मेष – महत्त्वपूर्ण निर्णय आज करू नका
आजचा दिवस तुमच्यासाठी द्विधा मनस्थितीचा आहे. आत्मबलही कमी होणारे आहे. त्यामुळे आज कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. प्रयत्न करुनही यश प्राप्त होत नसल्यामुळे आज तुम्हाला प्रयत्नांची दिशा बदलाविशी वाटेल. मात्र ते करीत असताना आपले प्रयत्न खरंच चुकीच्या दिशेने होत आहेत का याची शहानिशा करुनच दिशा बदला. आज तुम्ही सहनशिलताही दाखवाल. त्यामुळे उत्साहही टिकून राहिल. स्त्रीयांना आज मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणतंही धाडस आज करू नका. कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीमध्ये मन रमविण्याचा प्रयत्न करा.
कुंभ – कलाकारांना यश मिळेल
कोणताही कलाकार हा अतिशय कल्पक व सर्जनशील असतो. तो नाविन्याचा भोक्ता असतो. या गोष्टी सर्वांना आवडत असल्या तरी त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळतचे असे नाही. मात्र कलेला वाव मिळाला तर कलाकारांना होणारा आनंद हा शब्दात वर्णन करता येणारा नाही. आज आपल्या कल्पक व सर्जनशील कार्यात प्रगती होण्याचे योग आहेत. म्हणजे आपल्यात दडलेल्या कलाकाराला आज प्राप्त होऊ शकतं. हा आनंद द्विगुणित करणारी घटना म्हणजे आज तुमचे शत्रु पराभूत होणार आहेत. आज तुम्हाल जोडीदाराकडूनही सहकार्य मिळू शकतं. म्हणजे घरात आनंदी आनंद राहिल. मात्र वाढलेला खर्च मनस्वास्थ बिघडवू शकतो. म्हणून अनावश्यक खर्चाला कात्री लावलेलीच बरी राहिल.
मीन – वडिलांचे मार्गदर्शन मिळेल
वडील किंवा आपले हितचिंतकांचे मार्गदर्शन नेहमी घ्यायला हवे. आपण कितीही ज्ञानी असलो तरी जीवनाचा त्यांचा अनुभव मोठा असतो. शिवाय ज्ञानी माणसाचा प्रत्येक निर्णय योग्यच असतो असे नाही. आज तुम्हाला वडीलांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या कामामध्ये त्याचा उपयोग करुन घ्या. तुम्हाला अपेक्षित असे यश नक्कीच मिळेल. त्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असल्याची भावनाही मनात दाटून येईल. आपल्या मानसन्मानामध्येही वाढ होऊ शकतो. त्याचा स्विकार करण्यासाठी आज तयार राहा. त्यातून तुमचे आत्मबल वाढणार आहे. घरातही आज आनंदाचे वातावरण राहणार आहे.
वृषभ – विद्यार्थी अभ्यास टाळतील
विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांचा मूड नसेल किंवा त्यांनी बाहेर मित्रांसोबत कुठल्या तरी गोष्टींचे नियोजन केलेले असेल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यास पूर्णपणे न टाळता होमवर्क तरी पूर्ण करावा. आज नवीन ओळखी होऊ शकतात. या ओळखींचा तुम्हाला भविष्यात नक्कीच चांगला फायदा होणार आहे. मुलं आज तुमच्या आवडीनूसार वागणार नाहीत. तसंही आपली आवड मुलांवर थोपवू नये. अभ्यास झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे मोकळीक द्यायला काहिच हरकत नाही. कलाकारांना आज यश प्राप्त होऊ शकतं.
मिथुन – आत्मिक समाधान लाभेल
जीवन जगण्यासाठी किंवा कोणतंही काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्या कामात आत्मिक समाधान लाभणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे कामाचा उत्साह अजून वाढतो. याची तुम्हाला अनुभूती देणारा आजचा दिवस आहे. आज परमेश्वराचा आपल्यावर वरदहस्त आहे ही भावना आज तुमच्या मनामध्ये दाटून येईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो. आज तुमच्यासाठी प्रवासाचेही योग आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रवास तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत करणार आहे. आज आनंदाचे वातावरण राहिल. कलाकारांना आज त्यांच्या कलेला वाव मिळून यश प्राप्त होऊ शकतं. आज लौकिकात भर पडू शकते.
कर्क – स्त्रियांना मानसिक तणाव
आज स्त्रियांसाठी चिंतेचा दिवस आहे. कारण आज त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. तसेच जी गोष्ट आवडते त्यात आपले मन रमवा. विद्याथ्र्यांचे संपूर्ण लक्ष आज अभ्यासात राहिल. त्यांना आज यशही चांगले प्राप्त होईल. सरकारी कर्मचा-यांसाठी आजचा दिवस चिंतेचा असून त्यांनी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेतला पाहिजे. जेणे करुन आपल्याकडून काही चुकीचे कृत्य किंवा कुणी दुखावले जाणार नाही. नोकरी व व्यवसायात आज चांगली संधी चालून येईल. तिला ओळखून तिचा योग्य लाभ घ्यायला हरकत नाही.
