मेष – आरोग्यात सुधारणा होईल
आज जुनाट रोगांपासून तुमची सुटका होणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हान समोर येणार आहे. आप्तजनांची भेट झाल्याने आनंद मिळेल. रचनात्मक कार्यातून प्रसिद्धी वाढणार आहे.
कुंभ – विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल
आज विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आज तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होणार आहे. कामातील कौशल्यामुळे आज अधिकारी तुमच्यावर खुश होतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सन्मान मिळेल.
मीन- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांसोबत देणी घेणी करताना साववध रहा. सध्या प्रवासाला जाणे टाळा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
वृषभ – प्रेमसंबंध बिघडण्याची शक्यता आहे
आज तुमचे प्रेमसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींमुळे समस्या आणि त्रास वाढू शकतो. एखाद्या जवळच्या मित्र अथवा मैत्रीणीसोबत भांडण होऊ शकते. वैचारिक मतभेद झाल्याने कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. वाद विवाद करणे टाळा.
मिथुन – ताण तणाव वाढणार आहे
आज दिवसभर एखाद्या कारणामुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. एखादी अनामिक भिती तुम्हाला त्रास देऊ शकते. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे.
कर्क – उधारी परत मिळेल
आज दिलेले उधार पैसे तुम्हाला पुन्हा मिळणार आहेत. कौटुंबिक सुखसाधनांमध्ये वाढ होऊ शकते. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी तयार रहा. व्यवसायात मेहनत घेतल्याने लाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
सिंह – अविवाहितांसाठी काळ अनुकूल आहे
आज जवळच्या नातेसंबंधांमध्ये मजबूती येईल. अविवाहितांसाठी चांगला योग आहे. सामाजिक स्थान मजबूत करण्याचा विचार कराल. एखाद्या छोट्याशा कामासाठी मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कन्या – नवीन काम सुरू करण्याची घाई करू नका
आज एखादे नवे काम सुरू करण्याची मुळीच घाई करू नका. व्यवसायात खोटं बोलणंं टाळा. कोणालाही एखादे वचन देऊ नका. तरूणांना करियरची नवी संधी मिळेल. देणी घेणी सावधपणे करा. आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
तूळ – चल अचल संपत्ती खरेदी कराल
आज तुम्ही एखादी चल अचल संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग आहे.
वृश्चिक – अधिकारी व्यक्तींसोबत वाद होण्याची शक्यता
आज कामाच्या ठिकाणी अधिकारी व्यक्तीसोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारांमुळे तरूण निराश होतील. नियोजित कामाला आज सुरूवात करू नका. अचानत धनलाभ होण्याची शक्यता आहे.
धनु – मुलांबाबत असलेली कर्तव्ये पूर्ण कराल
वातावरण झालेल्या बदलांमुळे आजारपण येण्याची शक्यता आहे. सांभाळून रहा. मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. नवीन ओळखींचा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. विचारपूर्वक खर्च करा.
मकर- प्रेमसंबंध सुधारण्याची संधी मिळेल
आज तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध पुन्हा सुधारण्याची संधी मिळेल. भावंडांच्या सहकार्यांने व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत असलेले जुना वाद मिटेल. सामाजिक सन्मानात वाढ होईल. देणी-घेणी सांभाळून करा.
अधिक वाचा
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली