मेष – विरोधकांपासून राहा सतर्क राहा
तुम्हाला रागावर आज नियंत्रण ठेवा. जवळच्या नातेसंबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. आपल्या विरोधकांपासून सावध राहा. साथीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर नीट लक्ष देणे गरजेचं आहे.
कुंभ – आर्थिक संकट येण्याची शक्यता
उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होईल. आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. पण जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणात आवड निर्माण होऊ शकते. आखलेल्या कार्यांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
मीन – नव्या गोष्टी करण्यासाठी असाल उत्साहीत
तुमचा मूड आज आनंदित आणि ताजतवाणा असेल. काही नवीन करण्याचा उत्साह तुमच्यात असेल. खास व्यक्तीची आज भेट घडेल. व्यवसायात फायदा होईल. आखलेल्या कामांमध्ये प्रगती मिळेल.
वृषभ – धावपळ आणि तणावग्रस्त वातावरण दिवस
तुमचा आजचा संपूर्ण दिवस धावपळ आणि ताणतणावात जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती खराब होऊ शकते. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. इतरांकडून सहकार्य घेण्यात तुम्हाला यश मिळेल आणि खोळंबलेली कामंदेखील ठीक होतील.
मिथुन – गुंतवणुकीत फायदा होईल
वडिलांच्या मदतीमुळे तुम्हाला गुंतवणुकीत फायदा होईल. आखलेल्या कामांमध्ये प्रगती आणि धनसंपदेत वाढ होईल. मुलाची जबाबदारी योग्यरितीनं पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. रखडलेली कार्य मार्गी लागतील.
कर्क – विवाहातील अडचणी दूर होतील
विवाह कार्यातील अडचणी दूर होतील. मित्रांच्या मदतीनं बिघडलेली कामं सहजरित्या पूर्ण होतील. राजकारणातील आवड वाढेल. आरोग्य ठीक राहील. तरुणांना क्रीडा क्षेत्रात विशेष यश मिळेल. भ्रमंतीचा योग आहे.
सिंह – विद्यार्थ्यांना परिश्रमाची आवश्यकता
कार्यालयाचं ठिकाण किंवा व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकते. तणाव वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. देवाण-घेवाणीचे प्रकरण निकाली लागेल.
कन्या – पुन्हा-पुन्हा मिळेल लाभाची संधी
तुमचा आजचा दिवस आनंदानं भरलेला असेल. एखाद्या प्रभावी व्यक्तीवर पैसा खर्च होईल. आत्मविश्वास वाढेल. परिवारासह प्रवास आणि मनोरंजनाचा आनंद तुम्हाला मिळेल.
तूळ – पदोन्नतीमध्ये व्यत्यय येऊ शकतो
तुमच्या कार्यशैलीमुळे कदाचित वरिष्ठ अधिकारी नाराज होऊ शकतात. यामुळे पदोन्नतीमध्ये अडथळा येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण आणा. जोडीदाराचा भावनात्मक सहवास लाभेल.
वृश्चिक – आरोग्याच्या समस्या जाणवतील
प्रकृती आज खराब राहील. त्यामुळे खाता-पिताना जरा सावधच राहा. राजकीय कार्यात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकतात. मुलांकडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. वादापासून दूर रहा.
धनु – नवे मित्र मिळतील
चांगल्या वागणुकीमुळे तुमच्या आयुष्यात नवीन मित्र येतील. भावनिकदृष्ट्या आज चांगले वाटेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संबंध तयार होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.
मकर – शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिणाम
शिक्षण क्षेत्रात तुम्हाला आज सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारसोबत वाद होऊ शकतात.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का