सिंह – खर्चात वाढ होईल
जीवनामध्ये कमविणं जेवढे गरजेचे आहे तेवढेच खर्च करणंही गरजेचे आहे. काहिही असलं तरी आज आपल्याला खर्च नियंत्रणात ठेवणे गरजेच आहे. म्हणजे जे खर्च अवास्तव असतील किंवा अनावश्यक असतील त्यांना कात्री लावावी लागणार आहे. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या आरो्याची काळजी घेतली पाहिजे. छोटे दुखणे डोके वर काढू शकतात. व्यवसाय करीत असताना आज नफ्याकडे जास्त लक्ष ठेवले पाहिजे. कारण आज तुम्ही जोड व्यवसायाचा विचार करणार आहात.
कन्या – प्रवासातून संधी मिळतील
त्रास करुन नाही घेतला तर कुठलाही प्रवास चांगला असू शकतो. काम काहीही असो प्रवासामुळे रोजच्या दिनचर्येतून आपल्याला बाहेर पडण्याची संधी मिळत असते. म्हणून प्रवासाचा कधीही त्रास करुन घेऊ नये. त्यात जर प्रवासातूनही काही संधी मिळणार असतील तर आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही. याची अनुभूती आज आपल्याला मिळणार आहे. आज आपल्यासाठी प्रवासाचा योग असून त्यातून संधीही मिळणार आहे. आज तुम्ही समजुतदारपणा दाखविणार असल्यामुळे उत्साहही टिकून राहणार आहे. मुलं मात्र आज तुमच्या आवडीनूसार वागणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच आज तुमच्या हिताचं राहिल. वास्तुवर आनंदाने खर्च करण्याचा आजचा तुमचा दिवस आहे.
तूळ – आज घरचे जेवणच बरे
बाहेरील चटपटीत पदार्थ खाण्याचा कितीही मोह झाला तरी आज घरचे जेवण घेतलेलेच तुमच्यासाठी योग्य राहिल. नाईलाजाने खावेच लागले तर जंक फूड तरी प्रकर्षाने टाळा. कारण आज तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो.एखादे काम अपूर्ण असेल तर आज चिकाटी दाखवा. जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहा. अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत राहा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. कलाकारांसाठी आज शुभ दिवस आहे. आज त्यांच्या कलेला वाव मिळून यश मिळू शकतं. एक मात्र लक्षात ठेवा नक्की कुठलंच यश सहजासहजी मिळत नाही. कठोर परिश्रम घ्यावेच लागतील.
वृश्चिक – मित्र आनंद देतील
सांसारीक मनुष्याच्या जीवनामध्ये मित्रासोबत रमण्याचे क्षण तसे फारच कमी येतात. म्हणून त्या क्षणांचा आनंद काही वेगळाच असतो. त्या आनंदाची अनुभूती तुम्ही आज घेणार आहात. कारण आज मित्र तुम्हाला आनंद देऊ शकतील. त्यांच्या सोबत तुम्ही आज एखाद्या गोष्टीचे नियोजन कराल. आज आनंदाचे वातावरण राहिल. आज शक्य तितक्या शिस्तीत वागा. आपल्या मानसन्मानात वाढ होण्याचे योग आहेत. अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून खाण्यावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या.
धनु – मानसिक शांतीसह खर्चही
कधी कधी एखादी चांगली गोष्ट घडते, तिचा आनंद मिळतो ना मिळतो तोच दुसरी एखादी गोष्ट लक्ष विचलित करते. याची प्रचिती आज तुम्हाला मिळेल. कारण आज तुम्हाला मानसिक सुखशांती मिळणार आहे. खर्चही वाढण्याचे योग आहे. आज जमाखर्चाचा योग्य ताळमेळ बसवा. स्त्री पक्षाकडून आज तुम्हाला सहयोग मिळणार आहे. त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. विद्यार्थ्यांचे मात्र आज अभ्यासात मन लागणार नाही. इतर गोष्टी करण्यावर त्यांचा भर राहिल.
मकर – उत्पन्नानूसार खर्च करा
खर्च टाळता येण्यासारखा नसला तरी तो करीत असताना आपले उत्पन्न बघणे कधीही हिताचे असते. आपल्याला हे शिकविणारा आजचा दिवस आहे. आज उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवा. जे आवस्तव किंवा अनावश्यक खर्च असतील त्यांना कात्री लावा. नोकरी व व्यवसायात आज संधी चालून येतील. त्यांचा योग्य लाभ घ्या. मात्र कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज न घेतलेलेच बरे. त्यांना शक्य तितके आज टाळण्याचा प्रयत्न करा. संधीवात ज्यांना असेल त्यांचा आजार आज वाढू शकतो. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद