मेष : उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याच्या संधी
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीची कल्पना डोक्यात येऊ शकते. परदेश यात्रेचा योग आहे.
कुंभ : आईचा वैद्यकीय अहवाल योग्य येईल
आईचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक येईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. व्यवसायाची नवीन योजना यशस्वी होईल.विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कायदेशीर प्रकरणांपासून सुटका मिळेल. मित्रांचं सहकार्य मिळेल.
मीन : गोड नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो
गोड नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अपत्यासमोर एखादी समस्या निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी आल्यानं व्यस्तता वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. मनाविरोधात यात्रा करावी लागण्याची शक्यता आहे.
वृषभ : वडिलांचं आरोग्य बिघडू शकते
वडिलांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. कामाच्या ठिकाणी वैचारिक मतभेद दूर होतील. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मिथुन : प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता
आज एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यात तुम्हाला यश मिळेल. प्रेम प्रस्ताव देखील मिळण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधीच्या अडचणी दूर होतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कष्टाचं फळ मिळेल.
कर्क : निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते
तुमच्या निष्काळजीपणामुळे व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. एखाद्या जवळच्या मित्राच्या मदतीमुळे बिघडलेली कामे ठीक होतील. मनाविरोधात एखाद्या ठिकाणी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. विरोधक पराभव स्वीकारतील. निरर्थक खर्च करणं टाळा.
सिंह : वेतनात वाढ होण्याची शक्यता
आज भाग्योदयाचा विषय आहे. जीवन सर्व काही सकारात्मक होण्याचे संकते आहेत. व्यवसायात नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. पगार वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि भेटवस्तूमध्ये वाढ होईल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
कन्या : व्यवसायाची गती कमी झाल्यानं अडचणी
व्यवसायामध्ये कामाची गती कमी झाल्यानं अडचणी निर्माण होऊ शकतात. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागण्याची शक्यता आहे. अडचणी निर्माण होऊ शकतात. अचानक धन लाभ होण्याचे योग आहेत. अत्यंत सुखद यात्रेचे योग आहेत.
तूळ : आजाराकडे दुर्लक्ष करू नका
कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढू शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
वृश्चिक : मैत्री नव्या संबंधांमध्ये बदलण्याची शक्यता
जुनी मैत्री नवीन नातेसंबंधांमध्ये बदलण्याची शक्यता आहे. तुमचा पार्टनर तुमच्या भावना समजून घेईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. व्यावसायिक निर्णय घेण्यामध्ये यश मिळेल.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
धनु : विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल
अभ्यासासाठी चांगली वेळ सुरू आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल. ठरवलेल्या वेळेमध्ये करार पूर्ण करण्यात यश मिळेल. प्रेम संबंधांसंदर्भात थोडेसे सतर्क राहा. आरोग्य ठीक राहील.
मकर : महागडी वस्तू खरेदी करू नका
महागडी वस्तू खरेदी करू नका. अचानक खर्च वाढू शकतात. संपत्तीच्या प्रकरणात कुटुंबातील काही जण अडचणी निर्माण करू शकतील. आरोग्यासंबंधी सावधगिरी बाळगा. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.