मेष : योग्यतेची उंची वाढेल
आज तुमच्या योग्यतेची उंची वाढण्याची संधी प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे मानसन्मानातही वाढ होऊ शकते. संधीचा लाभ घ्या. काही प्रमाणात आरोग्याची काळजीही घ्यावी लागू शकते. पथ्य पाळण्यावर भर द्या. परिवारात संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करा.
कुंभ : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. म्हणून आज प्रयत्न वाढवायला हवे. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यांच्या संगतीत तुम्ही मन रमविण्याचा प्रयत्न कराल. लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असू शकते.
मीन : अचूक संवाद साधा
उचलली जीभ लावळी टाळ्याला असं आज करु नका. कुणाशीही बोलतांना अचुक संवाद साधा. कुटुंबात एखादा निर्णय जर आज तुम्ही घेणार असाल तर तो धैर्याने घ्या. त्याचं स्वागतही होऊ शकतं. घरात आज तुम्ही मानसिक सुख शांतीचे वातावरणाचा अनुभव कराल.
वृषभ : जबाबदा-या टाळाल
आज तुम्ही जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न करणार आहात. कारण आज निराशा तुमच्या मनाला घेरु शकते. अगोदर श्रम नंतरच भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे श्रम करण्यात कमी पडू नका. स्वत:वर व आपल्या प्रयत्नांवर वि·ाास ठेवा. तुमचे आरोग्य आज चांगले राहिल.
मिथुन : व्यायाम करा
सुदृढ जीवन रोज वेळोवेळी व्यायाम करावाच लागतो हे शिकविणारा आजचा दिवस आहे. सांधेदुखीचा त्रास असणा-यांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. कारण त्रास वाढू शकतो. अब पछताये क्या होत जब चिडिया चुग गई खेत. म्हणून पश्चाताप करण्यापेक्षा कृती करण्यावर भर द्या.
कर्क : संधीवात वाढेल
संधीवाताचा त्रास असल्यांनी आज आपल्या आरोग्याचीप्रती सजग राहणे गरजेचे आहे. कारण त्रास वाढू शकतो. प्रयत्न करुनही जर यश मिळत नसेल तर कर्मात बदल करा. मात्र विचारपूर्वकच निर्णय घ्या. योग्य निर्णयाने भाग्यही बदलू शकते. जंक फूड टाळावे.
सिंह : अपचनाचा त्रास
आज तुम्हाला अपचनाचा त्रास संभवू शकतो. म्हणून आहारावर योग्य नियंत्रण ठेवा. पथ्य पाळून आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. म्हणून निराश होऊ नका. प्रयत्न करीत राहा. कितीही घाई असली तरी वाहन सावकाशच चालवायला हवे. आज हा नियम तंतोतंत पाळा.
कन्या : प्रवासात नुकसान
आज तुमचे प्रवास करण्याचे योग आहे. त्यात नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रवास टाळा किंवा काळजी घ्या. आज तुम्हाला अन्नबाधेचाही त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आराहारावर नियंत्रण ठेऊन आरोग्याची काळजी घ्या. मनोरंजनासाठी थोडा वेळ काढा.
तूळ : विसंबून राहू नका
आज कुणावरही विसंबून राहू नका. त्यात तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही प्रवासही करणार आहात. त्यातुन संधी लाभल्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित होईल. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. आपले मनस्वाथ्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : आर्थिक लाभ
तुम्ही जर कुटुंबवत्सल असाल, कुटुंबाची काळजी घेणारे असाल तर आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. म्हणून आज त्यांच्याकडून अपेक्षा नकोत. त्याचा त्रास तुम्हालाच होईल. सरकारी कर्मचा-यांसाठी आज गोंधळाचा दिवस असेल. म्हणून विचारपूर्वकच निर्णय घ्या.
धनु : संततीला यश
आज तुमच्या संतती यश प्राप्त होऊ शकतं. त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडू शकतात. म्हणून त्यांनी आज विशेष काळजी घ्यायला हवी. आहार विहारादी पथ्य पाळा, नाही तर अपचनाचा त्रास होऊ शकतो.
मकर : लेखकांना यश
जे न देखे रवि ते देखे कवी, लेखक व कवी मंडळींसाठी आजचा दिवस यशदायक असून लेखन कार्यात यश मिळू शकतं. संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांना प्रोत्साहन द्या. तणाव घालवण्यासाठी संगीत ऐका.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र