ADVERTISEMENT
home / भविष्य
13 जुलै 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात यश

13 जुलै 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात यश

मेष – जोडीदाराकडून सरप्राईझ गिफ्ट मिळेल

आज तुमचा कौटुंबिक कलह कमी होण्याची लक्षणे आहेत. जोडीदाराकडून अचानक एखादी महागडी भेट मिळेल. वाहन चालवताना सावध रहा. आर्थिक जोखिम घेऊ नका. सामाजिक आणि धार्मिक कार्यात मन रमवा. कोर्टकचेरीतून सुटका होईल.

कुंभ – शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल

थकवा आणि आळस करू नका. एखादी योजना पूर्ण न झाल्यामुळे निराश व्हाल. नवी योजना सावधपणे सुरू करा. संतान सुख मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राकडून सहकार्य मिळाल्याने यश मिळण्याची शक्यता आहे.

मीन – वारसाहक्क मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला वारसाहक्क मिळण्याची शक्यता आहे. नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. दुर्लक्षपणामुळे एखादी मोठी चूक होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

वृषभ – कामाच्या ठिकाणी विरोध जाणवेल

तुमच्या मनमर्जीने काम करणे टाळा. कारण यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी विरोध होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगल्या संधी गमावू शकतात. प्रिय व्यक्तीकडून भावनिक सहकार्य मिळेल.

ADVERTISEMENT

मिथुन – एखादी नवी योजना यशस्वी होईल

नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे व्यावसायिक लाभ होईल. नवीन योजना यशस्वी होतील. भेटवस्तू आणि मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. जवळचे नातेसंबध मजबूत होतील.

कर्क – कामाच्या ठिकाणी समस्या येतील

आज तुमच्या काम लवकर पूर्ण करण्याचा दबाव राहील. कामाच्या ठिकाणी विनाकारण समस्या आणि आव्हाने निर्माण होतील. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यींनी आपले लक्ष व्यर्थ गोष्टींमध्ये गुंतवू नये. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते दृढ होईल.

सिंह – मानसिक असमाधान जाणवेल

आज तुमचे मन अशांत राहील. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर कामावर लक्ष द्या. जोखिमेच्या कामांपासून दूर रहा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. आर्थिक सुख – समाधान मिळेल.

कन्या – जोडीदारासोबत भावनिक जवळीक साधाल

अविवाहित लोकांना एखाद्या व्यक्तीसोबत आकर्षण वाटू शकेल. जोडीदारासोबत आज तुम्ही भावनिक जवळीक साधण्याची शक्यता आहे. एखादी फार काळापासून रखडलेली योजना पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी परिवर्तन होण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश आणि फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्रास जाणवू शकतो. 

ADVERTISEMENT

तूळ – विद्यार्थ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांना एखादे विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी महत्वाची  योजना सफळ होती. लवकरच एखादे लक्ष्य तुम्ही साध्य करू शकता. रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. वादविवाद करू नका. प्रवास करण्याचा योग आहे.  

वृश्चिक – आर्थिक नुकसान शक्यता आहे

आज तुमचे एखादे आर्थिक नुकसान होऊ शकते. राग आणि उत्साहावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराबाबत प्रेम आणि सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी व्यस्त राहण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्या.

धनु – आरोग्य उत्तम राहील

आज तुमचे आरोग्य उत्तम राहील. खाण्या-पिण्याबाबत सावध रहा. पुरेशी झोप घ्या. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने यश मिळेल. व्यावसायिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. रचनात्मक कामात मन रमवा. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर – एखाद्या कौटुंबिक गोष्ट त्रासदायक ठरेल

कौटुंबिक बाबतीत विचार करून निर्णय घ्या. कामाच्या ताणामुळे एखाद्या कौंटुबिक गोष्टीकडे दुर्लक्ष होईल. ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा. आर्थिक बाबतीत एखादा वाद असेल तर सावध रहा. आहाराबाबत सावध राहण्याची गरज आहे. 

ADVERTISEMENT
11 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT