मेष : आरोग्य उत्तम
आज आपले आरोग्य उत्तम राहणार आहे. दिवस ताजेतणावे तुम्ही राहाल. कुठे थोडासा तणाव वाटला तर मनोरंजनासाठी आवर्जुन वेळ काढा. त्याने तणाव कमी होण्यास मदत होईल. चिंता ही चितेला जाळत असते. म्हणून कुठल्याच गोष्टीची चिंता करु नका. त्यापेक्षा चिंतन करण्यावर भर द्या. त्यातून नवीन मार्ग गवसतील.
कुंभ : परिश्रमानंतरच भाग्य
कधी कधी भाग्य आपली परिक्षा घेत असतं. म्हणून परिश्रम करीत राहायला पाहिजे. त्यानंतरच भाग्याची साथ लाभते. स्वत:वर विश्वास ठेवा. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकाच साधनावर अवलंबून राहू नका. पर्यायी साधने तयार करुन ठेवा. आज पूर्ण दिवस तुम्ही कार्यात व्यस्त राहू शकता. म्हणून अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या.
मीन : धैर्याने निर्णय घ्या
आज तुम्ही कुटुंबातील कोणत्याही महत्त्वपूर्ण समस्येवर निर्णय घेणार असाल तर तो धैर्याने व सर्वांना विश्वास घेऊन घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कुणाशीही बोलतांना मुद्देसुद बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असू करु नका. आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. योग्यता सुयोग्य उंची आज गाठू शकेल.
वृषभ : जंक फूड टाळा
जंक फूड हे आरोग्यासाठी अपायकारकच असतात. आज तर ते टाळाच. जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिकाही करण्याचा अधिकार नसतो. अशी तुमची अवस्था नसेल तर किमान आज कुणावर टिकाटिप्पणी नको. त्यातुन नुकसान होईल. कलाकारांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. त्यांना आज यश मिळून लौकिकात भर पडू शकतो.
मिथुन : सामंजस्य वाढेल
ओळखीच्या लोकांबरोबर आज सामंस्य वाढण्याचे योग आहे. म्हणून आज संधी आहे. संबंध सुधरवून घ्या. कुणाच्याही व्यंगावर हसू नका. मोठा फायदा होणार असेल लहान नुकसानीमध्ये अडकू नका. त्याला गुंतवणूक समजा. चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे असतात. त्यामुळे तुमचीही वेळ येणार आहे. तिची वाट बघा. उतावळेपणा नको.
कर्क : वादाची शक्यता
आज तुमचा सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी स्वत:ची अवस्था होणार नाही, याकडे लक्ष द्या. शांत राहून वाद वाढणार नाही याची काळजी घ्या. एखाद्याविषयी मनात वैरभावना असेल तर तिचा त्याग करा. जळात राहून माशाशी वैर करु नये. सत्याची कास धरुन आपला मार्ग चुकीचा तर नाही ना? याची खात्री करुन घ्या.
सिंह : संसारीक सुख
वैवाहिक आयुष्यातील विविध रंग आज तुम्हाला अनुभवायला मिळणार असून सांसारीक सुखावात वाढ होणार आहे. थोडं स्वार्थी होऊन स्वत:च्या भरभराटीवर लक्ष केंद्रित करा. मात्र हे करीत असतांना थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात घ्या. वरकरणी कठोर व आतून कनवाळू अशा स्वभावाचे तुम्ही असाल तर सावध राहा. लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
कन्या : आनंदी वातावरण
प्रेमविरांसाठी आज आनंदाचे वातावरण राहिल. कारण आज त्यांचा प्रेयसीशी संपर्क होऊ शकतो. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करायचा असतो, हे लक्षात असू द्या. गुतकाळात घडून गेलेल्या एखाद्या आनंददायी घटनेचा आज पुन्हा आनंद वाढू शकतो. हा आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज राहा.
तूळ : गैरसमज होईल
आज एखाद्याबद्दल गैरसमज होऊन संबंध दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकहून कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. अतिविचार घातक असतात. त्यामुळे भिती निर्माण होते व भित्यापोटी राक्षस असं म्हटलं जातं. म्हणून चिंतन करण्यावर भर द्या. सायंकाळपर्यंत एखादा अविस्मरणीय आनंदाचा क्षण प्राप्त होऊ शकतो.
वृश्चिक : शत्रू पराभुत होतील
आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. कारण आज तुम्ही शत्रूंना पराभुत करु शकणार आहात. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल. फुकटच्या गप्पा टप्पा नकोत. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी आपली अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी आज तुम्हाला एकातांची आवश्यकता भासेल.
धनु : शांती लाभेल
आज तुम्हाला मानसिक सुखशांती लाभणार आहे. तुमच्या आजुबाजुला त्यासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोणतीही कृती करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. तडका फडकी निर्णय घेऊ नका किंवा कोणाविषयी बोलू नका. आपल्या वागण्याने कुणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. मानसिक सुखांशाती लाभणार असली तरी मनस्वास्थ बिघडवणा-या घटनाही घडू शकतात.
मकर : वास्तूवर खर्च
आज तुम्ही वास्तूवर आनंदाने खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. जीवानात कुठलाच धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. म्हणून हिम्मत करुन कृती करण्यावर भर द्या. यश मिळावायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस असेल.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र