मेष – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
भागिदारीच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लहान – मोठ्या समस्या येतील. खर्च वाढल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडेल. रचनात्मक कामात मन रमावाल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.
कुंभ – जुन्या नात्यातील जवळीक वाढण्याची शक्यता
जुने नातेसंबध पुन्हा दृढ होऊ शकतात. कौंटुबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यश मिळेल. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. व्यावसायिक प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला यात यश मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल.
मीन- ध्येय साध्य कराल
सेल्स आणि मार्केटिंगच्या लोकांना त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमचे कौतुक करतील. व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कार्यात वृद्धी होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबध चांगले होतील.
वृषभ – आरोग्यात सुधारणा होईल
आज तुमचा दिवस आनंदाचा असेल. बिघडलेली तब्येत सुधारण्याची शक्यता आहे. दिवसभर फ्रेश वाटेल. रचनात्मक कामात रस वाढवा. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत.
मिथुन – प्रेमयुगुलांच्या आयुष्यात ताण-तणाव जाणवेल
आज तुमच्या प्रेमाच्या नात्यात तणाव वाढेल. रागात घेतलेले निर्णयामुळे त्रास होईल. मित्राच्या रूपातील शत्रूपासून सावध रहा. इतरांची निंदा करू नका. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. अचानक धनलाभाचा योग आहे.
कर्क – घरातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडेल
कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. मन निराश होईल. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना आनंदवार्ता मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. व्यवसायात यश मिळेल. योजना सफळ होतील. धार्मिक कार्यांत रस घ्याल.
सिंह – आर्थिक लाभ होण्याची शक्यता
चांगल्या योजनांमुळे लाभ होऊ शकतो. आर्थिक लाभ होईल. नवीन व्यवसायाची योजना आखाल. रचनीत्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. परदेशी जाण्याचा योग आहे.
कन्या – कौंटुंबिक समस्या सुटतील
आज तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे कौंटुबिक समस्या सुटतील. घरातील वातावरण आनंदाचे राहील. अचानक एखादी आनंदाची बातमी ऐकल्यामुळे आनंद होईल. नवीन व्यावसायिक संबध मजबूत होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रभावशाली व्यक्तीशी भेट झाल्याने लाभ होईल.
तूळ – विद्यार्थ्यांसाठी करिअरबाबत समस्या निर्माण होतील
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना करिअरबाबत समस्या जाणवतील. आत्मविश्वास कमी होईल. नकारात्मक विचार त्यांचा प्रभाव दाखवतील. राजकारणी लोकांना भविष्याची चिंता सतावेल. देणी-घेणी सांभाळून करा.
वृश्चिक – मित्रांकडून भेटवस्तू मिळेल
मित्रांकडून महागड्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यांत रस घ्या. धार्मिक यात्रेला जाण्याची शक्यता आहे.कुटुंबातील सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
धनु – विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची गरज
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अधिक मेहनत करावी लागेल. आळस करू नका. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे. घरात उत्साहाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत संबंध मजबूत होतील. व्यवसायामध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
मकर – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रक्तदाबाच्या त्रासाने निराश व्हाल. दैनंदिन कामे करत रहा. देणी – घेणी करताना सावध रहा. अचानक धनलाभ होऊ शकतो. मित्रांची मदत मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल.
जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग