ADVERTISEMENT
home / भविष्य
13 जानेवारी  2019 चं राशीफळ

13 जानेवारी  2019 चं राशीफळ

मेष- वडीलांशी संघर्ष होण्याची शक्यता

जे कुणाच्याही आयुष्यामध्ये कधीही व्हायला नको, ते आज तुमच्या आयुष्यात होऊ शकतं. आज तुमचा तुमच्या वडीलांशी संघर्ष होऊ शकतो. आज जेवढं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा. संघर्ष कसा टाळता हे बघा. आज तुम्हाला प्रॉपर्टीमधून लाभ संभवू शकतो. मात्र शत्रू वरचढ ठरु शकतात. आज तुमचे मनस्वास्थ्यही बिघडणार आहे. त्यामुळे शांत राहून स्वत:ची काळजी घ्या.

कुंभ – मनस्वाथ्य बिघडेल

यशस्वी जीवन जगण्यासाठी किंवा जीवनातील चढ उतारांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी शरीरासह मनही सुदृढ असणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, की बहुतेक आजार हे आधी मनाला होतात मग शरीराला होतात. त्यामुळे मनाच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज तुमचे मनस्वास्थ्य बिघडणार आहे. त्यामुळे आज अशी कुठलीही गोष्ट करुन नका किंवा अशी कोणतीही गोष्ट मनावर घेऊन नका ज्याचा तुम्हाला त्रास होईल. तुम्ही वेळोवेळी व्यायामही करीत राहणं आवश्यक आहे. आज एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. तसेच आज नवीन ओळखीही होऊ शकतात.  

ADVERTISEMENT

मीन – प्रॉपर्टीतून लाभ होतील

आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळू शकतो. एखादा अडकून पडलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. त्यामळे घरात आनंदी आनंद असेल. आज तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत. तुम्हाला चांगल्याय संधी मिळू शकतात. सजग राहायला हवे. एखाद्या कामामध्ये अडचणींचा सामनाही तुम्हाला आज करावा लागू शकतो. कुठलंच यश सहज मिळत नाही. प्रयत्नांनी मिळविलेले यश हे अधिक आनंद देत असतं. विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. आज त्यांचे अभ्यासात मन रमणार नाही.

वृषभ – जोड व्यवसायाचा विचार कराल

उत्पन्न वाढविण्यासाठी आपण जोड व्यवसायाचा विचार करीत असतो. आज तुम्ही तो करणार आहात. हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र या विचाराला आकार देण्याचा प्रयत्न करा. योग्य नियोजन करुन तो विचार कृतीतही आणा. सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण असाल. त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. मुलं मात्र आज तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाहीत. त्यामुळे आज त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावयाची आहे. वयोमानानूसार त्यांना किरकोळ आज होऊ शकतात.

ADVERTISEMENT

मिथुन – आज कलाकारांना यश मिळेल

कलाकार हे धाडसी, आशावादी व प्रयत्नवादी असतात. त्यांना यश मिळेपर्यंत ते प्रयत्न कधीच सोडत नाहीत. कारण त्यांचे आपल्या कलेवर प्रेम असते आणि विश्वास असतो. आज हा विश्वास वाढणार आहे. आज कलाराकारांना यश मिळणार आहे. त्यांच्या कलेला वाव मिळून आज त्यांच्या मानसन्मानात वाढ होऊ शकते. इतरांसाठी आजचा दिवस सर्वसाधारण असाच आहे. आज शक्यतोवर कमी बोला व जमलेच तर मुद्देसुद बोला. त्यातच तुमचे हित आहे. कुटुंबात आज धैर्याने निर्णय घ्याल. यश मिळायला उशीर होत असल्याने आज प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटू शकते. मात्र असे करताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.

कर्क – ईश्वराची कृपादृष्टी राहिल

काही लोक आशावादी, प्रयत्नवादी असतात. तर काही लोक दैववादी असतात. आपण जर दैववादी असाल तर आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज दैव तुमच्या सोबतीला असल्याचे जाणवेल. ईश्वराची आपल्यावर कृपादृष्टी असल्याची भावना मनात दाटून येईल. त्यामुळे दैवावरील विश्वास अधिकच घट्ट होईल. आज तुम्ही आत्मविश्वासानेही परिपूर्ण राहाल. अधिकारी वर्गाच्या हातात एखादे काम अडकलेले असेल तर आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. कारण आज ते पूर्ण होऊ शकतं. एकूण आज तुम्ही आपल्या कार्यामध्ये वस्त राहणार आहात.  

ADVERTISEMENT

सिंह – घराकडे लक्ष द्या

कधी कधी आपण आपल्या कामामध्ये इतका गुंतून जातो, की आपल्याला घरात लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे घरात काय सुरु आहे, ते आपल्याला माहितच नसतं. घरात सर्व आलबेल आहे, या भ्रमात आपण राहत असतो आणि घरात कुठल्यातरी कारणावरुन शितयुद्ध सुरु असतं. याचा अनुभव आज आपल्याला मिळू शकतो. आपल्या घरात थोडं लक्ष घाला आणि घरात जर शितयुद्ध सुरु असेल तर ते वेळीच मिटवा. आज तुमचा आत्मविश्वासही कमी राहिल. काहीही कारण नसताना संतापही येऊ शकतो. ज्याचा नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. व्यवसायातही आज गोंधळाची स्थिती राहिल.

कन्या – कामाला वेळ लागेल

कोणतंही काम नेहमी आपल्या मनाप्रमाणे व वेळेच्या आतच झालं पाहिजे ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण ते शक्य होत नाही. मात्र त्यामुळे विचलित होता कामा नये. चिकाटीने प्रयत्न करीत राहायला पाहिजे. आपल्याला हे शिकविणारा आजचा दिवस आहे. आज तुमचं काम सहजासहजी होणारचं नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांचा रतीब घालावाच लागेल. तसं केलं तरच यश मिळेल. आज जोडीदाराशी मनमुटाव होईल. सासरकडच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात चिंतेचं वातावरण असेल. मात्र कुठली गोष्ट वाढवायची आणि कुठली जागेवरच सोडून द्यायची हे तुम्हाला कळलं तर तुम्ही त्यातून मार्ग काढू शकता. आज तुमचा आत्मविश्वासही कमी राहिल.  

ADVERTISEMENT

तूळ – कामात व्यस्त राहाल

जीवनात कामाच्या व्यतिरीक्त इतरही गोष्टी करणे अत्यावश्यक असले तरी काही वेळेस मात्र फक्त कामातच व्यस्त राहणे खूप गरजेचे व लाभदायक असते. कारण जीवनात असे बरेचसे प्रसंग येतात ज्यामध्ये आपण काहीच न करणे अथवा शांत बसणेच आपल्या हिताचे असते. त्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडू नये म्हणून कामात व्यस्त राहिले पाहिजे. आज तुम्ही कामात व्यस्त राहणार आहात. त्यामुळे इतर सर्व गोष्टींपासून तुम्ही दूर राहणार आहेत. व्यावसायिकांसाठी आज गोंधळाचा दिवस आहे. कारण व्यवसायात गोंधळ उडू शकतो. संधीवात ज्यांना असेल त्यांनी आज आपल्या आजाराकडे लक्ष द्यावे. तुमच्यावर आज जोडीदाराचा प्रभाव राहिल. जोडीदाराच्या इच्छेप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात.

वृश्चिक – आत्मविश्वास वाढेल

पाण्यामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला जसा काठीचाही असतो, अगदी तसंच अगदी छोटी गोष्टही आपला आत्मविश्वास वाढवू शकते. मात्र त्यासाठी आपला दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. म्हणजे मग आत्मविश्वास मिळवून देणा-या गोष्टी आपल्याला आपोआप मिळू शकतात. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. कर्तृत्वामुळे आज तुमच्या मानसन्मानात वाढ होणार आहे. मात्र यश आज तुम्हाला सहजच मिळणार नाही. त्यासाठी परिश्रम हे करावेच लागतील. परिश्रमानंतर मिळणारे यश हे आनंद द्विगुणीत करणार आहे. कारण आज तुमचे शत्रूही पराभूत होऊ शकतात.

ADVERTISEMENT

धनु – महत्त्वाचे निर्णय आज नको

प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे कुठलेही महत्त्वपूर्ण कार्य किंवा निर्णय हे दिवस बघून घेतले जातात. आज तुम्ही कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असाल तर सावध रहा. आज कोणतेच महत्त्वाचे निर्णय नको. लेखक मंडळीसाठी आज यशदायी दिवस आहे. त्यांच्या लेखन कार्याला आज यश मिळू शकतं. चिकाटी ठेवून प्रयत्न करीत राहिल्यास यश नक्कीच मिळत असतं. त्यामुळे आज चिकाटी सोडू नका. हातात घेतलेले काम अपूर्ण असेल तर ते पूण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. आज तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

मकर – नवीन ओळखी होतील

मनुष्य हा समाजशील आहे. बोलणे, नवीन ओळखी वाढविणे, एकमेकांशी ऋणानुबंध जोपासणे आदी गोष्टी प्रत्येकालाच आवडत असतात. आज तुमच्या नवीन ओळखी होणार आहेत. सकारात्मक आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जा. भविष्यात त्याचा फायदाच होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे आज अभ्यासात मन रमणार नाही. व्यावसायिकांनी आज आपल्या नफ्याकडे लक्ष दिले पाहिजे. आज तुम्हाला अपचनाचाही त्रास संभवू शकतो. त्यामुळे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून आज आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.

ADVERTISEMENT

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद

10 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT