मेष – आरोग्याकडे लक्ष द्या
आज आपल्या आरोग्याकडे संपूर्ण लक्ष द्या. आरोग्य मग ते शरीराचे असो किंवा मनाचे त्याची सुदृढता राखलीच गेली पाहिजे. आज वाहनही सावकाश चालवा. कुठे तातडीने पोहचायचे असेल तर थोडं वेळेच्या आधी निघा. आज एखाद्या बद्दल गैरसजही होऊ शकतो. म्हणून आज आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. प्रियकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. कारण आज प्रेयसीची भेट होऊ शकते.
कुंभ – धार्मिक कार्यातून आनंद मिळेल
आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये कधी कधी मानसिक शांती मिळविण्याची आपल्याला ओढ लागते. मानसिक शांतता ही जीवनासाठी आवश्यक असते. आज तुम्ही याची अनुभूती घेणार आहात. आज तुम्ही धार्मिक कार्यातून आनंद प्राप्त करणार आहात. त्यातुन तुम्हाला मनशांती मिळू शकते. आज तुम्हाला प्रॉपर्टीमधून लाभ होऊ शकतो. एखादा अडकून पडलेला व्यवहार आज मार्गी लागू शकतो. एखाद्या कामात अडचणी येऊ शकतात. भुतकाळामध्ये घडून गेलेल्या आनंददायी घटना आज पुन्हा आनंद देऊ शकतात.
मीन – घरात मानसिक सुखशांतीचे वातावरण
जीवनामध्ये बरेच असे दिवस येतात ज्या दिवशी कुठलीच चिंता आपल्याला सतावत नसते. फक्त मानसिक शांतीचा मिळविण्याचा तो दिवस असतो. तशाच दिवसाची अनुभूती आज तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबात आज तुम्ही धैर्याने निर्णय घेणार आहात. त्या निर्णयाचं स्वागतही होणार आहे. त्यामुळे आत्मबल वाढलेलं असेल. एखादं काम अपूर्ण असेल तर चिकाटी कायम ठेवून आज ते काम पूर्ण करण्यावर भर द्या. तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. व्यावसायिकांनी आज नफ्याकडे लक्ष दिले पाहिजे.
वृषभ – सरकारी कर्मचारी सावध राहा
सरकारी कर्मचाऱ्यांना आज काहीतरी चांगलं शिकविणारा आजचा दिवस आहे. आज वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील अशी कोणतीही चुक करु नका. आज आपले आरोग्यही चांगले राहणार आहे. ते दररोज असंच राहावं यासाठी प्रयत्न करा. कुटुंबातही आपण एखाद्या प्रसंगामध्ये धैर्याने निर्णय घेणार आहात. व्यापार व व्यावसायिकांसाठी आजाचा दिवस सुखदायी असणार आहे.
मिथुन – विद्यार्थी अभ्यास करतील
विद्यार्थी आज मनापासून, मन लावून अभ्यास करणार आहेत. आज त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासात राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी आजच्या दिवसाचा योग्य लाभ करुन घ्यावा. इतरांना मात्र आज कामामध्ये अडचणी येणार आहेत. परिश्रम केल्याशिवाय व अडचणींचा सामना केल्याशिवाय आज कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. शरीर व मनाच्या सुदृढतेसाठी वेळोवेळी व्यायाम करीत राहा. लेखक मंडळींसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज त्यांना आपल्या लेखन कार्यामध्ये यश मिळणार आहे.
कर्क – आज बाहेरचे काही खाऊ नका
काही वेळेला पर्यायच नसतो, म्हणून बाहेरच्या गोष्टी खाव्या लागतात. काहीजणांना तर बाहेरचे खाण्याची आवडच असते. यापैकी काहीही असले तरी आज तुम्हाला बाहेरच्या गोष्टी वर्ज आहेत. काही कारणास्तव खावेच लागले तर त्यामध्ये जंक फूड खाऊ नका. त्याचा तुम्हाला आज त्रास होऊ शकतो. आज मित्रांकडून तुम्हाला आनंद मिळू शकतो. आपल्या खर्चाकडेही आज तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. अवास्तव खर्चाला कात्री लावा. आज मानसिक सुखशांतीचा अनुभव कराल.
सिंह – उत्पन्न व खर्चावर नियंत्रण
जसं उत्पन्न तसा खर्च.. हे सूत्र ठरलेलं आहे. या सुत्रानुसार वागत राहिले तर आपण सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ बसवू शकतो. मात्र सूत्राचा थोडासाही विसर पडला तरी आपलं सर्व नियोजन गडबडंत. आज तुम्हाला याचा अनुभव मिळू शकतो. म्हणून आज उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवा. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त राहणार आहे. सासरकडच्या मंडळींकडून आज तुम्हाला सहयोग प्राप्त होणार आहे. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. नोकरी व व्यवसायातही आज चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला आज उघड्या डोळ्यांनी वावरावं लागेल. तरच तुम्हाला त्या संधी समजू शकतील व तुम्ही तिचा लाभ घेऊ शकाल. आज तुमच्या कल्पकतेलाही वाव मिळू शकतो.
कन्या – कामात अडचणी येतील
यश हे कधीच सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी परिश्रम करावेच लागतात. मात्र परिश्रम करीत असताना जर वारंवार अडचणी येत असतील, कामाला वेळ लागत असेल तर आपलं आत्मबल कमी होतं जातं. आपण निराशावादी होत जातो. हे आपल्यासोबत आज होऊ नये म्हणून आज चिकाटी सोडू नका. कारण आज कामला वेळ लागणार आहे. म्हणून निराश न होता प्रयत्न सुुरु ठेवा व हातातले काम पूर्ण कसे होईल ते बघा. आज तुमच्या नवीन ओळखीही होऊ शकतील. त्यामुळे त्यांना सकारात्मकता व आत्मविश्वासाने सामोरे जा. आज तुम्हाला वडीलांकडून मार्गदर्शनही मिळू शकतं. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घ्या. फायदा तुमचाच होईल.
तूळ – विद्यार्थी अभ्यास टाळतील
आपलं रोजच कामामध्ये लक्ष लागतं असं होत नाही. एखाद्या दिवशी आपल्याला कंटाळाही येतो. तसं विद्यार्थ्यांचंही रोज अभ्यासात लक्ष लागेलच असं नाही. आज विद्यार्थी अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. आज अपचनाचा त्रास संभवणार आहे म्हणून आज आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढणार आहे. व्यावसायिकांनी आज नफ्याकडे लक्ष ठेवावे.
वृश्चिक – विचार करण्यासाठी एकांत शोधाल
जसं मन शांत ठेवण्यासाठी ध्यानाची आवश्यकता असते. अगदी तसंच कधी कधी आपण काय करायले हवे? यावर विचार करण्यासाठी एकांताची आवश्यकता असते. चार चौघात आपण चिंतन करु शकत नाही. अर्थात हे सर्व आपल्याला त्यावेळच्या मनस्थितीवर अवलंबून असतं. मात्र जीवनात चिंतन करणं ही आवश्यक बाब आहे. त्यातून नवीन दिशाही गवसू शकते. आज तुमची अवस्था अशीच काहीशी असणार आहे. कारण तुम्ही आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी एकांत शोधाल. आज तुम्हाला अपचनाचाही त्रास संभवू शकतो. त्यामुळे आज आपण आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहायला हवं. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. जोडीदाराच्या इच्छेनुसार आज तुम्ही खर्चही करणार आहात.
धनु – जोडीदाराचे सहकार्य मिळेल
आपल्या जीवनामध्ये जोडीदाराचं सहकार्य मिळणं खूप गरजेचं असतं. कारण आयुष्य दोघांनी मिळून जगायचं असतं. म्हणून जोडीदाराचं सहकार्य जेव्हा मिळतं तेव्हा आनंदाला पारावर राहत नाही. त्या आनंदात मग खर्चही केले जातात. याचा अनुभव आज तुम्हाला येणार आहे. कारण आज तुम्हाला जोडीदाराच्या साथीसोबतच खर्चही होणार आहे. जो तुम्ही आज तुम्ही अगदी आनंदाने करणार आहात. आज तुम्ही जोड व्यवसायचाही विचार करणार आहात जे प्रगतीचे लक्षण आहे. तुम्हाला वडीलांकडूनही आज मार्गदर्शन मिळू शकतं. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होईल.
मकर – भावंडांची मतभेदाची शक्यता
एखाद्याशी मतभेद होणं ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यात जर मतभेद घरातील सदस्यांशी झालेत तर ती त्याहूनही वाईट बाब ठरते. अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की एकवेळ मतभेद झाले तर चालतील. कारण ते कालांतराने दूर होऊ शकतात. मात्र कधीच मनभेद होता कामा नये. घरातील सदस्यांशी तर कधीच नाही. हे तुम्ही आज लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज तुमचे आपल्या भावडांशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे गोष्ट वाढून संबंध बिघडणार नाही, याकडे आपण आज लक्ष दिले पाहिजे. आज मनस्वास्थ्य बिघडविणाऱ्या घटनाही आज घडू शकतात. भरीस भर म्हणून आज तुमचे शत्रुही वरचढ होऊ शकतात. आज थोडं सांभाळून राहावं लागेल.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद