मेष – आज विनाकारण संताप येईल
संताप ही गोष्ट आयुष्यात फार घातक आहे. काही व्यक्तींचा तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरुन पारा चढत असतो किंवा कोणी वाईट वागल्याचा, बोलल्याचा चटकन राग येत असतो. आपल्यासोबत आज असेच काहीतरी घडू शकते. कारण आज आपल्याला कोणतेही कारण नसताना आज संताप येणार आहे. मनस्वास्थ्य बिघडू शकते. संतापाला आवर घाला. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वडीलांकडून अनमोल असे मार्गदर्शन मिळू शकते. त्याचा आपल्या कामामध्ये उपयोग करुन घ्या. तसेच उत्पन्न व खर्च यांचा योग्य ताळमेळ बसवा. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायला नको.
कुंभ- आज गैरसमज करुन घेऊ नका
कधी कधी आपलं स्वत:वर नियंत्रण नसतं. आपण भावनेमध्ये वाहत जातो किंवा एखाद्या गोष्टींने प्रचंड दु:खी होऊन गैरसमज करुन बसतो. आपल्यासोत आज असेच घडू शकते. आज तुम्ही एखाद्याविषयी गैरसमज करु घ्याल. त्यामुळे कुणावर रागवताना किंवा त्याच्याविषयी मत बनविताना आज थोडा विचार करा किंवा मतच बनवू नका. म्हणजे गैरसमज होणार नाही. आज नोकरी व व्यवसायामध्ये संधी प्राप्त होऊ शकते. तिचा उपयोग करुन घ्या. चिकाटीने प्रयत्न करीत राहा. त्यामुळे आपले एखादे काम अपूर्ण राहिलेले असेल तर ते पूर्ण होण्यास मदत मिळू शकते.
मीन – सहनशीलता व उत्साह राहिल
सहनशीलता व उत्साह या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन गोष्टी जर एकाच वेळी मिळाल्या तर त्यासारखा आनंद दुसरा नाही. या आनंदाचा अनुभव आज तुम्ही घेणार आहात. आज तुम्ही अमर्याद सहनशीलतेसोबत उत्साहानेही भरलेले असाल. भुतकाळात घडून गेलेली एखादी आनंददायी घटना आज पुन्हा आनंद प्राप्त करुन देऊ शकते. व्यापार व व्यवसायही आज सुखद राहिल. आज जोड व्यवसायाचाही तुम्ही विचार करणार आहात.
वृषभ – भुतकाळातील आनंद पुन्हा वाढेल
भुतकाळामध्ये अनेक बऱ्या वाईट घटना आपल्या सोबत घडून गेलेल्या असतात. ज्या आपल्यासोबत कधी कधी पुन्हाही घडत असतात. अशा वेळी मग मागचा अनुभव कामात येतो. वाईट घटनेची चाहूल असेल तर व्यक्ती वेळीच सावध होतो व चांगली घटना असेल तर त्याचा आनंद गगनात मावत नाही. कारण ती गोष्ट आपल्याला पुन्हा आनंद देत असते. आपल्यासोबत आज असेच घडणार आहे. भुतकाळातील आनंद पुन्हा वाढणार आहे. क़लाकारांसाठीही आज यश देणारा दिवस आहे. आज तुम्ही आपल्या कामामध्ये व्यस्तही राहू शकता. त्यामुळे इतर गोष्टींकडे तुमचे लक्ष जाणार नाही. एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण राहिलेले असेल तर त्यासाठी आज प्रयत्न वाढवायला हवेत. आज यश मिळू शकतं.
मिथुन – नफा-नुकसान याचा विचार करा
व्यवहार हे सांगतो की नेहमी नफ्याचाच विचार करायला हवा. मात्र कधी कधी भविष्यात मोठा फायदा होणार असेल तर छोटे नुकसान सहन करायला हरकत नसते. कारण ते नुकसान नसून भविष्यातील नफ्यासाठी केलेली गुंतवणूक ठरते. मात्र याचा निर्णय व्यवस्थित विचारपूर्वक व्हायला हवा. आज मोठ्या फायद्यासाठी लहान नुकसान झाले तरी चालेल. मात्र लहान फायद्यासाठी मोठं नुकसान करू नका. आज जोडीदाराचेही सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. जोडीदाराच्या इच्छेनूसार आज तुम्ही वागणार आहात. त्यामुळे आज खर्चही होऊ शकतो. जो तुम्ही आज आनंदाने करणार आहात. परिणामी आज घरामध्ये मानसिक सुखशांतीचे वातावरण राहिल.
कर्क – मित्र आनंद देतील
आज तुम्हाला मित्रांकडून एखादी आनंदवार्ता समजू शकते. आज तुम्ही मित्रांसाठी वेळ काढणार आहात. त्यामुळे मनाला प्रसन्नता वाटेल. मात्र आज आपल्या खर्चाकडे लक्ष द्या. अवास्तव खर्च होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. विद्यार्थी अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. इतर गोष्टी करण्यावर त्यांचा भर राहिल. ओळखीच्या व्यक्तींवबरोबर आज सामंजस्य वाढेल. त्यामुळे आनंदी आनंद असेल.
सिंह – अपचनाचा त्रास होईल
कोणत्याही गोष्टीचे ताळतंत्र बिघडले की आपल्याला त्रास हा होतोच.आपले आरोग्य याचे उत्तम उदाहरण आहे. विशेषत: खाण्यापिण्याचे ताळतंत्र बिघडले, की त्याचा तत्काळ परिणाम आपल्याला जाणवतो. परिणाम अपचनाच्या समस्येला आपण सामोरे जात असतो. जीवनातील प्रत्येक गोष्टींच्या बाबतीतही असेच घडत असते. आज तुम्हाला अपचनाचा त्रास होणार आहे. त्यामुळे खाण्यापिण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवायला हवे. सोबतच आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आज बेशिस्तपणा करु नका. छोटीशीही चुक तुमचं नुकसान करु शकते. कोणतीही गोष्ट प्राप्त करुन घ्यायची असेल तर त्यासाठी आज तुम्हाला परिश्रम करावेच लागणार आहेत.
कन्या – शत्रू पराभुत होतील
जीवनात आपले शत्रू पराभुत होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र त्यांना किती महत्त्व द्यायचे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. हेच शत्रू जेव्हा कुरघोडी करण्यामध्ये यशस्वी होत असतात, तेव्हा दु:खही होत असते. आज मात्र आज तुम्ही आनंदात असाल. कारण आज तुमचे शत्रू पराभुत होणार आहेत. ते आपल्या कुरघोड्यांमध्ये यशस्वी होणार नाहीत. आज दिवसभर आनंदी आनंद असेल. स्त्रियांसाठी मात्र आजचा दिवस चिंताजनक आहे. कारण आज मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणून जी गोष्ट आवडते ती करण्यामध्ये आज मनाला रमविण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला अपचानाचा त्रासही होऊ शकतो. म्हणून खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या.
तूळ – मनस्वास्थ्य बिघडेल
प्रत्येकजण थोड्या फार प्रमाणात संवेदनशील व हळव्या मनाचा असतो. काही व्यक्ती तर इतके हळवे असतात, की छोट्यातल्या छोट्या गोष्टीनेही त्यांचे मनस्वास्थ्य बिघडते. शरीरासह मनही सुदृढ राहायला हवे. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. कारण आज तुमचे मनस्वास्थ्य बिघडणार आहे. त्यामुळे आज शक्य तितके मनाने खंबीर राहण्याचा प्रयत्न करा. नाही तर आज विनाकारण संतापही येऊ शकतो. एखादी गोष्ट मनाला फार लागू शकते. त्यामुळे आज तुमच्यात आत्मविश्वासाचीही कमी राहणार आहे. त्यामुळे मनाशी निश्चय करुन घ्या की आज तुम्ही कोणत्याच गोष्टीने विचलित होणार नाही आहात.
वृश्चिक – कार्यात व्यस्त राहाल
कारण आज तुम्ही आपल्या कार्यामध्ये व्यस्त राहणार आहात. एखादे महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण राहिलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवायला हवेत. आज तुमचे प्रवासाचेही योग आहेत. त्यातूनही तुम्हाला संधी मिळणार आहे. तिचा योग्य उपयोग करुन घ्या. भुतकाळामध्ये घडून गेलेली एखाद्या आनंददायी घटनेचा आज तुम्हाला पुन्हा आनंद मिळू शकतो.
धनु -चिकाटी कायम ठेवा
परिश्रमांना चिकाटीपूर्ण सातत्याची जोड आवश्यक असते. ते असल्यास यशाची हमी आपण स्वत: घेऊ शकतो. कारण स्वत:ला आपण करीत असलेल्या प्रमाणिक प्रयत्नांवर विश्वास असतो. हे शिकविणारा आजचा दिवस राहिल. आज चिकाटी कायम ठेवा. एखादे काम अपूर्ण राहिलेले असेल तर ते प्रयत्नपूर्वक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. यश मिळविण्यासाठी आज तुम्हाला परिश्रम करावेच लागतील. केलेले सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यश मिळाल्याचा आनंदही काही वेगळाच असेल. म्हणून प्रयत्न सोडू नका. स्त्री पक्षाकडून आज तुम्हाला सहयोग प्राप्त होऊ शकतो. म्हणून घरात आज आनंदी आनंद असेल.
मकर – आज प्रवास करू नका
साधारणत: प्रवास हा आनंददायी असतो. शक्यतोवर प्रवास हा कुठल्यातरी कारणासाठी केला जातो. मात्र त्यामुळे आपल्याला रोजच्या दिनचर्येतून बाहेर निघण्यास मदत मिळत असते. मात्र प्रवासातून नुकसान होणार असेल तर तो न केलेलाच बरा. आज तुमच्या सोबत असेच घडू शकते. त्यामुळे आज प्रवासाला टाळण्याचा प्रयत्न करा. काही अत्यावश्यक कारणांनी करावाच लागला तर आपल्याला आज फार सतर्क राहावे लागणार आहे. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. काही प्रंसगांमुळे आज तुम्हाला आयुष्याबद्दल विचार करावासा वाटेल. जो करण्यासाठी तुम्ही एकांत शोधाल. प्रॉपर्टीमधून आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं.
लेखिकेला संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद