मेष – आईच्या दुखण्यामुळे निराश व्हाल
आज तुमच्या आईला गुडघे अथवा पायदुखी जाणवणार आहे. राजकारणातील प्रतिष्ठा वाढेल. व्यवहार सुधारणार आहेत. उत्पन्नाचे साधन मिळेल. विरोधक नमणार आहेत. वाहन चालवताना सावध राहा.
कुंभ – घरात भावनिक वाद होण्याची शक्यता
आज तुमच्या घरात भावनिक वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. भागिदारीच्या कामांपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात मित्रांची मदत मिळेल.
मीन- धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळेल
आज धनसंपत्तीत एखादी खुशखबरी मिळेल. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. धुर्त लोकांपासून सावध राहा. जोडीदारासोबत परदेशी जाण्याची शक्यता आहे.
वृषभ – जोडीदाराशी नाते मजबूत होईल
आज तुम्ही तुमच्या मनातील भावना जोडीदाराजवळ व्यक्त कराल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. विनाकारण खर्च करणे टाळा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल.
मिथुन – व्यवसायातील कामे रद्द होतील
आज तुम्ही तुमच्या जिद्दी स्वभावामुळे स्वतःचे नुकसान करणार आहात. व्यावसायित कामे रद्द होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी वाढवताना सावध राहा. नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
कर्क – व्यवसायात फायदा होईल
आज तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. मानसिक शांतता मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीने प्रवासाचा बेत आखाल.
सिंह – घाईघाईत निर्णय घेऊ नका
आज घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. मन अशांत राहील. नोकरीत ऑफिस बदलण्याची शक्यता आहे. विरोधक उघडपणे आव्हान देऊ शकतात. जुन्या समस्यांचे निराकरण होईल. धार्मिक यात्रेला जाण्याची शक्यता आहे.
कन्या – सर्दी खोकल्याचा त्रास जाणवेल
आज तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदी करणे कठीण जाईल. खर्च काटकसर करून करावा लागेल. त्वरीत लाभ मिळण्यासाठी तडजोड करावी लागेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे.
तूळ – नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील
आज तुमचे नवे प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळणार आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मित्रांच्या मदतीने कामे बिघडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी अनुकूल काळ असेल
आज तुमच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल काळ असेल. व्यवसायासाठी केलेले प्रयत्न फायद्याचे ठरतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधी समस्या दूर होतील. मित्रांची भेट होईल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
धनु – अचानक खर्च वाढणार आहे
आज तुमच्यासाठी दिवस सावधान राहण्याचा आहे. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. पैशांबाबत समस्या येण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. जोडीदारासोबत मंगल कार्यात सहभागी व्हाल.
मकर – जुन्या आजारपणातून सुटका मिळेल
आज तुम्हाला जुन्या आजारपणातून सुटका मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. बाहेर पडल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे.