मेष – पोटाचे आरोग्य बिघडेल
अचानक पोटाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहाराची काळजी घ्या. व्यवसायात चढ-उतार जाणवण्याची शक्यता आहे. नोकरीत यश मिळेल. नवीन ओळखी करताना सावध रहा. सामाजिक कार्यात सहकार्य वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ – मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता
आज तुमचा मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. विरोधक त्रास देतील. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. रखडलेले पैसे हातात येतील. भावनिक होऊन निर्णय बदलण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा.
मीन – व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे
व्यावसायिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांवर खर्च कराल. अभ्यासासाठी घरापासून दूर जावे लागेल. सामाजिक संस्थेमार्फेत सन्मान मिळेल. रचनात्मक कामात प्रगती होईल. नात्यातील कटूपणा दूर होईल. मित्रांसोबत मौजमस्ती कराल.
वृषभ – नातेसंबध सुधारतील
काही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे नातेसंबध सुधारतील. विवाहातील अडचणी कमी होतील. जोडीदारासह चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांचे सहाकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. रखडलेली कामे पूर्ण कराल.
मिथुन – कामाच्या ठिकाणी बेजबादारपणा टाळा
आज ऑफिसमध्ये बेजबाबदारपणा करू नका. समस्या निर्माण होऊ शकतात. तरूणांना करिअरसाठी संधी शोधावी लागेल. धूर्त लोकांपासून सावध रहा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. अचानक धन-लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क – मानसन्मान आणि भेटवस्तू मिळतील
आज तुमच्या मानसन्मानात वाढ होणार आहे. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. नवीन पोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबासोबत बाहेरगावी जाण्याचा बेत आखाल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. जमा आणि खर्चावर नियंत्रण राखा. जुन्या मित्रांची भेट होईल.
सिंह – एखादं मिळालेलं काम रद्द होण्याची शक्यता
प्रोफेशनल जीवनात समस्या येण्याची शक्यता आहे. व्यवसायातील एखादं प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. संयम राखा. जोडीदाराशी संबध दृढ होतील.
कन्या – मानसिक तणाव जाणवेल
कौटुंबिक समस्या जाणवतील. मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. प्रभावशाली व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम केले जातील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ- कुटुंबाचे सहकार्य मिळेल
रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबाची मदत मिळेल. नातेसंबध परिपक्वता येईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जमा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
वृश्चिक – भाग्योदयातील अडथळे दूर होतील
आज नियोजित केलेल्या कामातून चांगले परिणाम दिसून येतील. अधिकाऱ्यांच्या भेटी गाठीतून फायदा होईल. व्यावसायिक व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबी सोडवण्यात यश मिळेल. प्रवास सुखकर होईल.
धनु – वाहन खर्च वाढेल
वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. शानशौकीसाठी कर्ज घ्याल. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. मनातून निराश व्हाल असंतोषाची भावना जाणवेल. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंंदवार्ता मिळतील.
मकर – आरोग्यात सुधारणा
दीर्घ आजारपणातून आराम मिळण्याची शक्यता आहे. फोन बंद करून आराम करा. दैनंदिन कामे करणे टाकू नका. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. विरोधक त्रास देतील. जोडीदारासह सामाजिक समारंभात सहभागी व्हाल.
फोटोसौैजन्य – इन्स्टाग्राम