मेष : आरोग्याकडे लक्ष द्या
आरोग्याकडे लक्ष द्या असा सल्ला आज आपणास देण्यात येत आहे. छोटे दुखणे आज त्रासदायक ठरु शकतात. तुम्हाला काही पथ्य सांगितलेले असतील तर आज ते पाळ्यावर भर द्या. उथळ पाण्याला खळखळात फार त्यानुसार अतिआत्मविश्वास हा घातक असतो. सावध राहा. कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्नावरील निर्णय आज घेऊ नका.
कुंभ : मित्रांकडून आनंद
आज तुम्हाला मित्रांकडून आनंदाची प्राप्ती होऊ शकते. त्यांची मदत होईल किंवा त्यांच्या सोबत आज तुम्ही एखाद्या गोष्टीचे नियोजन करणार आहात. कोणाशीही बोलतांना अचूक संवाद साधा. यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्या. आपले हित साधून घ्या.
मीन : घरात लक्ष द्या
आज तुम्हाला घरात लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. घरामध्ये जर शितयुद्ध सुरु असेल तर ते वाद वाढण्याआधी वेळीच थांबविण्याचा प्रयत्न करा. नाही तर एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था होईल. मोठ्या फायदा होणार असेल तर त्यासाठी लहान नुकसानाकडे पाहू नका. त्याला गुंतवणूक समजा.
वृषभ : भावंडांची काळजी घ्या
लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा. कदाचित तुमच्या मदतीची, मार्गदर्शनाची त्यांना आवश्यकता असू शकते. कुणावरही विसंबून राहू नका. नाही तर पश्चातापाची वेळ येईल. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या. एखाद्यावर आज विनाकारण संताप येईल. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करुन गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन : लाभ होईल
सासुरवाडीकडून आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. संबंध सुदृढ होण्यास मदत मिळेल. मानसिक तणाव जर आज जाणवत असेल तर तो घालविण्यासाठी संगित ऐकण्यावर भर द्या. मनाला शांती मिळेल. एखाद्या आनंददायी गोष्टीमुळे मानसन्मानात वाढ होऊ शकते.
कर्क : नवीन ओळखी
आज तुमच्या नवीन ओळखी होण्याचा योग आहे. त्यांना सकारात्मकतेने व आत्मविश्वासाने सामोरे जा. संबंध वाढवून घ्या. टिका किंवा तक्रार करण्यामध्ये आज वेळ घालवू नका. पदरी पडले अन् पवित्र झाले मानुन जे मिळतंय त्यात समाधान माना. स्वत:मधील लवचिकता थोडी वाढवा. आपलाच हेका रेटण्याचा प्रयत्न करु नका.
सिंह : वास्तूतून लाभ
आज तुम्हाला वास्तूतून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. चडका फडकी कोणावरही शेरेबाजी करु नका. शब्दांवर नियंत्रण ठेवून आपल्या बोलण्याने कुणी दुखवाणार नाही याची काळजी घ्या. आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे. अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा.
कन्या : शत्रू वरचढ होतील
आज तुमचे शत्रू वरचढ होण्याची शक्यता आहे. दोघांचे भांडण तिस-याचा लाभ अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष विचलित होऊन आत्मविश्वासही कमी होईल. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करु नका. वास्तवात जगा. एखादे काम पूर्ण होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागू शकतो.
तूळ : शत्रूला नामोरहम कराल
आज तुम्ही तुमच्या शत्रूला नामोहरम करु शकाल. त्याचा मनस्वी आनंद प्राप्त होऊन आत्मविश्वासही वाढलेला असेल. लहान फायद्यासाठी मोठ नुकसान नको. म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे हे धोरण ठेवा. थोडा आळसही आज होऊन कामे टाळण्याकडे तुमचा कल राहिल. त्यात नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
वृश्चिक : आळस कराल
आजचा तुमचा दिवस आळसाने भरलेला असेल. त्यामुळे कामे टाळण्याचा प्रयत्न कराल. विशेषत: विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. आधी पोटोबा मग विठोबा अशी स्थिती राहिल. त्यामुळे आहाराविषयीचे पथ्य पाळण्याकडे लक्ष द्या. संकटातून बाहेर पडू शकाल. त्यामुळे ईश्वराची आपल्यावर कृपा असल्याची भावना मनात दाटून येईल.
धनु : भावंडांशी मतभेद
आज तुमचे भावंडांशी मदभेद होऊ शकतात. टाळी एका हाताने वाजत नाही हे लक्षात घेऊन सत्य काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. शांत राहून वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. आज संधी मिळत आहे, मनसोक्त जगण्याचा प्रयत्न करा. आधी केलेल्यरा मुर्खपणाची फळे वाट्याला येण्याची शक्यता आहे. आलीया भोगासी असावे सादर.
मकर : विरोध होईल
आज तुम्हाला अनोळखी लोकांकडून विरोध होऊ शकतो. म्हणून लक्ष विचलित होईल. योग्य दिशा सापडत नाही म्हणून हतबल होऊन बसण्यापेक्षा चालायला सुरुवात करा. भाग्यही तुमच्या मागे चालत येईल. प्रयत्नांनी परमेश्वाराचीही प्राप्त होत असते. म्हणून कितीही कामात अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नका.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र