मेष – मित्रांकडू धोका
आर्थिक व्यवहारांमध्ये मित्रांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करू नका. व्यवसायामध्ये चढ-उतार येण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांकडून सहकार्य मिळेल. राजकारणात रस वाढेल. धार्मिक कार्यात मन रमवाल. नातेसंबध सुधारतील.
कुंभ – आईच्या तब्येतीची काळजी घ्या
आज तुमच्या आईची तब्येत अचानक खराब होऊ शकते. दिवसभर तणावात राहाल. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. खर्च वाढल्याने बजेट बिघडेल. जोडीदाराची साथ मिळेल.
मीन- विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना योग्य यश मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात व्यस्त राहाल. व्यवसायातदेखील प्रगती होईल. अर्धवट राहीलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. सामाजिक मानसन्मान मिळेल.
वृषभ – जुने आजार सुधारतील
जुन्या आजारांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन बदलांचे संकेत मिळतील. नवीन ओळखींमुळे व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जोडीदारासोबत संबध चांगले होतील. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन – नातेसंबध बिघडतील
आजचा दिवस तुमच्यासाठी विनाकारण दगदग आणि ताणाचा असेल. नातेसंबध बिघडण्याची शक्यता आहे. समस्या प्रेम आणि शांतीने सोडविण्याचा प्रयत्न करा. आरोग्य बिघडू शकते. मित्रांकडून मदत मिळेल. व्यवसाय नफा आणि नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
कर्क – वडिलोपार्जित वारसाहक्क मिळेल
आजचा दिवस नियोजन करण्यात जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात खर्च करावा लागेल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल. वैवाहिक सुख मिळेल. वाहन खरेदीचा योग आहे.
सिंह – आरोग्याबाबत सावध
आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. धैर्य राखा. आहाराबाबत सावध रहा. उधारी परत मिळेल. व्यवसायात यश मिळेल. आवडीच्या कामात रस वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळेल. मित्रांची भेट होईल.
कन्या – प्रेमात यश मिळण्याची शक्यता
प्रेमसंबधांत यश मिळेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकतील. मनोबल वाढेल. व्यवसायात राजकीय सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वादविवाद टाळा. अडकलेली कामे पूर्ण होतील.
तूळ – विद्यार्थीअभ्यासात टाळाटाळ करतील
आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामात अडचणी येतील. रागवर नियंत्रण ठेवा. खास मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचे मन राखा.
वृश्चिक – धनलाभ होण्याची शक्यता
आज तुम्हाला पैशांबाबत आनंदवार्ता मिळेल. एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल. अडकलेली कामे पूर्ण करण्याचा विचार यशस्वी होईल. व्यवसायामध्ये नवीन योजना आखाल. कायद्याची संकटे दूर होतील.
धनु – मुलांबाबत चिंता वाढेल
मुलांच्या करिअरबाबत चिंता सतावेल. आधिकाऱ्यांकडून कामाबाबत आश्वासन मिळेल. व्यवहार रद्द होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होऊ शकते. कलात्मक कार्यात रस वाढेल. कायद्याचे संकट दूर होईल. धार्मिक कार्यात रस वाढवा.
मकर- नवीन प्रेमसंबध
नवीन प्रेमसंबध निर्माण होऊ शकतात. लग्नासाठी प्रयत्नशील युवांना जोडीदार मिळेल. मनातील भावना मोकळ्या करण्यात यश मिळण्याची शक्यता. नोकरीत यश मिळेल. नवीन नातेसंबधांचा फायदा होईल. आरोग्याकडे दूर्लक्ष करू नका.