मेष : निद्रानाश किंवा मानसिक थकवा
निद्रानाश किंवा मानसिक थकवा येईल. खातापिताना निष्काळजीपणाने वागू नका. व्यवसायाच्या बाबतीत दिवस आनंददायी असेल. सामाजिक संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल.
कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती भक्कम असेल. प्रतिस्पर्धी हार मानतील. रचनात्मक कामांमध्ये यश मिळेल. अपत्याच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.
मीन : विद्यार्थ्यांचं मन भरकटेल
विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटण्याची शक्यता आहे. पदोन्नती देखील थांबण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. विचारविनिमय पूर्वक व्यवसायात नवीन संबंध स्थापित करा. रचनात्मक कामांमध्ये आवड अधिक वाढू शकते.
वृषभ : एखादी व्यक्ती खास होईल
एखादी व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होईल. तुमच्या गोड वागण्याने तुमचा सामाजिक आदर वाढेल. नवीन वाहन खरेदी करू शकता. राजकारणात सक्रियता वाढेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
मिथुन : रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल
राजकीय पक्षासोबत असलेल्या जवळीकतेमुळे व्यवसायात नफा होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. एखादे कार्य पूर्ण झाल्याने तुमची प्रतिष्ठा आणि संपत्ती वाढ होईल. वादापासून दूर रहा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : पैशांचा व्यवहार करू नका
आज व्यावसायिक प्रकरणात कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कोणतीही मोठी देवाणघेवाण करू नका. कौटुंबिक तणाव वाढू शकतो. निरर्थक विवादांपासून स्वतःचा बचाव करा. वाहन संबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : रक्तदाबासारखे आजार सुधारतील
रक्तदाबासारख्या आजारांमध्ये सुधारणा होईल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक प्रकरणात प्रगती होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहील.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
कन्या : मित्रांसोबत वाद घालू नका
मित्रांशी वाद घालू नका. आपल्या संभाषणामुळे कुटुंबात गैरसमज होऊ शकतात. काळजी घ्या. व्यवहारामध्ये फसवणूक होऊ शकते. सामाजिक कार्यात सामील होण्याची संधी असेल.
तूळ : मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल
मुलांच्या आरोग्याबद्दल चिंता राहील. मोठ्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क वाढेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. प्रेमात निराशा मिळेल. देखाव्यापासून स्वतःचा बचाव करा. विद्यार्थ्यांना परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. .
वृश्चिक : वेतन वाढीची शक्यता
मेहनत आणि व्यावसायिक कौशल्यामुळे वेतनात वाढ होण्याची शक्यत आहे. नवीन करारामुळे फायदा होईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. अपत्याच्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक जीवनात तुमची भागीदारी वाढेल.
धनु : नव्या प्रेमाची होईल सुरुवात
तुमच्या नवीन प्रेमसंबंधाची आज सुरुवात होण्याची शक्यता आहे. भाऊ आणि शेजाऱ्यांचं सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणसंबंधी अडचणी दूर होतील.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
मकर : व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता
लक्ष्य प्राप्तीसाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्यानं नात्यात गोडवा कायम राहील. निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा.