ADVERTISEMENT
home / भविष्य
16 एप्रिल 2019 चं राशीफळ,  मेष राशीच्या लोकांना होणार वास्तूलाभ

16 एप्रिल 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना होणार वास्तूलाभ

मेष – प्रॉपर्टी बाबतीत खुशखबर मिळेल

प्रॉपर्टीबाबतीत खुशखबर मिळण्याची शक्यता. नफा देणारे व्यवहार यशस्वी होतील. प्रॉपर्टी खरेदीची योजना आखाल. धोका पत्कराव्या लागणाऱ्या कामांपासून दूर रहा. जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल. प्रवास करताना सावध रहा.

वृषभ – काम करताना सावध रहा

कामाच्या ठिकाणी प्रमोशन लांबण्याची शक्यता आहे. काम करताना सावध रहा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने काम करावे. रोमॅंटिक लोकांना यश मिळेल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. देणी-घेणी करताना सावध रहा. रचनात्मक कामात प्रगती होईल.

मिथुन – अनोळखी लोकांकडून मदत

एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आनंद मिळेल. प्रेमवीरांना भावनिक सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज कुणाला उधार देऊ नका. उधारी परत मिळण्याची शक्यता कमी आहे.

कर्क – आरोग्याबाबत चिंता

आरोग्याबाबत चिंता सतावेल. मात्र लवकरच आरोग्य समस्या कमी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. रोमॅंटिक प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवास करताना सावध रहा. अडकलेली कामे पूर्ण होतील.

ADVERTISEMENT

सिंह – नवीन कामाची संधी मिळेल

एखादे नवे काम मिळण्याची शक्यता आहे. विदयार्थ्यांची अभ्यास रुची वाढेल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता. तुमच्या कामातील कौशल्यामुळे वरिष्ठ खुष होतील. विरोधक मैत्रीचा हात पुढे करतील. सामाजिक सन्मान वाढेल.

कन्या – आर्थिक समस्या

लवकर श्रींमत करणाऱ्या स्कीम्स पासून दूर रहा. आर्थिक संकट येऊ शकते. कर्ज मिळण्यास उशीर होईल. सामाजिक ओळखी वाढतील. परदेश प्रवास करण्याची संधी हुकेल. रचनात्मक कामात प्रगती होईल. चालु लोकांपासून सावध रहा. जोडीदाराची साथ मिळेल.

तूळ – तणाव दूर होईल

नियमित व्यायाम करा ज्यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. तणाव दूर होण्याची शक्यता आहे. कौंटुबिक सहकार्य मिळेल. विरोधकांचा त्रास कमी होईल. नोकरीत यश मिळेल. व्यायसायिक संबधातून यश मिळेल. देणी-घेणी करताना सावध रहा. लॉंग ड्राईव्हवर जाण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – घरातील लोकांशी वाद

घरातील लोकांसोबत भांडण होण्याची शक्यता आहे. अंहकारामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी गमवाल. देणी-घेणी करताना सावध रहा. वरिष्ठांसोबत वाद घालाल. प्रवास त्रासदायक असेल.

ADVERTISEMENT

धनु – प्रेमवीरांना सरप्राईज मिळेल.

प्रेमवीरांना  भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी संबधित वाद मिटतील. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहिल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामात रस वाढेल.

मकर- आरोग्याबाबत सावध

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजारपण वाढण्याची शक्यता आहे. प्रेमवीरांचे भांडण होण्याची शक्यता आहे. खर्चामुळे बजेट कोसळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आधी करा. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ – नवीन ओळखी लाभदायक

आज चर्चा करून कौंटुबिक वाद मिटवा. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. अडकलेले धन मिळेल. घाईत काम  करू नका चुका होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण करण्यास कुटुंबियांची मदत मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.

मीन-  का्माकडे दुर्लक्ष

कामात मन लागणार नाही. कामातील दुर्लक्षपणा त्रासदायक ठरेल. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. धोकादायक कामापासून लांब रहा. कुटुंबाकडून टिका होईल. खेळात रस वाढेल. रचनात्मक कामात प्रगती होईल.

ADVERTISEMENT

एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या

14 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT