मेष – रखडलेली कामे पूर्ण होतील
आज कला अथवा क्रीडा क्षेत्रातील लोकांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना लक्ष्यप्राप्तीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे म्हणणे ऐकले जाईल. उत्साही वाटेल.
कुंभ – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज आहारामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. रचनात्मक कार्यात मानसन्मान आणि धनसंपत्ती मिळेल.
मीन – कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य मिळेल
आज एखाद्या अडचणीच्यावेळी तुम्हाला घरच्यांचे सहकार्य मिळणार आहे. जुन्या लोकांशी भेट होईल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. सामाजिक सन्मानात वाढ होईल. विद्यार्थ्यांचा उद्देश साध्य करण्यात यश मिळेल.
वृषभ – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
विनाकारण खर्च आणि दुर्लक्षपणा यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. व्यवसायात आर्थिक नुकसान येण्याची शक्यता आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. मित्रांची मदत मिळेल.
मिथुन – नवीन काहीतरी करावेसे वाटेल
आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याचा उत्साह वाटेल. ठरवलेल्या बजेटमध्ये घर मिळणं मुश्किल आहे. मुलांकडून एखादी आनंदवार्ता कानी पडेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
कर्क – गरज पडल्यावर जवळचे मागे फिरतील
आज तुम्हाला गरज असताना तुमची माणसं तुमची मदत करणार नाही. प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत झालेली बाचाबाची नुकसानकारक ठरेल. वादविवादांपासून दूर राहा. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
सिंह – मन शांत राहील
आज तुमचे मन शांत राहणार आहे. अज्ञात भिती वाटण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखा. देणी-घेणी सांभाळून करा. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
कन्या – नवीन कामे लाभदायक ठरतील
नवीन कामे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. जोडीदाराशी मजबूत नाते निर्माण होईल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
तूळ – शुभ समाचार मिळतील
आज तुम्हाला सुखद समाचार मिळणार आहेत. सामाजिक लोकप्रियतेत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना विकासाची नवी संधी मिळेल. इतरांचे सहकार्य मिळण्यात यश येईल. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक – शैक्षणिक अडचणी येण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला शैक्षणिक अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक आणि कौटुंबिक समस्या येण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. सुखद समाचार कानी पडतील. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल.
धनु – आर्थिक पक्ष मजबूत होईल
आज तुम्हाला जोडीदाराकडून धनसंपत्ती अथवा भेटवस्तू मिळतील. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. विरोधक नमणार आहेत. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. प्रियकराशी भेट होईल.
मकर – मार्केटिंग क्षेत्रात समस्या येतील
आज मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना समस्या येण्याची शक्यता आहे. जोखिमेची कामे करू नका. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात रस वाढवा. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या