मेष – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज बाहेरचे पदार्थ खाऊ नका. कारण त्यामुळे तुमची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामे रखडण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी आनंदवार्ता मिळेल.
कुंभ – आरोग्याची उत्तम असेल
आज मधुमेह आणि इतर आरोग्य समस्या येण्याची शक्यता आहे. जीवनशैली आणि आहाराबाबत सावध राहा. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात गोडपणा येण्याची शक्यता आहे.
मीन – प्रेमसंबंधात कलह होण्याची शक्यता
आज तुमच्या प्रेमसंबंधात कलह होण्याची शक्यता आहे. दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी आश्वासन पूर्ण करणे कठीण जाईल. व्यवसायात नवीन ओळखींपासून सावध करा. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
वृषभ – पैशांबाबत आनंद वार्ता मिळेल
आज तुमचे नशिब चमकणार आहे. पैशांबाबत आनंदाची बातमी मिळेल. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन – प्रिय व्यक्तीची भेट होईल
आज तुमची तुमच्या प्रिय व्यक्तीशी भेट होईल. दिवसभरात उत्साह वाढण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्या व्यक्तींच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटणार आहेत. प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट लाभदायक असेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
कर्क – एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता
दुर्लक्षपणा केल्यामुळे एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव वाढणार आहे. जोडीदारासोबत मंगलकार्यात जाण्याचा बेत आखाल. इतरांच्या मदतीने मनाला शांतता मिळेल.
सिंह – धनलाभाची चांगली संधी मिळेल
आज धनलाभाची संधी तुम्हाला मिळणार आहे. नवीन व्यवसायिक योजना आखाल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. पैशामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. मित्रांची भेट होईल. परदेशी जाण्याचा योग आहे.
कन्या – कामात दुर्लक्षपणा करू नका
आज व्यावसायिक कामे करण्यात दुर्लक्षपणा करू नका. बिघडलेली कामे पुन्हा होऊ शकतात. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतो. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना सावध राहा.
तूळ – पोटाच्या समस्या जाणवणार आहेत
आज सर्दी खोकल्यामुळे निराश व्हाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
वृश्चिक – सुख समाचार मिळेल
आज तुम्हाला मित्र आणि कौटुंबिक सहवास मिळणार आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. राजकारणाची साथ मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
धनु – विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाढेल
आज विद्यार्थ्यांचाअभ्यासातील रस वाढणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात राजकारणाची साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. पदोन्नतीत अडचण येण्याची आहे. कोर्ट कचेरीत समस्या येतील. मित्रांच्या मदतीने कामे होतील.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी