मेष : प्रवासाचा आनंद
आज तुमचे प्रवासाचे योग असून त्यात तुम्हाला जोडीदाराची साथ मिळणार आहे. त्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित होईल. आत्मविश्वासाचे परिपूर्ण असलेला आजचा दिवस आहे. जीवन जगत असताना सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करावा लागतो, हे बाब लक्षात घ्या.
कुंभ : स्वभाव सांभाळा
वरकरणी कठोर आतून कनवाळू स्वभावाची तुमची राशी आहे. त्यामुळे लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. म्हणून आपला स्वभाव सांभाळा व सावध राहा. व्यवसायात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. अतिआत्मवि·ाास घातक असतो. उथळ पाण्याला खळखळात फार असतो. कृती करण्यावर भर द्या.
मीन : मुद्देसूद बोला
उचलली जीभ लावली टाळ्याला असं आज करु नका. शक्य होईल तेवढे मुद्देसुद बोला. आज तुमच्या मनात जोड व्यवसायाचाही विचार येऊ शकतो. मात्र हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे बरोबर नाही. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. दिव्यातील राक्षस तुमच्यासाठी हात जोडून उभा आहे.
वृषभ : विचार करा
विचार करणे, चिंतन करणे ही खूप आवश्यक बाब आहे. आज कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा. जोडीदाराचा प्रभाव तुमच्यावर राहणार आहे. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे तुम्ही वागणार आहात. दु:खांना दूर करीत सुखाचा स्विकार करीत राहा.
मिथुन : विरोध होईल
आपल्या विचारांचे विरोधी लोक आपल्याला विरोध करणारच असतात. मात्र विरोध जेव्हा अनोळखी लोकांकडून होतो, तेव्हा तो जास्त त्रासदायक असतो. आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. कुणाच्याही व्यंगावर हसणे कधीही वाईट. आज त्यापासून सावध राहा. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे खर्चही होईल.
कर्क : प्रेयसीशी भेट
आज प्रेमवीरांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज प्रेयसीशी भेट होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कार्यात व्यस्त राहणार आहात. त्यामुळे कार्याच्या पूर्णत्वाकडे लक्ष द्या. टिका व तक्रार करण्यामध्ये वेळ घालवत बसू नका. पदरी पडेल अन् पवित्र झाले ही बाब लक्षात घ्या.
सिंह : लाभ घ्या
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असून आज काय मिळवायचे ते मिळवून घ्या. संधी चालून आली आहे तिचा लाभ घेऊन मनसोक्त जगुन घ्या. मात्र तुम्हाला घरात काळजी घ्यावी लागणार आहे. कारण जोडीदाराशी मनमुटाव होऊ शकतो. घरोघरी मातीच्या चुली असतात, ही बाब लक्षात घेऊन सामंजस्याशी भूमिका घ्या.
कन्या : सहनशीलता व उत्साहही
आज तुम्ही अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण राहणार आहात. शैतानालाही त्याचा वाटा द्यायचा असतो. त्यामुळे जीवनात सर्वकाही आपल्यालाच मिळेल ही अपेक्षा व्यर्थ आहे. जोडीदाराबद्दल गैरसमज होऊ शकतो. म्हणून घरामध्ये सामंजस्याची भुमिका घ्या.
तुळ : व्यापार व व्यवसाय सुखद
व्यापारी व व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सुखद असा असणार आहे. आपल्यावर ईश्वराचे आशीर्वाद असल्याची भावना आज मनात दाटून येणार आहे. ईश्वरावरील विश्वास त्याच्याने आणखीच दृढ होर्सल. या फसव्या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधू का. निराशा हाती लागू शकते.
वृश्चिक : भरभराटीवर लक्ष द्या
आज थोडंसं स्वार्थी व्हावं लागले. स्वत:च्या भरभराटीवर लक्ष केंद्रित करा. मिळालेल्या संधीचा लाभ घ्या. मात्र हे करीत असतांना थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला खर्चाकडेही लक्ष ठेवावे लागेल. अंथरुन पाहून पाय पसरावे.धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदाचा अनुभव घ्याल.
धनु : आध्यात्मिक आनंद
आज तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीतून आनंद मिळणार आहे. त्यामुळे तसे वागण्याच प्रयत्न करा. वरकरणी कनवाळू आतून कठोर अशा दोनतोंडी लोकांपासून सावध राहा. ते तुमचं नुकसान करु शकतात. उत्पन्न व सतत वाढत राहणारा खर्च यांच्यामध्ये तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
मकर : नफ्याकडे लक्षा ठेवा
आज तुम्ही आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. जे मिळतंय ते सर्व पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील राहा. आजचा दिवस कलाकरांसाठीही यशदायक असा आहे. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज भोगावी लागू शकतात. म्हणून आलीया भोगासी असावे सादर असं म्हणतात.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र