मेष – प्रेमसंबंधात काळजी घ्या
प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणमि नोकरीतही समस्या जाणवतील. क्षमतेपेक्षा जास्त जवाबदाऱ्या वाढतील. वाहनाचा वापर करताना सावधनता बाळगा. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
कुंभ – कौटुंबिक खर्च वाढेल
एखाद्या खास व्यक्तीमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. कमीत कमी पैशात जास्त नफा देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेऊ नका. कामाच्या हळू वेगाने आर्थिक संकट उद्भवण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. कुटुंबाचं सहकार्य मिळेल.
मीन- जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल
जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. आरोग्य चांगलं राहील. नियमित दिनचर्या आणि सूर्य स्नान नेमाने करा. आत्मविश्वासात वाढ होईल. आत्मविश्वासाने घेतलेल्या निर्णयांमुळे यश मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. पार्टनरचं प्रेम आणि सहकार्य मिळेल.
वृषभ – वेतनात वाढ होईल
तुमच्या नियमित उत्पन्नात वाढ होण्याची किंवा अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात. मित्रांकडून महागड्या भेटवस्तू मिळू शकतात. मेहनत आणि व्यावसायिक योग्यतेमुळे बढती मिळेल. नव्या पार्टनरशिपमुळे फायदा होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन – मानसिकरित्या अशांत वाटेल
आज तुम्हाला मानसिकरित्या अशांत वाटेल. बोलण्याच्या नादात एखादा गैरसमज होण्याचीही शक्यता आहे. काळजी घ्या. पार्टनरचं सहकार्य मिळेल. नोकरी आणि व्यवसायात लाळघोटेपणा करणाऱ्यापासून सावध राहा. अचानक धन लाभ होण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
कर्क – विवाहातील अडथळे दूर होतील
चांगल्या स्वभावाच्या माणसांशी संबंध सुधारतील. विवाहात येणारे अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येईल. व्यवसायात फायदा होईल. राजकारणातील तुमचं स्थान मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह – कोणत्याही नव्या कामाला सुरूवात करू नका
कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे संबंध तणावपूर्ण होतील. त्यामुळे शक्यतो आज व्यवसायात कोणत्याही नव्या कामाला सुरूवात करणं टाळा. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आसपासची लोक प्रभावित होतील. कुटुंबाकडून भावनात्मक सहकार्य मिळेल. अडकलेले पैसे मिळतील.
कन्या – अचानक धन लाभ होण्याचा योग
अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. रखडलेली काम मार्गी लागतील. सामाजिक सन्मान आणि संपत्तीत वृद्धी होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. जोडीदाराशी खाजगी संबंध प्रेमपूर्ण राहतील. वाहनाचा उपयोग करताना काळजी घ्या.
तूळ – वरिष्ठांशी वाद टाळा
विद्यार्थ्यांनी मेहनत करण्याची आवश्यकता आहे. एकाग्रता कायम ठेवा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. वादापासून दूर राहा. व्यावसायिक भागीदारी रद्द होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
वृश्चिक – जोडीदाराची काळजी घ्या
जोडीदाराच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे तुम्ही चिंतेत राहाल. व्यवसायात चढउतार कायम राहील. नोकरीमध्ये चांगलं वातावरण राहील. तुमच्या संवाद कौशल्याने लोक प्रभावित होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. रखडलेली काम आज पूर्ण होतील. धार्मिक कार्यात रस घ्याल.
धनु – कौटुंबिक वातावरण सुखद राहील
एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल विशेष भावनांचा अनुभव घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साहपूर्ण राहील. जुन्या मित्रांच्या सहकार्याने बिघडलेली काम पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद दूर होतील. व्यावसायिक भागीदारीत फायदा होईल.
मकर- करिअरमध्ये यश मिळेल
एका खास व्यक्तीच्या मदतीमुळे तुमच्या करिअरमध्ये यश प्राप्त होईल. मनासारख्या यशासाठी कार्ययोजनांमध्ये बदल करण्याचा विचार करू शकता. व्यवसायासाठी केलेल्या धावपळीचा फायदा होईल. नवीन पार्टनर मिळतील. आरोग्य चांगलं राहील.
हेही वाचा
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
2019 वार्षिक भविष्य धनु राशी – यावर्षी ग्रह तुमची परीक्षा घेणार आहेत
वार्षिक भविष्य वृषभ (Taurus) राशी : गतवर्षाचा आनंद नववर्षात अधिक द्विगुणीत होईल