मेष – शैक्षणिक आणि व्यावसायिक समस्या येतील
आज तुम्हाला शिक्षण अथवा नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. व्यवसायात निर्णय घेताना सावध राहा. पैशांबाबत समस्या येण्याची शक्यता आहे. नातेवाईकांचे वाईट वाटून घेऊ नका.
कुंभ – अभ्यासात समस्या येण्याची शक्यता
आज विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्या येऊ शकतात. एखादे नवे काम सुरू करणे टाळा. ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी बिन कामाच्या गप्पा मारू नका.
मीन – महागडी भेटवस्तू अथवा धनसंपत्ती मिळेल
आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून एखादी महागडी भेटवस्तू अथवा धनसंपत्ती मिळणार आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. उच्च शिक्षणाची संधी मिळेल. राजकारणातील आव्हाने वाढणार आहेत.
वृषभ – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज व्यवसायातील ताणतणावापासून दूर राहा. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
मिथुन – जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता
आज तुमचा जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. भावंडांच्या मदतीने व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – राजकारणात यश मिळेल
आज तु्म्हाला दिवसभर आनंदी आणि समाधानी वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटेल. नवीन व्यावसायिक कामे मिळल्याने तुमच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. राजकारणात यश मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल.
सिंह – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज तुम्हाला भागिदारीच्या कामात नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्च वाढल्यामुळे बजेट वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडू शकते. रचनात्मक कार्यात मन रमवा. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या – आईच्या तब्येतीत सुधारणा होईल
आज तुमच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जोडीदारासोबत सामाजिक समारंभात सहभागी व्हाल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिक ओळखी वाढण्याची शक्यता आहे.
तूळ – जोडीदारासोबत तणाव वाढेल
आज तुमचा जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. मुलांना तुमच्या आधाराची आणि प्रेमाची गरज भासेल. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधकांकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक प्रवास करणे टाळा. आर्थिक दृष्ट्या थोडासा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज तुम्हाला रक्तदाबासंबधीत समस्या जाणवू शकतात. प्रॉपर्टीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. धुर्त लोकांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.
धनु – धनसंबधीत आनंदवार्ता मिळेल
आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळणार आहे. भागिदारीत एखादे नवे काम सुरू कराल. परदेशी जाण्याचा योग आहे. वाहन चालवताना सावध राहा. कोर्ट कचेरीचे वाद मिटणार आहेत.
मकर – कौटुंबिक वाद संपतील
आज तुमचे कौटुंबिक वाद संपणार आहेत. मनाप्रमाणे प्रवास केल्यामुळे नात्यात गोडवा आणि ताजेपणा येईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. बिघडलेली कामे पुन्हा सुधारतील. व्यवसायात राजकारणाची जोड मिळेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का