मेष : आरोग्य सुधारेल
बराच काळापासून असलेला आजार ठीक झाल्यानं आरोग्य सुधारेल. नियमित दिनक्रम पाळावा. जोडीदारासोबतचं नातं घट्ट होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सामाजिक संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे.
कुंभ : विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. आखलेल्या कार्यांमध्ये प्रगती होईल. सामाजिक सन्मान आणि धनसंपदेत वाढ होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली काम पूर्ण होतील.
मीन : पैशांची घेवाणदेवाण टाळा
व्यवसायासंबंधी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. पैशांचा कोणताही व्यवहार करून नका. अनावश्यक धावपळ होईल. कौटुंबिक ताणतणाव वाढू शकतो. वाहनांच्या समस्या उद्भवू शकतात.
वृषभ : मित्रांसोबत वाद घालू नका
मित्रांमध्ये आणि कौटुंबिक नात्यात कलह वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळावेत. राग आणि भावनेच्या भरात घेतलेला निर्णय वेदनादायी ठरेल. व्यवसायात काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिथुन : आईची प्रकृती सांभाळा
तुमच्या आईची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ राहील. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी घडतील. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. जास्त खर्च झाल्यानं अस्वस्थ वाटेल. व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकतील. वादापासून दूर राहा.
कर्क : रोजगाराच्या संधी मिळतील
रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. सुख-समाधानात वाढ होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात सक्रियता वाढू शकते. प्रेम संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
सिंह : प्रेम प्रस्ताव येण्याची शक्यता
तुम्हाला प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांकडूंना कौतुक होण्याची शक्यता. भावाच्या सहयोगामुळे व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता. विरोधकांचा पराभव होईल. जोडीदारासह परदेशात प्रवास करण्याचा योग आहे.
कन्या : शैक्षणिक कामात अडथळ्याची शक्यता
विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक कामात थोडा अडथळा येऊ शकतो. कोणत्या तरी गोंधळामुळे व्यवसायात अडचण येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे खोळंबतील. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
तूळ : मित्रांकडून नफा मिळेल
त्रास कमी होऊन आज तुम्हाला थोडासा आराम मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. उधळपट्टी नियंत्रित करून आपण आपली बचत वाढवू शकता. पगार वाढेल.
वृश्चिक : विद्यार्थी भरकटण्याची शक्यता
विद्यार्थ्यांचे मन आज अभ्यासापासून भरकटू शकते. मूडमध्ये सातत्यानं बदल होतील. कार्यालयाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. मेहनतचं फळ उशिरानं मिळेल. वादापासून दूर रहा. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.
धनु : शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल
संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. यामुळे शारीरिक थकवा आणि आळस निर्माण होईल. धार्मिक कार्याकडे कल वाढू शकतो. काही काळासाठी प्रवास करणं थांबवा. अपत्याकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मकर : नव्या मित्रांमुळे व्यवसायात फायदा
जोडीदारासह मिळून काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. नवीन मित्रांमुळे व्यवसायात फायदा होईल. वादग्रस्त प्रकरणं सुटण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी