावी लागेल
नोकरीच्या शोधासाठी दगदग करावी लागेल. व्यावसायिक कार्यांत मंद गतीमुळे तणाव वाढेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता.आत्मविश्वासाने काम करा. रागावर विशेष नियंत्रण ठेवण्याची गरज. धार्मिक कार्यात मन रमवा.
धनु – नातेसंबध सुधारतील
भाग्योदयाचे संकेत आहेत. गैरसमज दूर झाल्याने नातेसंबध गोड होतील. टीकेपासून दूर रहा. बोलताना विशेष सावध रहा. नोकरीमध्ये जबाबदाऱ्या कमी होतील. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण होतील.
मकर- अपचनाचा त्रास
आज तुम्हाला अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. खाताना सावध रहा. सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. काम वेळते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये नवीन सहकारी मिळतील. कायदेशीर गोष्टींमधून चांगला मार्ग निघेल. सामाजिक मानसन्मान वाढेल.